Category: होम

परदेशी खासगी महाविद्यालयांत प्रवेश घेणे टाळा

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या विद्यार्थ्यांना सूचना मुंबई : भारतात वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश न मिळालेले विद्यार्थी परदेशातील शिक्षणाचा मार्ग स्वीकारतात. यापैकी बहुतांश विद्यार्थी परदेशातील खासगी वैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. या…

 वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

प्रशासनाची धडक कारवाई   मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकाजवळ असलेली ४५ अनधिकृत बांधकामे गुरुवारी रेल्वेने आरपीएफ, शहर पोलिस आणि जीआरपीच्या मदतीने जमीनदोस्त केली.  ही सर्व अनधिकृत बांधकामे वांद्रे पूर्व बाजूच्या रेल्वे ओव्हरब्रिजजवळच्या रेल्वेच्या हद्दीत उभारली होती. या कारवाईसाठी जीआरपीचे ५६, आरपीएफचे ३४, शहर पोलिसांचे १७ अधिकारी आणि शिपाई असा फौजफाटा तैनात केला होता.  बांधकाम जमीनदोस्त करण्यासाठी २५ कामगार, २ जेसीबी आणि १ ट्रक वापरण्यात आला होता, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. …यामुळे उगारला बडगा पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर अनधिकृत उभारलेल्या बांधकामांमुळे रेल्वेच्या सुरक्षिततेला आणि वाहतुकीला धोका निर्माण झाल्याने ही कारवाई केली असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेच्या हद्दीत बांधलेली अनधिकृत बांधकामे बेकायदेशीर असून ती तत्काळ हटवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भायखळ्यातील उर्दू भवनचा मूळ शिवसेनेचा प्रस्ताव रद्द करा, भाजपची मागणी

मुंबई : भायखळ्यातील चांदोरकर मार्गावर पालिकेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या उर्दू भाषा भवनचा प्रस्ताव रद्द करावा आणि तेथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारण्यास नियमांची पूर्तता करून मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपने पालिका…

उद्धव सेनेच्या पराभूत उमेदवाराने व्हीव्हीपॅट मशीनमधील मते मोजण्याकरीता भरले 4 लाख ७२ हजार रुपये

डोंबिवली : डोबिवली विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात उद्धव सेनेचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी निवडणूक लढविली. या निवडणूकीत म्हात्रे यांचा पराभव झाला.…

लहान मुलांमध्ये लघुदृष्टिदोष मोबाइलचा बेसुमार वापर

मैदानी खेळांचा कंटाळा   मुंबई : मोबाइलचा बेसुमार वापर, मैदानी खेळांमधील कमी रूची या विविध कारणांमुळे बहुतांश मुलांमध्ये लघुदृष्टिदोष (मायोपिया) निर्माण झाल्याने चष्मा लावावा लागत आहे. शिवाय यावर उपाययोजना न…

