Category: होम

 ९ ऑगस्टपासून राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान

अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार     मुंबई : ९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येईल. यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग नोडल विभाग राहणार असून ग्रामविकास विभाग हा ग्रामीण भागासाठी तर नगर विकास विभाग हा शहरी भागांसाठी नोडल विभाग राहील. या काळात तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेला, तिरंगा सेल्फी अशा विविध माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. ९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येईल तसेच त्या त्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होतील.  १३, १४ आणि १५ ऑगस्ट असे ३ दिवस घरोघर तिरंगा फडकविण्यात येईल. —–०—–

मंत्रालयात प्रचंड गर्दी वाढल्याने, पोलिसांची तारांबळ

मुंबई :  राज्यात सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या भीतीने मंत्रालयात अधिकारी आणि कार्यकर्ते यांची  प्रचंड गर्दी वाढू लागली आहे. आज सकाळी  मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात अचानक लोकांची गर्दी वाढल्याने,…

 ठाणे जिल्हा प्रशासनाचे 100% अर्जांची तपासणी पूर्ण

 ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत जिल्ह्यात 5 लाख 47 हजार 870 अर्जांच्या नोंदी पूर्ण   ठाणे : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही योजना राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून ठाणे जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही प्रशासकीय क्लिष्टता न आणता सुलभता आणावी, अशा प्रकारच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्याला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त भगिनींचा या योजनेमध्ये सहभाग नोंदवून ठाणे जिल्हा राज्यात अव्वल राहील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी अत्यंत कठोर परिश्रम घेत “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेची यशस्वी अंमलबजावणी करीत असल्याचे दिसून येत आहे. “मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत जिल्ह्यात 5 लाख 47 हजार  870 अर्जांच्या नोंदी झाल्या असून 100% अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. यापैकी मान्यताप्राप्त अर्जांची संख्या 4 लाख 76 हजार 258 इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. गेले काही दिवस ठाणे जिल्हा प्रशासनातील महिला व बालविकास विभागासह अन्य विविध विभाग, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती मधील अधिकारी-कर्मचारी एकवटून या योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांवर अक्षरश: दिवसरात्र कार्यवाही करीत होते. “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सर्व महसूल यंत्रणांच्या वेळोवेळी बैठका घेवून या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने होत असलेल्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला होता. त्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सर्व महानगरपालिका आयुक्त, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, प्रकल्प अधिकारी तसेच महिला बचतगट, एकात्मिक बालविकास अधिकारी, प्रभाग अधिकारी, कर संकलन अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका त्याचबरोबर इतर विभागांच्याही अधिकारी-कर्मचारीवर्गाची मोलाची साथ लाभली. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी रात्रंदिवस परिश्रम घेवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. “मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद “मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत जिल्ह्यात 5 लाख 47 हजार  870 अर्जांच्या नोंदी झाल्या असून 100% अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. यापैकी मान्यताप्राप्त अर्जांची संख्या 4 लाख 76 हजार 258 इतकी असून 70 हजार 45 अर्ज हे त्रुटीयुक्त आहेत. तर 875 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यात मुरबाड तालुक्याची उत्तम कामगिरी जिल्ह्यात मुरबाड तालुक्याने उत्तम कामगिरी केली असून 38 हजार 308 अर्जांपैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 37 हजार 886 आहे. तर त्रुटीयुक्त 390 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 22 आहे. यानुसार जिल्ह्यात सर्वाधिक मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी मुरबाड तालुक्याची आहे. ही टक्केवारी 98.90 टक्के आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय नोंदी झालेली अर्ज संख्या आणि मान्यताप्राप्त अर्जांची टक्केवारी:- ठाणे तालुक्याने 1 लाख 87 हजार 900 अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी 1 लाख 87 हजार 900 अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 1 लाख 62 हजार 22 आहे. तर त्रुटीयुक्त 25 हजार 229 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 245 आहे. यानुसार ठाणे तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी 86.23 टक्के आहे. उल्हासनगर तालुक्याने 36 हजार 417 अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी 36 हजार 417 अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 27 हजार 593 आहे. तर त्रुटीयुक्त 8 हजार 592 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 10 आहे. यानुसार उल्हासनगर तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी 75.77 टक्के आहे. कल्याण तालुक्याने 1 लाख 6 हजार 657 अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी 1 लाख 6 हजार 657 अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 90 हजार 893 आहे. तर त्रुटीयुक्त 15 हजार 590 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 156 आहे. यानुसार कल्याण तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी 85.22 टक्के आहे. भिवंडी तालुक्याने 82 हजार 319 अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी 82 हजार 319 अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 72 हजार 754 आहे. तर त्रुटीयुक्त 9 हजार 341 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 218 आहे. यानुसार भिवंडी तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी 83.38 टक्के आहे.…

‘मविआ – महायुती ‘च्या नाकर्तेपणामुळेच मेडीकल कॉलेजला १२ लाखांचा दंड…!

दंड भरला तरी मान्यतेची टांगती तलवार कायम.! राजन चव्हाण   सिंधुदुर्ग : तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि विद्यमान महायुतीचं सरकार या दोघांकडून झालेलं दुर्लक्ष आणि नाकर्तेपणामुळंच सिंधुदूर्ग वैद्यकीय महाविद्यालयाला १२ लाख रुपये इतका दंड भरावा लागला आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन आज तीन वर्ष झाली. महाविकास आघाडीचं सरकार असताना अत्यंत घाईगडबडीत हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या वर्षी तर अत्यंत वाईट परिस्थिती होती.मान्यता मिळविण्यासाठी जिल्हा रुंग्णालयाच्या सर्वच इमारतींचा ताबा घेण्यात आला.’लेडीज हॉस्टेल’ व ‘मेस’ दाखवण्यासाठी आवारात असलेल्या डॉक्टरांच्या निवासस्थानाचा ताबा घेण्यात आला.तर ‘बॉईज हॉस्टेल’साठी चक्क    ‘आयटीआय ‘ च्या विद्यार्थ्यांसाठी नव्यानं बांधलेलं हॉस्टेल जबरदस्तीनं ताब्यात घेण्यात आलं.आज जिल्ह्याच्या विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज ये जा करताना  प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तर अन्य जिल्ह्यातून आलेल्या मुलांना आसपासच्या परिसरात भाड्यानं रहावं लागत आहे.परिणामी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 00000

इंटरनेटमुळे मुलांचे मैदानी खेळ व बालपण अलिप्त होतंय! – अदिती तटकरे

मुंबई : आपल्याला तंत्रज्ञानाच्या युगात चांगली नवीन पिढी घडवायची आहे. आपण लहान असताना बालपण जगलो. मैदानी खेळ खेळलो. परंतु, आजकालची मुलं मैदानी खेळाऐवजी मोबाइलमध्ये गेम खेळतात. त्यामुळे मुलांमध्ये मैदानी खेळ…

दिल्लीत UPSC परिक्षेची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना योग्य सोयीसुविधा पुरवा-वर्षा गायकवाड

मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेतील टक्का वाढण्यासाठी दिल्लीत अभ्यास करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना निवास, ग्रंथालय, अभ्यासिका व खाण्यापिण्याची व्यवस्था तातडीने उपलब्ध करून द्यावी.जुने महाराष्ट्र सदन किंवा आणखीन…

सिडकोच्या ५० वर्षापूर्वीच्या ‘हिरव्या’ बस परिवहन सेवेतील १५८७ कामगार आजही न्यायाच्या प्रतीक्षेत

मुंबई : चोवीस तास धावणाऱ्या मुंबई शहराचा भार हलका करण्यासाठी १९७४ साली सिडकोने सुनियोजित असे नवी मुंबई शहर वसवले. यासाठी सिडकोने मुंबई व नवी मुंबई शहराला जोडणारी ‘हिरव्या’ रंगाची परिवहन…

 एआयएमने दिला भारत बंदचा इशारा

 सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षण निर्णयाविरुद्ध रमेश औताडे     मुंबई : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आरक्षण अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसताना आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्यास मान्यता देताना तो अधिकार राज्य सरकारांना देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. जातीनिहाय आकडेवारी पाहता योग्य हा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी ए एम आय ‘आंबेडकरवादी इंडिया मिशन’ने केली असून २१ ऑगस्टला भारत बंद चा इशारा दिला आहे. कायदेतज्ज्ञ, संविधानतज्ञ व इतर जेष्ठ आर पी आय नेत्यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत हा इशारा दिला आहे.  संविधान तज्ज्ञ ऍड. डॉ. सुरेश माने, पँथर नेते सुरेश केदारे, विचारवंत प्रशांत रूपवते, जेष्ठ पत्रकार सुनील खोब्रागडे, शिक्षण तज्ज्ञ डॉ. जी. के. डोंगरगावकर, चर्मकार नेते अच्युत भोईटे, जेष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, सतीश डोंगरे उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचा अनाकलनीय आणि वादग्रस्त ठरलेला हा काही पहिलाच निकाल नाही. आजवर असे आरक्षणविरोधी आणि दलितांच्या हिताला मारक निकाल अनेकदा दिले गेले आहेत. असे सांगत ऍड डॉ सुरेश माने म्हणाले, यापूर्वी ‘अट्रोसिटी ॲक्ट ‘ निष्प्रभ करणाऱ्या एका निकालावरून २ एप्रिल २०१८ रोजी दलित संघटनांनी ‘भारत बंद’ केला होता. त्यावेळी देशभरात हिंसाचार माजल्यानंतर केंद्र सरकारने निर्देश दिल्यानंतर त्या निकालाचा फेरविचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाला भाग पडले होते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची चिरफाड करीत उपवर्गीकरणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ईडब्लूएस आरक्षणाचा ५६५ पानांच्या आपल्या निकालात एकदाही उल्लेख का केलेला नाही? ही गोष्ट विशेष आणि आश्चर्यकारक नव्हे काय ? असा सवाल माने यांनी यावेळी करत २१ ऑगस्ट रोजी भारत बंद चा इशारा दिला आहे. ०००००

वार्षिक उद्योग पाहणी सन २०२२-२३ च्या क्षेत्रकामाची कार्यशाळा

ठाणे : वार्षिक उद्योग पाहणी क्षेत्रकामासंबंधी संकल्पना सुस्पष्ट होण्याच्या आणि क्षेत्रकामादरम्यान संकलित केलेल्या आकडेवारीची गुणवत्ता उंचाविण्याच्यानुषंगाने अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय / जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील सर्व क्षेत्रीय अधिकारी /…

रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते एस. के. नाईक यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती

अशोक गायकवाड     पनवेल : रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती एस. के. नाईक यांची भाजपा तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात अली असून सदरचे नियुक्तीपत्र त्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विस्तारित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड.प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, शहर अध्यक्ष अनिल भगत, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.