Category: होम

२ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उद्या राज्यव्यापी लाक्षणिक संप

अनिल ठाणेकर ठाणे : २१ ऑगस्टला एक दिवसाचा राज्यव्यापी लाक्षणिक संप करून २ लाख अंगणवाडी कर्मचारी भगिनी मोठ्या संख्येने आझाद मैदानावर जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी…

चार गावांचा सनद वाटपाचा कार्यक्रम संपन्न-नितीन आटाळे

अशोक गायकवाड कर्जत : कर्जत तालुक्यातील चार गावांच्या सनदा नव्याने भारतीय सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त झाल्या असुन चार गावांच्या सनद वाटपाचा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाला, मौजे मानकिवली ता. कर्जत १००% सनद फी वसूल झाली. अशी माहिती उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांनी दिली आहे. सनदांची प्रिंट करून सनदा वाटप विषयाची माहिती कार्यालयाच्या ग्रुपवर त्याच दिवशी पाठविण्याची होती व सनद फी वसुल केलेली रक्कम मुख्यालय सहाय्यक यांच्याकडे जमा करायची होती. या कामास टाळाटाळ होता कामा नये. टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतां विरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल अशी सूचना देण्यात आली होती. संबंधीत गावचे ग्रामसेवक यांनी आपण सनद वाटप करण्यासाठी येणार असल्याची माहिती गावकऱ्यांना दिली होती. त्या अनुषंगाने बोरगाव येथे १५ ऑगस्ट २०२४ रोजी संजय गायकवाड भूकरमापक व निलेश जाधवर प्रतिलिपीक, माणकिवली येथे अण्णासाहेब सोमवंशी भूकरमापक व अभिजित मुजमुले अभिलेखापाल, कळंबोली तर्फे वरेडी येथे रामचंद्र कवटे निमतानदार व कृष्णा गायकवाड भूकरमापक, नसरापुर येथे कृष्णा गायकवाड भूकरमापक व सचिन थोरात भूकरमापक हे अधिकारी- कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते, असे उप अधीक्षक भूमि अभिलेख, शिरस्तेदार शैलेश जाधव यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय  पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

मुंबई. … येत्या 20 ते 25 ऑगस्ट या कालावधीत वरिष्ठ पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धा -२०२४,कोलकत्ता-पश्चिम बंगाल या ठिकाणीं होणार आहे. या स्पर्धेत  सहभागी होणारा महाराष्ट्राचा संघ खालील प्रमाणे महिला गट – ४७ किलो-काजल भाकरे ठाणे. ,४७ किलो -हर्षदा घोले ,मुंबई उपनगर,…

नागरीकांसाठी किटकजन्य रोग व साथरोगाची विशेष शिबीरांचे आयोजन

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रा मध्ये हिवताप / डेंगी, जलजन्यथ व साथरोग आजारांबाबत जनजागृती होणे करीता जाहिर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर शिबिरांकरीता नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.…

नवी मुंबईत ‘थर’ या मराठी चित्रपटाचे गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : तरुणांनी दहीहंडी खेळताना आठ थराच्या वरती थरावर थर रचा, परंतु अपघात होणार नाही,  याची दहीहंडी मंडळांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सुरक्षितपणे खेळ खेळावा आणि सणांचा आनंद घ्यावा. दहीहंडी…

आदिती तटकरे यांच्याहस्ते सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान

