Category: होम

रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने रविवारी ज्येष्ठ व विधवा महिलांसाठी मोफत छत्री वाटप – भास्कर बैरीशेट्टी

अनिल ठाणेकर   ठाणे : स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने  शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी २३ जून रोजी करण्यात आल्याची माहिती सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी यांनी दिली आहे. पावसाळा सुरू होत आहे. पावसापाण्यात महिलांना संरक्षण मिळावे या हेतुने स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी यांच्यावतीने शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी, २३ जून २०२४ रोजी,सायंकाळी ७ वाजता, जनसंपर्क कार्यालय, उपवन सोसायटी, शिवाई नगर शिवसेना शाखेजवळ, ठाणे (प) येथे करण्यात आले करण्यात आले आहे. छत्री वाटप कार्यक्रमध्ये जो उपस्थित राहील आणि कूपन आणेल त्यालाच छत्री मिळेल. छत्री वाटपाची कूपन जनसंपर्क कार्यालय येथून घेऊन जाणे. कूपन शिवाय छत्री दिली जाणार नाही. एका व्यक्तीला एकच कूपन दिले जाईल आणि एका व्यक्तीला एक कूपन एक छत्री दिली जाईल. एका कूपन व्यतिरिक्त दुसरे कूपन आणले तर छत्री मिळणार नाही. कार्यक्रमानंतर कूपन आणल्यास छत्री मिळणार नाही, याची नोंद घ्यावी, तरी या छत्रीवाटप कार्यक्रमास महिलांनी मोठ्यासंखेने उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक कार्यसम्राट माजी नगरसेविका सौ. रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी व सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी  यांनी केले आहे. ०००००

कोकण पदवीधर-शिक्षक मतदारांना २६ जूनला विशेष नैमित्तीक रजा मंजूर-अमोल यादव

अशोक गायकवाड   नवी मुंबई : कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावणेसाठी मतदानाच्या दिवशी दि. २६ जून, २०२४ रोजी पदवीधर-शिक्षक मतदारांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे. अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिनांक २४ मे २०२४ च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या घोषित कार्यक्रमानूसार कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार दि.२६ जून २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत या वेळेत होणार असून, मतमोजणी दिनांक ०१ जुलै, २०२४ रोजी होणार आहे. विधानपरिषद शिक्षक/ पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा. यासाठी पदवीधर/ शिक्षक निवडणूकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तीक रजा जाहीर करण्यात आली आहे. सदरची रजा ही त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व्यतिरिक्त असणार आहे. या रजे बाबतचा शासन निर्णय www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जाहीर करण्यात आलेल्या नैमित्तीक रजेचा लाभ घेऊन पदवीधर- शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने मतदानाचा हक्क बजावाव असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले आहे. 00000

फ्लाईंग शीख मिल्खा सिंग

भारतातीलच नव्हे तर जगातील महान धावपटूत ज्यांची गणना होते असे भारताचे महान धावपटू फ्लाईंग शीख मिल्खा सिंग यांची आज पुण्यतिथी. फ्लाईंग शीख अशी उपाधी मिळालेल्या मिल्खा सिंग यांचा जन्म २०…

१८ जून हा का आहे काळा दिवस?

१८ जून १९५१ रोजी पहिली घटना दुरुस्ती झाली. अनुच्छेद ३१ (ए) व (बी) मध्ये बदल करून, नवे परिशिष्ट-९ संविधानात घुसडण्यात आले. मूळ संविधानात हे परिशिष्ट नव्हते. या परिशिष्टात टाकलेले कायदे…

वेध डॉ. चंद्रशेखर टिळक केरळमध्ये दाखवलेले राजकीय अस्तित्व, ओरिसामध्ये विधानसभा आणि लोकसभेत मिळालेले घवघवीत यश, कर्नाटकमध्ये आटोक्यात राहिलेली पडझड आणि दाक्षिणात्य राज्यांमध्ये मतांच्या टक्केवारीत झालेली वाढ या सगळ्याचे प्रतिबब एनडीए…

एलन मस्क प्रकरणाचा अन्वयार्थ…

देशात लोकसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत सर्वच विरोधी पक्ष हे येत्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष ईव्हीएम मशीन हॅक करून घोटाळा करणार असा आरोप करीत होते. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यावेळी भारतीय जनता…

सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे-चव्हाण

कराड – महाविकास आघाडीत कुठेही बिघाडी नाही. आम्ही १८० जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू, सांगलीच्या निकालातून धडा घ्यायला हवा असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी करून उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, साताऱ्यात महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला हे मान्य करावे लागेल. आम्ही यात…

ठाणे-रायगड जिल्ह्यात मोठी पोलीस भरती

ठाणे : पोलीस दलात नोकरीच्या अनुषंगाने तयारी करणार्‍यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ठाणे आणि रायगड (Raigad) जिल्ह्यात विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या पोलीस भरतीची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात 422 पोलीस पदांसाठी 31 हजार 63 अर्ज दाखल झाले आहेत. तर ही भरती 21 जूनपासून…

महाराष्ट्रात प्रभारी-सहप्रभारीपदी केंद्रातील दोन मंत्र्यांची नियुक्ती

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यातील संघटनात्मक बदलही केली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी…