पालघरचा मुकुट कोणाकडे?
वसई : पालघर लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी (ता. २०) उत्साहात पार पडले. जिल्ह्यात उष्णतेचा पारा अधिक असला, तरी शांततेत मतदान पार पडले. ग्रामीण भागातदेखील नागरिक मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर…
वसई : पालघर लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी (ता. २०) उत्साहात पार पडले. जिल्ह्यात उष्णतेचा पारा अधिक असला, तरी शांततेत मतदान पार पडले. ग्रामीण भागातदेखील नागरिक मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर…
कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी उड्डाणपूलावर बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ठाण्याहून मुंबईच्या दिशने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर सिमेंट मिक्सर वाहन उलटले. या…
गणेश पालकर क्रिकेट क्लबला विजेतेपद मुंबई : दिलीप वेंगसरकर फाउंडेशनच्या वतीने ओव्हल मैदान, चर्चगेट येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत गणेश पालकर क्रिकेट क्लब संघाने विजेतेपद पटकावले.…
नवी मुंबई : 13 मे रोजी सायं. 4 नंतर सुरू झालेले वादळी वारे आणि अकाली पर्जन्यवृष्टी कालावधीत मुंबईत घाटकोपर येथे होर्डींग पडून घडलेल्या दुर्घटनेनंतर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी…
ठाणे : निवृत्तीवेतन कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी कोणत्याही प्रकारच्या दूरध्वनीद्वारे व्यवहार करण्यापूर्वी कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी व अपर कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) सुरेंद्र राऊत यांनी केले आहे.…
अशोक गायकवाड मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांनी दिलेली मैत्री, करुणा, मुदीता आणि उपेक्षा (समता) हि शिकवण व्यक्तींना, समाजाला तसेच राष्ट्रांना नेहमीच…
मुंबई : नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावीत. रेल्वे, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांसह विविध विभागांशी योग्य समन्वय साधून ५ जूनपर्यंत नाल्यातील गाळ काढण्याची कामे पूर्ण करा, आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. तसेच उपायुक्त, सहायक आयुक्तांनी आपल्या विभागात दररोज सकाळ, सायंकाळी विभागात नाल्यातील गाळ काढण्याची पाहणी करावी. पाणी साचण्याच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून पाण्याचा जलद गतीने निचरा होण्याकामी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची आढावा बैठक पालिका आयुक्त गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात झाली. अतिरिक्त पालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, डॉ. अमित सैनी, अभिजीत बांगर, डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे आदी अधिकारी बैठकीस उपस्थित होते. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्यातून गाळ उपशाची कामे जलद गतीने करण्यात येत आहेत. नाल्यांमधून उद्दिष्टाएवढे किंवा त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम ५ जून अखेरपर्यंत पूर्ण करावे. या मुदतीत ही कामे पूर्ण होतील, त्या दृष्टीने नियोजन करून संपूर्ण यंत्रणेने कार्यवाहीला वेग द्यावा, अशा सूचना आयुक्त गगराणी यांनी दिल्या. नाल्यातील गाळ काढण्याची कामे योग्यरीत्या सुरू आहेत, हे पाहण्यासाठी पालिकेच्या उपायुक्त, सहायक आयुक्तांनी नाल्यांच्या ठिकाणी भेट द्यावी, असे स्पष्ट करतानाच आयुक्त म्हणाले की, नाल्यालगतच्या रहिवाशांकडून नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी असल्या तरीदेखील तरंगत्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. नाले तुंबता कामा नयेत, याची दक्षता घ्यावी, रुंद नाल्याच्या ठिकाणी ‘ट्रॅश बूम’चा वापर करावा. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्यांचा सहयोग घ्यावा, असेही गगराणी यांनी नमूद केले. रेल्वे हद्दीतील नाले साफ करा रेल्वे प्रशासनासमवेत समन्वय साधून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह कल्व्हर्ट स्वच्छता कामांची पाहणी करावी. विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावावेत, मुंबई शहरात पाणी साचू नये, त्याचा जलद गतीने निचरा व्हावा, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश आयुक्त गगराणी यांनी दिले आहेत.