किसन जावळे, सोमनाथ घार्गे यांची उपस्थिती अशोक गायकवाड अलिबाग : महाराष्ट्र राज्य मंत्री आदितीताई तटकरे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या उपस्थितीत कर्जत येथील ” रक्षा” संस्थेच्या दोन शूरवीरांचा भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ वर्धापनदिन दिनानिमित्त सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान सोहळा पार पडला. भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान, अलिबाग येथे पोलीस ग्राउंड वर आयोजित केलेल्या कार्यक्रमात, कर्जत मधील सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान करण्यात आला. सुमित गुरव व अक्षय गुप्ता हे कर्जत येथील “रक्षा सामाजिक विकास मंडळ” या संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. यावर्षी पावसाळ्यामध्ये उत्पन्न झालेली पूर परिस्थिती व विविध आपत्कालीन परिस्थितीत स्वतःच्या जीवावर उदार होऊन सह्याद्रीच्या खडतर डोंगर रांगांमध्ये केलेले शोध व बचाव कार्य व आत्तापर्यंत करत आलेल्या देश सेवेबद्दल यांचा सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास मंत्री कु.आदितीताई तटकरे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.सुमित गुरव यांनी गिर्यारोहणाचे प्राथमिक प्रशिक्षण अधिकृत गिर्यारोहण संस्थेतून, जम्मू काश्मीर येथे घेतले आहे. याचबरोबर वायरलेस कम्युनिकेशन याचे प्रशिक्षण रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथून घेतलेले आहे. व त्यांनी अग्निशामन दलाचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.आणि याच बरोबर ते रायगड जिल्हा साठी ते अधिकृतरित्या “आपदा मित्र” म्हणून कार्यरत आहेत. तर अक्षय गुप्ता हे उत्तम गिर्यारोहक आहेत व उत्तम प्रकारचे सर्पमित्रही आहेत. यावर्षी जुलै महिन्यात पोसरी बेंडसे येथे एक व्यक्ती उल्हास नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जात असताना त्याला सुरक्षितरीत्या जिवंत बाहेर काढण्यात केलेले सहकार्य, तसेच माळशेज घाटातील हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा येथे एक व्यक्ती १४०० फूट खोल पडली होती त्यावेळेस केलेले सहकार्य, याचबरोबर ढाक भैरी येथे अडकलेल्या तीन युवकांना सुखरूपपणे बाहेर काढल्याबद्दल सुमित गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान गुरुवारी,(दि.१५ ऑगस्ट) भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ वा वर्धापन दिनानिमित्त अलिबाग येथे करण्यात आला.

 सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी पाच लक्ष रुपयांचे पहिले पारितोषिक

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2024 नवी मुंबई : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिनांक 7 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी शासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत…

शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ घ्यावा – रामेश्वर पाचे

ठाणे : अनुसूचित जाती नव बौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना (विशेष घटक योजना) जिल्हा परिषद,ठाणे मार्फत राबविण्यात येत आहे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ…

ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे रक्षाबंधन साजरे

आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका यांचा उपक्रम ठाणे : गेली अनेक वर्षे आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयचे राष्ट्रीय सेवा योजनचे स्वयंसेवक आणि विठाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे रक्षाबंधन साजरे केले जाते. यंदाही हा सोहळा मोठ्या आनंदात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण यांनी केले तेव्हा त्यांनी नमूद केले की, गेली २० वर्षे ते हा उपक्रम राबवित आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षला लिखिते यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन दशेपासून त्या मनोरुग्णालयात येऊन रक्षाबंधन साजरे करतात याविषयी सांगितले व संस्थेचे सचिव मा. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे देखील हा उपक्रम चालूच आहे याविषयी त्यांनी माहिती दिली. आपण समाजाचे देणे लागतो त्यामुळे आपण अशा विविध उपक्रमांना गेले पाहिजे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे याविषयी भाष्य केले आणि सगळ्यांना नारळी पौर्णिमा – रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना ही परंपरा चालू ठेवा असेही संबोधले. या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मुळीक सर, ममता मॅडम, जाधव मॅडम व इतर सहकारी स्त्री व पुरुष रुग्ण, शारदा एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या विश्वस्त व आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, कार्यक्रम अधिकारी प्रा. संजना भाबल, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अजय ब्राम्हणे, रजिस्ट्रार आकाश ढवळ, विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण, तुषार सावंत व इतर सदस्य मंडळी उपस्थित होते.

वाहतूक सेनेची कार्यकारिणी जाहीर

निलेश भोसले यांची सरचिटणीस पदी नियुक्ती मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिव वाहतूक करण्यात आली आहे. शिव वाहतूक सेनेच्या अध्यक्षपदी उपनेते भाऊ कोरगावकर यांची तर सरचिटणीसपदी नीलेश भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी संदीप (बाबू) मोरे, कोषाध्यक्षपदी विनायक मुरूडकर, उपाध्यक्षपदी साजिद सुपारीवाला, नरेश चाळके, शाम बिस्ट यांची तर सचिवपदी अमिरुद्दीन तालुकदार, विशाल आमकर, संदेश शिरसाट, उमर शरीफ सिद्दीकी यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.