 केईएम रुग्णालयात स्वतंत्र वेदना व्यवस्थापन शस्त्रक्रियागृह कार्यान्वित

वेदनांपासून सुटका होण्यास होणार मदत   मुंबई : गुडघा, खांदा आणि कंबरदुखीसारखे आजार व्यक्तीला नेहमीच हैराण करतात. मात्र आता योग्य व्यवस्थापन करून वेदनांमधून रुग्णांची सुटका करण्यासाठी केईएम रुग्णालयात स्वतंत्र वेदना व्यवस्थापन शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात आले आहे. यामुळे वेदनांपासून आराम मिळविण्यासाठी प्रतीक्षायादीत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. पाठदुखी, मानदुखी, खांदेदुखी, गुडघेदुखी, बोट ट्रिगर, नागीण, मायग्रेन, ट्रायजेमिनल, इंटरस्टिशियल सिस्टिटिस किंवा कर्करोग उपचारामध्ये रुग्णांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. विविध प्रकरणांमध्ये आजार बरा झालेला असतो, परंतु वेदना कायम असतात. अशा रुग्णांना वेदनांपासून मुक्ती देण्यासाठी केईएम रुग्णालयात २०११ मध्ये भूल विभागाच्या माध्यमातून वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला होता. हा विभाग भूल विभागाच्या प्रमुख डॉ. अमला कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. या विभागाला १४ वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्यांमध्ये ४५ ते ७० या वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक आहे. यात गुडघा दुखणे, पाठीचे आजार, खांदा दुखणे, पायाची नस खेचणे, पायाला मुंग्या येणे यांसारख्या आजाराने त्रस्त नागरिकांची संख्या अधिक आहे. यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागात दरआठवड्याला साधारणपणे २० ते २५ रुग्ण उपचारासाठी येतात. यापैकी १५ ते १६ रुग्णांना शस्त्रक्रियागृहामध्ये उपचार करण्याची आवश्यकता भासते. मात्र या विभागाचे स्वतंत्र शस्त्रक्रियागृह नसल्याने डॉक्टरांना अन्य विभागाच्या शस्त्रक्रियागृहाचा वापर करावा लागत होता. मात्र यासाठी त्यांना अन्य विभागाचे शस्त्रक्रियागृह रिक्त होण्याची वाट पाहावी लागत होती. त्यामुळे रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत होती. परिणामी, रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि भूल विभागाचे प्रमुख डॉ. अमला कुडाळकर यांच्या प्रयत्नाने वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागासाठी स्वतंत्र शस्त्रक्रियागृह उपलब्ध करण्यात आले. अत्याधुनिक, संसर्गविरहित असलेल्या या शस्त्रक्रियागृहामध्ये फक्त वेदनांपासून मुक्त होण्यावर उपचार केले जाणार आहेत. तसेच या शस्त्रक्रियगृहामुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होणार आहे. या शस्त्रक्रियागृहाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आल्याची माहिती भूल तज्ज्ञ आणि पेन फिजिशियन्स डॉ. श्वेता साळगावकर यांनी दिली. वेदनांमुळे तरुण त्रस्त सध्या घरातून कार्यालयीन काम करण्याचे प्रमाण वाढले असून ३० ते ४० वयोगटातील नागरिकांमध्ये स्नायू दुखण्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. हा त्रास बराच काळ राहिल्यास त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. या वेदनांमुळे तरुणांमध्ये ताण निर्माण होऊन त्यांना नैराश्याचा सामना करावा लागतो. शस्त्रक्रियागृहात कसे होणार उपचार शस्त्रक्रियागृहामध्ये साधारणपणे शस्त्रक्रिया केली जाते. मात्र या विभागांतर्गत शस्त्रक्रियागृहात उपचारासाठी घेण्यात येणाऱ्या रुग्णांची सोनोग्राफी आणि क्ष किरणाद्वारे कोणती नस किंवा स्नायू दुखत आहे, याची तपासणी करून त्या भागामध्ये इंजेक्शन दिले जाते. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते, अशी माहिती डॉ. श्वेता साळगावकर यांनी दिली. कोट वेदना व्यवस्थापन बाह्यरुग्ण विभागाचा विशेष फायदा महिलांना होणार असून सांधेदुखी, गुडघेदुखी, मानटुखी यासारख्या अनेक समस्यांनी महिला त्रस्त असतात. या वेदनांपासून सुटका करण्यासाठी वेदनाशामक गोळी घेतली जाते. पण त्याने फारसा फरक पडत नाही. केईएम रुग्णालयात वेदना व्यवस्थापन उपचार मोफत होत असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. यासाठी भूल तज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. – डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

