https://www.youtube.com/live/yHv3bDmLmZI?si=bX9OrqGn9po5QpIW
https://www.youtube.com/live/yHv3bDmLmZI?si=bX9OrqGn9po5QpIW
https://www.youtube.com/live/yHv3bDmLmZI?si=bX9OrqGn9po5QpIW
https://www.youtube.com/live/6ZmBe_SKIe8
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीतील मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष बाहेर आले आहेत. दहा मतदानोत्तर चाचण्यांपैकी सहा मतदानोत्तर चाचण्यात महायुतीला तर चार मतदानोत्तर चाचण्यांत महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेची संधी आहे, असे दाखवण्यात…
२० नोव्हेंबरला २०२४ ला मतदारांनी आपला हक्क बजावला व यामध्ये नेहमी पेक्षा जास्त मतदान झाले.यामुळे लोकोत्सवाला आगळेवेगळे महत्त्व आल्याचे दिसून आले व लोकोत्सव थाटात संपन्न झाला.कारण जास्त मतदान झाल्याचा फटका…
थोर शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस हे भारताचे पहिले जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ व वनस्पतीशास्त्रज्ञ होते. जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींमध्ये देखील प्राण्यांप्रमाणे संवेदना असतात हे हे प्रयोगाद्वारे सिद्ध केले. ऊन, पाऊस, थंडी, प्रकाश, ध्वनी…
लष्करी ताकद, जागतिक व्यापारावरील भक्कम पकड आणि जगाचा विरोध दुर्लक्षून प्रत्येक महत्वाकांक्षा तडीस नेणाऱ्या अमेरिकेच्या निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर आता जागतिक शक्तींचे संतुलन होते…
आरोपी मुलासहित वडिलांवर गुन्हा दाखल सुनिल इंगळे उल्हासनगर : एका अल्पवयीन मुलाने भरघाव वेगाने स्कूटर चालवून वृद्ध इसमाला धडक दिल्याने सदर वृद्ध गंभीरित्या जखमी झाला आहे. यासंदर्भात उल्हासनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे, मुलगा अल्पवयीन आहे हे माहीत असूनही त्याला त्याच्या वडिलांनी स्कूटर चालविण्यास दिली म्हणून पोलिसांनी आरोपी मुलासहित त्याच्या वडिलांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर _1 परिसरातील सी ब्लॉक या परिसरात असलेल्या कोणार्क रेसिडेन्सी या ठिकाणी बुधवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास मुख्य रस्त्यावर हा अपघात घडला. कोणार्क रेसिडेन्सी मध्ये राहणारे निरंजन हरेशलाल ठाकूर ( 62) हे रस्ता ओलांडून घराकडे जात असतांना सुझुकी बर्गमन या स्कूटरने भरघाव वेगाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा कार्तिक याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व स्कूटरने निरंजन यांना धडक दिली,या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी निरंजन यांचा मुलगा नितेश ठाकूर यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी कार्तिक गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासात कार्तिक हा अल्पवयीन असल्याने त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच मुलगा अल्पवयीन असून देखील तिच्या वडिलांनी त्याला स्कूटर चालविण्यास दिली म्हणून पोलिसांनी त्यांच्याविरोधात सुद्धा या अपघातात सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील हे करीत आहेत.
हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आता अवघ्या जिल्हावासीयांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, शनिवारी (दि. २३) सकाळी ८ पासून पंधराही मतदारसंघांत मतमोजणीस प्रारंभ होईल. त्यासाठीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यंदा जिल्ह्यातील ६९.१२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. १९६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंदिस्त झाले आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. बुधवारी (दि. २०) मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या-त्या मतदारसंघात उभारण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम सुरक्षितरीत्या जतन करण्यात आले आहे. शनिवारी मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ वाजता या स्ट्राँगरूम उघडल्या जाणार आहेत. मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिले असून, जिल्ह्याला नव्याने कोणते १५ आमदार लाभणार याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. मतदारसंघनिहाय मतमोजणी केंद्र नांदगाव : अतिरिक्त प्रशासकीय इमारत, नवीन तहसील कार्यायल इमारत, नांदगाव मालेगाव मध्य : शिवाजी जिमखाना, संगमेश्वर, मालेगाव मालेगाव बाह्य : शासकीय वखार महामंडळ गोदाम, मालेगाव बागलाण : मराठा हायस्कूल, स्काउट-गाइड हॉल, बागलाण कळवण : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कळवण चांदवड : नवीन प्रशासकीय इमारत, आयटीआय रोड, चांदवड येवला : पैठणी क्लस्टर गोदाम औद्योगिक वसाहत, एमआयडीसी, अंगणगाव, येवला सिन्नर : तहसील कार्यालय, सिन्नर निफाड : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, निफाड दिंडोरी : मविप्र कॉलेज, दिंडोरी नाशिक पूर्व : मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक नाशिक मध्य : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, नाशिक नाशिक पश्चिम : राजे छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम, सिडको, नाशिक देवळाली : जिल्हा निवडणूक गोदाम, सय्यदपिंप्री, ता. नाशिक इगतपुरी : शासकीय कन्या विद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, सीबीएस, नाशिक