Category: होम

 ठाण्यात भरदिवसा हवेत गोळीबार

 बंदूकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्याचा प्रयत्न ठाणे : ठाण्यातील बाळकूम भागात एका सराफाला बंदूकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु सराफाने प्रतिकार केल्याने चौघेही पळून जात होते. त्यावेळी एका बंदूकधारीने हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकारानंतर सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. बाळकूम येथील पाडा क्रमांक दोन परिसरात सराफाचे दुकान आहे. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सराफ दुकानामध्ये एकटा असताना चार जण त्यांच्या दुकानामध्ये शिरले. त्यातील एकाकडे बंदूक होती. चौघांनी बंदूकीचा धाक दाखवून सराफाला मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी सराफाने त्याच्याकडील एका दांडक्याने चौघांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर चौघे चोरटे पळून जात होते. सराफाने आरडाओरड केला. स्थानिक रहिवाशांनी चोरट्याचा पाठलाग केला तसेच एकाला पकडले. तर एका चोरट्याने हवेत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 00000

रायगडच्या जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख पदी सुनील इंदलकर

अशोक गायकवाड     रायगड : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड पदाची सूत्रे सुनिल इंदलकर यांनी हाती घेतली आहेत. यावेळी उप अधीक्षक भूमि अभिलेख, कर्जत नितीन आटाळे आणि शिरस्तेदार शैलेश जाधव यांनी इंदलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 0000

डोंबिवलीतील बेकायदा ‘राधाई’ भुईसपाट करण्यास न्यायालयाची दोन आठवड्यांची मुदत

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथील राधाई बेकायदा इमारत भुईसपाट करण्यास कल्याण डोंबिवली पालिकेला काही तांत्रिक अडथळे येत असल्याने ही इमारत भुईसपाट करण्यास दोन आठवड्याची मुदत वाढवून देण्यास मुंबई…

झाडांवरील जाहिरात तसेच रोषणाई प्रतिबंधाबाबत उद्यान विभागाचे जाहीर आवाहन

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे, जे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तथापि, काही व्यावसायिक त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करण्याच्या उद्देशाने रस्त्याकडील झाडांना खिळे…

‘हर घर तिरंगा’ अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे येथे कार्यक्रम संपन्न

ठाणे : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषद ठाणे येथे ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान अभियान साजरे करण्यात येत असून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने काल तिरंगा सन्मानाबाबत…

जिल्ह्यात प्रथमच होणार ११११ फुट भव्य दिव्य तिरंगा पदयात्रा

पनवेल : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्यावतीने रायगड जिल्ह्यातील खारघरमध्ये सर्वात मोठी ‘भव्य दिव्य ११११ फुट तिरंगा पदयात्रा’ होणार आहे.   स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्टला…

जुडो चॅम्पियन लीग स्पर्धा शिवनेरी किंग संघाची बाजी

मुंबई : नाशिक जिल्हा जुडो असोसिएशनच्या वतीने आमदार राहुल जी डिकले मित्र विहार क्लब आणि यशवंत व्यायाम शाळा यांच्या सहकार्याने मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी येथे तिसऱ्या जुडो…

माधवी घाग पाठांतर श्लोक स्पर्धेत अव्वल

डोंबिवली : गोविंदानंद सरस्वती न्यास (हर्डी -राजापूर, रत्नागिरी ) संचालित श्रीमदभगवदगीता पठण समिती डोंबिवली (विश्वस्त -विश्वास वामन नवरे ) या न्यासातर्फे घेण्यात आलेल्या श्रीमदभगवदगीतेच्या 18 व्या अध्यायातील श्लोक पाठांतर स्पर्धेत…

मुरबाडच्या महामार्ग वाहतूक समस्येत वाढ सरळगावमार्गे सुध्दा करावा लागतो खड्ड्यांतून प्रवास

राजीव चंदने मुरबाड : मुरबाड ते कल्याणच्या खड्डेमय तीस किलोमीटर प्रवासाला बेजार झालेल्या प्रवासी वर्गाच्या तक्रारी संपत नसतांना आता मुरबाड ते माळशेज घाट दरम्यानच्या महामार्गावरील वाढत्या खड्डयांना देखील तोंड द्यावे…