ठाण्यातील पदपथ फेरीवाल्यांना आंदण

 सायंकाळच्या वेळी पदपथावरून चालणे अवघड   ठाणे : शहर पुन्हा फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकल्याचे दिसत आहे. रेल्वेस्थानका बाहेरील परिसरात सायंकाळच्यावेळी पदपथांवर फेरीवाल्यांचा बाजार भरत आहे. पदपथावर विक्री साहित्यासह ठाण मांडून बसलेले फेरीवाले आणि त्यांच्याकडे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे पदपथ अडविला जात आहे. हे फेरीवाले रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी विक्री करतात. या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना पदपथावरून चालणे शक्य होत नसून नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. तर, फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातून दररोज लाखोच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. या स्थानकाबाहेरील सॅटीस पुलाखाली सकाळच्या वेळेत फेरीवाले फारसे दिसून येत नाहीत. परंतू, सायंकाळ होताच या ठिकाणी फेरीवाले येण्यास सुरुवात होते. सायंकाळी घरी परतणारे अनेक नागरिक निवांत असतात, त्यामुळे ते काही तरी खरेदी करतील या उद्देशाने फेरीवाले वेगवेगळे साहित्य विक्रीसाठी घेऊन याठिकाणी बसलेले पाहायला मिळतात. खरंतर हा बाजार सायंकाळच्या वेळी कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरु लागला आहे. स्थानकाबाहेरील सॅटीस पुलाखाली, गावदेवी परिसर, नौपाडा, नितीन कंपनी तसेच स्थानक परिसरातील आंबेडकर पुतळा परिसरातही फेरीवाले पदपथ आणि रस्ते अडवीत असल्याचे दिसत आहे. या मार्गावरुन येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांना या फेरीवाल्यांचा प्रचंड त्रास होत आहे. महापालिका प्रशासनाचे या फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरातील रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांना आंदण दिले आहेत का असा सवाल काही नागरिकांकडून विचारला जात आहे. तर, फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई केली जात असून स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. नागरिक प्रतिक्रिया मी दररोज गावदेवी परिसरातून लोकमान्य नगरला जाण्यासाठी रिक्षा पकडतो. अनेकदा सायंकाळच्यावेळी याठिकाणी जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध नसतात. त्यामुळे रिक्षा येईपर्यंत थांबावे लागते. या रिक्षा थांब्याला लागूनच पदपथ असूनही फेरीवाल्यांमुळे रस्तावरच उभे राहावे लागत आहे अशी प्रतिक्रिया राज चव्हाण यांनी दिली. महापालिका प्रतिक्रिया स्थानक परिसर ते गावदेवी मंदिरापर्यंतचा सर्व परिसर फेरीवाला मुक्त केला आहे. फेरीवाल्यांसदर्भात नुकतीच आमची बैठक झाली. स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी आम्ही पूर्णपणे बंदोबस्त ठेवला आहे. यासाठी पथक नेमण्यात आले असून हे पथक दोन सत्रात काम करणार आहे. त्यामुळे सॅटीस पुलाखाली, पादचारी पुल, स्थानक परिसर, गावदेवी परिसर या ठिकाणी येत्या दिवसात एकही फेरीवाला दिसणार नाही. स्थानक परिसर ते गावदेवी मंदिर या १५० मीटर च्या क्षेत्रात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. तरी, या क्षेत्रात फेरीवाले दिसले तर, ताटकळ त्यांच्यावर कारवाई केली जाते. १५० मीटरच्या पुढील जे क्षेत्र आहे तसेच इतर परिसरातही अतिक्रमण विभागाची कर्मचारी नेमण्यात आली आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई नियमित सुरु आहे, अशी प्रतिक्रिया ठाणे महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उप आयुक्त शंकर पाटोळे यांनी  बोलताना दिली.

उपचाराअभावी गर्भातील बाळासह महिलेचा मृत्यू

हाणूमधील घटनेने खळबळ कासा : डहाणू तालुक्यातील एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा गर्भातील बाळासह मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पिंकी डोंगरकर ( २६) असे या गर्भवती…

लाडक्या बहिणी, सुना,लेकीवर बाबासाहेबांचे उपकार आहेत-राहुल हंडोरे

कल्याण : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल लिहून महिलांना सामानतेचा अधिकार देऊन संविधानात तशी तरतूद करून समस्त महिला वर्गावर, लाडक्या बहिणीवर, लाडक्या सुना लेकीवर उपकार…

 शौचालय उद्घाटनाने साजरा झाला जागतिक शौचालय दिन

 घोलाईनगरमध्ये १०० शौचालयांचे लक्ष्य पूर्ण, ठामपा आणि शेल्टर असोसिएट्स यांचा संयुक्त उपक्रम   अनिल ठाणेकर अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव करून देऊन स्वच्छतेसाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याचा उद्देशाने ठाणे महापालिका आणि शेल्टर असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात ‘एक घर एक शौचालय’ हा प्रकल्प राबवला जात आहे. घोलाई नगर, कळवा येथे या प्रकल्पा अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन करून जागतिक शौचालय दिन (१९ नोव्हेंबर) साजरा करण्यात आला. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्या मार्गदर्शनात कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या घोलाई नगर या ठिकाणी मागील काही दिवसांपासून या प्रकलपाची अमलबजावणी सुरू होती. या प्रकल्पांतर्गत लोकांनी घरात शौचालय बांधावे यासाठी संस्थेमार्फत मोफत शौचालय साहित्य पुरवले जाते. या प्रकल्पात १०० शौचालये बांधून पूर्ण झाली. जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने घोलाईनगर येथे छोटेखानी उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला. त्यानिमित्ताने, सजावट स्पर्धा, निबंध स्पर्धा यांच्यासह स्वच्छतेशी निगडित खेळही घेण्यात आले. त्यावेळी, कळवा प्रभाग समितीच्या मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वखारिया यांच्यासह शेल्टर संस्थेचे वैभव काळे, ज्ञानेश्वर आडे, योगिता शिंदे, पूजा भालेराव, कोमल इंगळे, समीक्षा राबाडे आदी उपस्थित होते. 0000