Category: होम

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या- एकनाथ शिंदे

 अशोक गायकवाड मुंबई:तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषी मूल्य व किंमत…

विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक मतदानाच्या वेळेत वाढ

रायगड : विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक मतदानाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे.मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजेपासून सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अशी असेल.अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा…

विदयार्थ्यांकडुन ॲडमिशन, इमारत निधी, डोनेशनच्या माध्यमातून कोटींची लुटमार

अशोक गायकवाड कर्जत : कर्जतधील सरकारी, निमसरकारी, खाजगी शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कॉलेज यांचेकडे इमारत निधी व ॲडमिशन शुल्कवाढीचा हिशोब प्रत्येक पालकाने माहितीच्या अधिकाराने घ्यावा, असे मत ॲड. कैलास मोरे, राज्य प्रवक्ता सम्यक विदयार्थी आंदोलन यांनी व्यक्त केले आहे. १० वी व १२ वी चे निकाल लागले त्यानंतर पुढील प्रवेश प्रकीया सुरू आहे. कर्जतमधील अनेक शाळा / कॉलेज इमारत निधी तसेच प्रवेश शुल्काच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या भरमसाठ फी वसुली करीत आहेत. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ तसेच फी घेणेसंदर्भातील इतर कायदयानुसार, शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अशा शाळा/कॉलेजनी विदयार्थ्यांकडुन नियमानुसार प्रवेश शुल्क आकारले पाहिजेत. परंतु अनेक शाळा/कॉलेज कायदयाचे व नियमांचे पालन न करता विदयार्थ्यांकडून भरमसाठ इमारत निधी तसेच इतर शुल्काच्या नावाखाली पैसे वसुल करीत आहेत. सदरची बाब विदयार्थ्यावर अन्यायकारक आहे.माझेकडे अनेक विद्यार्थी १० व १२ वीचे पुढील अॅडमिशन प्रकीयेसाठी आले असता अनेक विद्यार्थ्यांची फी मी कमी केली आहे. परंतु हे करत असताना एक प्रश्न उपस्थित झाला आहे की, शाळा/कॉलेज च्या मनमानी कारभाराविरुद्ध शासन/प्रशासन कुणाचेच लक्ष नाही? शिक्षण हा मानवाच्या जीवनातला महत्त्वाचा भाग आहे. त्याच शिक्षणाचं बाजारीकरण झाले आहे. आणि यावर कोणीही ब्र शब्द काढायला तयार नाही. तसेच ही लुटमार सर्व सामान्य उघड्या डोळ्याने पाहत आहे. ही खुप खेदाची गोष्ट आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातून ह्या संस्था/संचालक पैशाने गबर झाले आहेत. त्यांचा हिशोब घेणेचा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. प्रत्येक पालकाने आपल्या परिसरातील ज्या अनुदानित/ विनाअनुदानित खाजगी शाळा/ कॉलेज असतील त्या प्रत्येक शाळा/कॉलेज मध्ये माहितीच्या अधिकारात खालील माहिती विचारा. १. मागील ५ वर्षात इमारत निधी व अॅडमिशन शुल्क अशी किती रक्कम संस्थेकडे जमा झाली व खर्च झाली? २. इमारत निधी व प्रवेश शुल्क ठरवताना आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता केली का? ३. इमारत निधी व प्रवेश शुल्क निश्चित करताना शासनाची परवाणगी घेतली का? ४. दरवर्षी इमारती निधीच्या नावाखाली घेतलेल्या पैशातून किती इमारती बांधल्या? ५. संस्थेला आलेल्या डोनेशनची माहिती ? ६. मागील ….वर्षात दरवर्षी खरेदी केलेल्या जमिन मालमत्तांची तपशीलवार माहिती ? ७. गेल्या ५ वर्षाचा संस्थेचा ऑडीट. ८. संस्थेची घटना व माहिती.ही माहिती सर्व पालकांनी तसेच सर्व सामान्य नागरीकांनी आपल्या परिसरातील शाळा/कॉलेजकडे मागावी तरचं शिक्षणाच्याबाजारीकरणाला आळा बसेल अन्यथा सर्वसामान्यांची लुटमार होतंच राहील.असा इशारा ॲड. कैलास मोरे यांनी दिला आहे.

अस्तान येथे दरड कोसळली

खेड : दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील अस्तान धनगरवाडी येथे भूस्खलनामुळे दरड कोसळून रस्तावर आल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. तब्बल १२ तासांनी रस्त्यावरील माती हटवून रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे. १८ गाव…

नीट परिक्षाच रद्द करा- पटोले

मुंबई : नीट परिक्षेत झालेल्या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींना शिक्षा केली पाहिजे आणि ही परिक्षाच रद्द करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. नीट परिक्षेत घोटाळा झालेला…

धरणक्षेत्र अजूनही कोरडीच… दमदार पावसाची प्रतीक्षा

मुंबई : मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. धरणांमध्ये मंगळवारी ५.६४ टक्के पाणीसाठा होता. मुंबईत गेले दोन – तीन दिवस संध्याकाळी पाऊस पडत असला…

कांद्याने रडवल्याची मुख्यमंत्र्यांची कबूली

मुंबई : लोकसभा निवडणूकीत संविधान बदलणार हे सांगण्यात आलं, चारशे पारचा नारा देण्यात आला, लोकांनी हे डोक्यात ठेवलं आणि गडबड झाली त्यात कांद्याच्या निर्यातीवरून झालेला घोळ होताच या कांद्याने आम्हाला रडवले अशी कबुली…

ठाण्यात होर्डींगची ‘झाडाझडती’

ठाणे : मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला होता. त्यापार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेकडून आता अशी दुर्घटना ठाण्यात घडू नये म्हणून होर्डींगची झाडाझडती सुरु करण्यात आली आहे.अनेक होर्डिंग मालकांना नोटीस पाठवली आहे. तसेच अनधिकृत होर्डिंग महापालिकेकडून…

‘आषाढी वारी’साठी यंदा ५००० बसेस सोडणार

मुंबई : विधानसभा निवडणूकीपुर्वी आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव होणार असून भाविकांना कोणताही तास होऊ नये यासाठी सरकारने आतापासूनच कंबर कसली आहे. पंढरीच्या वाराची तयारीही प्रशासनाकडून सुरू झली आहे. आषाढी  यात्रेनिमित्त…