Category: होम

 स्वच्छता कार्यात लोकसहभाग वाढीवर भर देण्यासोबतच शहर स्वच्छतेकडे

अधिक बारकाईने लक्ष देण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश   नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ ला सामोरे जाताना स्वच्छता विषयक विविध उपक्रमांमध्ये व दैनंदिन बाबींमध्ये अधिक व्यापक…

 डॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी दिला भाजपचा राजीनामा;

कॉँग्रेस पक्षात घेतला प्रवेश ;   मुंबई : मुंबई विद्यापीठात बायोलॉजिकल विभाग प्रमुख म्हणून अनेक वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा आणि भारतीय जनता पक्ष प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर डॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी आझाद मैदान, मुंबई येथील राजीव गांधी काॅंग्रेस भवन येथे मुंबई विभागीय काॅंग्रेस अध्यक्षा, खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार वर्षाताई गायकवाड यांनी डॉ. उज्ज्वला जाधव यांना काॅंग्रेस पक्षात प्रवेश देतांना त्यांच्या हाती काॅंग्रेस पक्षाचा झेंडा दिला आणि पक्षाच्या मजबुतीसाठी डॉ. उज्ज्वला जाधव या उत्तम काम करतील असा विश्वास व्यक्त केला. काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी एक भला मोठा पुष्पहार मुंबई काॅंग्रेस अध्यक्षा खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड आणि डॉ. उज्ज्वला जाधव यांना घालून आनंद व्यक्त केला. डॉ उज्ज्वला जाधव या २०१४ पासून भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळी डॉ उज्ज्वला जाधव यांनी  भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष लल्लुसिंग आर्य, प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. डॉ उज्ज्वला जाधव यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला तेंव्हा माजी आमदार अशोक जाधव, विविध पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला असतांना भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले भारताचे संविधान बदलण्याची भाषा वारंवार करीत होते. यासाठी चारशे पार चा नारा दिला जात होता. मी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची निष्ठावंत कार्यकर्ती असून भारतीय संविधानाशी एकनिष्ठ असल्याने मला ही भारतीय जनता पार्टीची भूमिका पटत नव्हती म्हणून मी भारतीय जनता पक्ष सोडण्याच्या निष्कर्षाप्रत आले होते. काॅंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, मुंबई काॅंग्रेस अध्यक्षा खासदार प्रा वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री नसीम खान आदींची भेट घेऊन चर्चा केली आणि अखेर आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच त्यांच्या प्रचंड यशस्वी झालेल्या भारत जोडो व भारत न्याय यात्रेने प्रभावित होऊन प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश घेतला, असे डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले. प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी लवकरच डॉ. उज्ज्वला जाधव यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा सुनिल तटकरे यांनी घेतला आढावा

महायुतीमध्ये ज्या मतदारसंघात उमेदवारी मिळणार नाही तिथे माझ्या कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही – सुनिल तटकरे शिर्डी : आपल्याला महायुतीत सर्वच ठिकाणी उमेदवारी मिळेल असे नाही मात्र ज्याठिकाणी उमेदवारी मिळणार नाही तिथे माझ्या कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शिर्डी येथे दिला. आज राज्यव्यापी दौऱ्याचा दुसरा दिवस असून सकाळी साईबाबांचे दर्शन घेऊन शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनिल तटकरे यांनी घेतला. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्ता जागरुक असला पाहिजे.आगामी विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जायचे आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला आपल्याला उत्तर देण्याचे काम करायचे आहे असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या जिल्हयाने अजितदादांना नेहमीच पाठबळ दिले आहे. हे भरभक्कम  पाठबळ कायम मिळण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. लोकसभा निवडणूकीत आणि आताही अजितदादांना सर्वाधिक टार्गेट करण्यात येत आहे. हे आपला मित्रपक्ष करत नाहीय तर आपल्यावर सतत लक्ष ठेवून असलेले विरोधातील काहीजण ही बदनामीची मोहिम राबवत आहेत त्यांना सडेतोड उत्तर दयायचे आहे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. जनसामान्यांचे पाठबळ कसे मिळेल अशी भूमिका घेतली तर पक्षसंघटना अजून मजबूत होणार आहे.जनसामान्यांचे प्रश्न घेऊन तुम्हाला संघटनेने दिलेल्या पदाचा उपयोग कसा करता येईल यावर काम करा असा सल्लाही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आपले विचार मांडले. शिर्डी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक शिर्डी येथे आज पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, उत्तर शिर्डी जिल्हाध्यक्ष कपिल पवार, प्रदेश सचिव संग्राम कोतेपाटील, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

उत्तर, पश्चिम भारतात परिवर्तनाचे वारे का?

मागोवा भागा वरखडे नेहमी उत्तम यश मिळवून देणाऱ्या उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाजपच्या ६७ जागा कमी होणे हा निवडणुकांना कलाटणी देणारा मुद्दा भाजपसाठी चिंतनाचा विषय ठरला.…

प्रभू रामचंद्र आणि हनुमंताने फिरविली पाठ; अहंकाराच्या उडाल्या ठिकऱ्या !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशातील सुमारे शंभर कोटी मतदारांनी हातात घेतलेल्या या निवडणुकीत अनेकांचे ‘हिशेब’ चुकते केले. धर्माचा आणि प्रभू रामचंद्र तसेच महावीर हनुमंताच्या नावाने बाजार मांडणाऱ्यांकडे…

गरज नव्या शैक्षणिक धोरणाची…

महाराष्ट्रात पोलिस शिपायांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ हजार ४७१ जागांसाठी राज्यभरातून १७ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे. त्यात अनेक उच्चशिक्षितहीस असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण…

देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र

दिल्लीश्वरांचे पुन्हा शिक्कामोर्तब नवी दिल्ली: देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यावर आज दिल्लीश्वरांनी पुन्हा शिक्कामोर्तब केले. आगामी विधानसभा निवडणूक भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असून फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री…

महायुतीत ‘बोंबा बोंब’

संजय शिरसाठांची भुजबळ तर, मिटकरींची भाजपाविरोधात बोंब स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर भाजपाप्रणीत महायुतीतील धुसफूस दिवसागणिक सार्वजनिक होऊ लागली आहे. आपल्या पक्षाच्या नेत्याला वाचवण्याच्या नादात पक्षाचे प्रमुख प्रवक्ते दुसऱ्या पक्षाविरोधात बोंब…

रिक्षा, टॅक्सी चालकांनाही आता ग्रॅच्युईटी मिळणार !  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट  मुंबई :  रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी खुशखबर आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांना आता ग्रॅच्युईटी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.  ग्रॅच्युईटीसाठी रिक्षा, टॅक्सी चालकांना फक्त वर्षाला 300 रुपये भरावे लागणार, अशी घोषणा  मुख्यमंत्री शिंदेंनी केली…