Category: होम

शरद पवारपक्षाच्या गटनेतेपदी आव्हाड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर, दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील यांना मुख्य प्रतोदपदी संधी देण्यात आली आहे. तसेच, आमदार…

शिंदे इन अॅक्शन; वाटाघाटी पुन्हा सुरु

स्वाती घोसाळकर मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील महत्वाच्या बैठकी रद्द करून दोन दिवस दरे गावी गेल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. दोन दिवस शिंदे यांनी आपला सर्व…

हिंदुनो, तीन मुले जन्माला घाला !

सरसंघचालक भागवातांचे आवाहन नागपूर : हिंदू धर्म ठिकवायचा असाल असेल तर तमाम हिंदू जोडप्यांनी किमान तीन मुले जन्माला घालायलाच पाहिजे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथील एका…

मुंबई, ठाणेकरांनो आता कपाटातून स्वेटर काढा !

मुंबई : विधानसभेच्या निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय तापमान दिवसागणिक वाढत चालले असले तरी मुंबई ठाण्यासह राज्यातील तापामानात कमालीची घट होत आहे. राज्यातील किमान तापमानाचा पारा आता चांगलाच घसरला आहे. राज्यामध्ये शनिवारी नाशिक येथे ८.९ या सर्वात…

फडणवीसांची मुलुंडमध्ये ‘दिवाळी’

भाजापा नेते किरीट सोमय्या यांनी मुलुंडमध्ये आयोजित केलेल्या दिवाळी स्नेह संमेलनात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सहभागी झाले आणि त्यांना कॅमेरात टिपण्यासाठी उपस्थितांमध्ये अशी चढाओढ सुरु झाली.

संघ दक्ष ! फडणवीसच मुख्यमंत्री !

मुंबई : मागील सत्तासंघर्षात सर्वाधिक १०५ जागा जिंकूनही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याएवेजी एनवेळी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा धक्कादायक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून घेण्यात आला…

नायडूंकडून आंध्रात वक्फ बोर्ड बरखास्त

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त केलं आहे. गतमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीयांच्या सरकारने राज्यात वक्फ बोर्डची स्थापना केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील…

 आगामी काळातील निवडणुकांमध्येही हिंदू अस्मितेचे धमाके फुटत राहतील

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे भाकित   ठाणे: लोकसभा निवडणुकीच्या काळात हिंदूंमध्ये मतदानाबाबत उदासिनता होती. मात्र, बांगलादेश, सिलीगुडी आणि सिमला येथील हिंदूवरील अन्यायाच्या घटनांनंतर हिंदू अस्मिता जागी झाली. हिंदू धर्मियांना आपल्या उदासिनतेबाबत पश्चाताप झाल्यानंतर सुरुवातीला हरियाणा व आता महाराष्ट्रातील निकाल लागले. यापुढील निवडणुकांतही हिंदू अस्मितेचे धमाके फुटत राहतील, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी येथे व्यक्त केले. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या वतीने राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचे `कारणं महायुतीच्या विजयाची, भाजपाच्या यशाची’ या विषयावर शुक्रवारी व्याख्यान पार पडले. त्यावेळी श्री. तोरसेकर बोलत होते. नौपाड्यातील उमा निळकंठ व्यायामशाळेलगतच्या हितवर्धिनी सभेच्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडो ठाणेकरांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमात भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते व हिंदुत्वाचे अभ्यासक अजय जगताप यांनी `लव्ह जिहाद’वर लिहिलेल्या `व्हायरस’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेला २४० हा आकडा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुपला नाही. पण तो हिंदूंना खुपला. त्यानंतर हळूहळू हिंदू धर्मीय संघटीत होत गेले, असे प्रतिपादन भाऊ तोरकसेकर यांनी केले. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपाने मेहनत केली नाही. तर महाविकास आघाडीने संपूर्णपणे ताकद लावली. त्यामुळे त्यावेळी भाजपाची हाराकिरी झाली होती. महायुती व महाविकास आघाडीच्या मतांमध्ये केवळ ०.०३ टक्क्यांचा म्हणजे दोन लाख मतांचा फरक होता. महाविकास आघाडीतील काही पक्षांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वारस्य नव्हते. त्यामुळे त्यांची मते महाविकास आघाडीकडे वळविण्यात आली. मात्र, ते विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढल्यास महाविकास आघाडीचा पराभव निश्चित होता. लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने भाजपाचा पराभव झाला नसल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, ते ध्यानात घेतले गेले नाही, याकडे भाऊ तोरसेकर यांनी लक्ष वेधले. तसेच २०१९ पासून देवेंद्र फडणवीस यांची पाच वर्ष यथेच्छ टिंगल केली गेली. मात्र, त्यांनी संयम बाळगून आज इतर सर्वांना चेष्टेचा विषय केले आहे, असा टोला श्री. तोरसेकर यांनी मारला. सध्या सक्षम विरोधी पक्ष नसल्यामुळे राजकारणाचा `चुथडा’ झाला आहे. एकेकाळी महाराष्ट्रात अभ्यासू विरोधी आमदारांची फळी होती. परंतु, आता ती फळी संपल्यामुळे लोकशाहीपुढे आव्हान निर्माण झाले आहे, अशी खंत श्री. भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केली. विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने भाऊ तोरसेकर यांचे संजय वाघुले व संस्थेच्या सदस्या वृषाली वाघुले यांच्याकडून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद मुळे यांनी केले.

 विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’

 राज्यस्तरीय ११ व्या ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन पनवेल : दरवर्षी प्रमाणे यंदाही रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यंदा या स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी “रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा” हे ब्रीदवाक्य घेऊन ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाटयरसिकांच्या गळयातील ताईत बनली आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी नाशिक केंद्रावर १३ डिसेंबर, जळगाव केंद्रावर १४ व १५ डिसेंबर, पुणे केंद्र १९ ते २२ डिसेंबर, रायगड (पनवेल) २५ डिसेंबर, तसेच मुंबई, ठाणे, कल्याण व इतर (पनवेल) केंद्राची प्राथमिक फेरी २६ ते २९ डिसेंबरपर्यंत होणार आहे.  तर अंतिम फेरी १० ते १२ जानेवारी २०२५ रोजी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.  या एकांकिका स्पर्धेत राज्यभरातून १०० हुन अधिक एकांकिकांचा सहभाग असतो. नवनवीन संकल्पना आणि  दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने हा करंडक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध झाला आहे. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढला आहे.  या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास ०१ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांक ७५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह,  तॄतीय क्रमांक ५० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक २५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी १० हजार रुपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह तसेच इतरही वैयक्तिक प्रकारचे पारितोषिके देऊन कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा नाट्य संस्था कलाकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, स्पर्धा प्रमुख व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे. 0000

कल्याणमध्ये भास्कर ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळाडू निवड स्पर्धां

ठाणे  : मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे युएन बारा भास्कर ट्रॉफीसाठी कल्याणमध्ये निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने मुंबईमध्ये भास्कर ट्रॉफी सामने खेळवले जातात. या सामन्यांमध्ये प्रवेश घेणार्‍यांसाठी १-९-२०१२ किंवा त्यापुढे जन्म झालेले  क्रिकेटपट्टू सहभागी होऊ शकतात. कल्याणच्या यंग असोसिएशन आणि युनियन क्रिकेट अकादमीसाठी ही निवड होणार आहे. १ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते १० या वेळात युनियन क्रिकेट अकॅडमी, पोद्दार इन्टरनॅशनल शाळेसमोर, वायले नगर, खडकपाडा, कल्याण पश्चिम येथील मैदानावर ही निवड चाचणी होणार आहे. तरी कल्याण परिसरातील किंवा ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंनी या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन युनियन क्रिकेट अकादमीचे तुषार सोमानी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९३२३८९०१८९ 00000