ठाणे : जिल्हा सामान्य रुग्णालय गरीब आणि गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. महागड्या आणि अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून या रुग्णालयातील डॉक्टर मोलाची कामगिरी बजावत आहेत. केवळ जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे; तर इतर राज्यातील गरजू रुग्णांनादेखील हे रुग्णालय आधार देत आहे. गुजरातमधील अशाच एका गरजू रुग्णावर मोठी शस्त्रक्रिया करून येथील डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला आहे. या रुग्णाच्या यकृतावर आठ फोड आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात पू तयार झाला होता. महाराष्ट्रातील काही राजकीय नेते गुजरात मॉडेलचे कौतुक करत असतात; मात्र याच राज्यातून एका रुग्णाने गंभीर आजारावर योग्य उपचार व्हावेत, यासाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आधार घेतला. गुजरातमधील सुरत शहरात वाहन चालवण्याचे काम करणाऱ्या या रुग्णावर तेथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र तेथे त्याच्यावर योग्य उपचार होत नव्हते. त्याच्या पोटात दुखत असल्याने त्याला तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवाय रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला तेथील खर्चदेखील परवडणारा नव्हता. त्यामुळे शांताराम चव्हाण (३०) नामक रुग्णाला या आजारावर ठाणे जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात चांगले उपचार होतात, याची माहिती मिळताच त्याने ठाणे या रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार अणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णाच्या सर्व तपासण्या केल्या असता त्याच्या यकृतावर आठ फोड झाल्याचे निदान झाले. शिवाय या फोडांमध्ये पू देखील झाला होता. ते फोड आतच फुटले तर रुग्णाच्या जीविताला मोठा धोका होता. त्याच्या छातीतही पाणी झाले होते. तज्ज्ञ डॉक्टरांनी सुरुवातीला त्याच्या छातीमधील पाणी काढून नंतर मोठ्या कौशल्याने अवघड शस्त्रक्रिया केली. तसेच त्याच्या यकृतावरील आठही फोड काढून टाकले. शस्त्रक्रियेनंतर त्याची योग्य काळजी घेऊन पंधरा दिवसांच्या उपचारानंतर त्याला घरी सोडून देण्यात आले, अशी माहिती डॉ. निशिकांत रोकडे यांनी दिली. रुग्णावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकात वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. विश्वास वासनिक, डॉ. श्रीजित शिंदे, डॉ. प्रतीक बिश्वास आदी होते.
बदलापूर : मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी झाल्यास बदलापूर शहराला पुराचा तडाखा बसतो. त्यामुळे बदलापूर शहरात पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या नाल्यांच्या सफाईचे काम कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने हाती घेतले आहे. शहरातील १३ मोठ्या नाल्यांसहित इतर गटारे व नाल्यांच्या सफाईचे काम सुरू केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकारी श्रेया शिरवटकर यांनी दिली आहे. पावसाळा आणि बदलापूर शहराचे जणू जुने समीकरण आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर, २०१८, २०१९ मध्येही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती; मात्र प्रत्येक वर्षीच बदलापूर शहरातील पश्चिमेकडील अनेक सखल भागांत जास्त पाऊस पडल्यास पाणी साचते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पालिकेने नालेसफाईचे काम पूर्ण करणे अपेक्षित असते. यंदा लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात पालिकेचा सगळा कर्मचारी वर्ग व्यस्त असल्याने नालेसफाईच्या कामाला उशिरा सुरुवात झाली आहे. मात्र तरीही निवडणुकीची कामे पूर्ण करत शहरातील नालेसफाईला आठवडाभरापूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. बदलापूर पूर्व येथील शिरगाव गावातून पुढे आपटेवाडी, कात्रप, स्टेशन परिसर व पुढे पश्चिमेला शनिनगर, हेंद्रेपाडा इथून निघणारा हा नाला उल्हास नदीला जाऊन मिळतो. या नाल्याची सफाई करण्यात येत आहे. तसेच शहरात एकूण १३ मोठ्या नाल्यांच्या सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडे असणाऱ्या जेसीबी व पोकलेनच्या साह्याने नालेसफाईला सुरुवात केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. साधारण शहरातील संपूर्ण नालेसफाई ३१ मे पूर्वी पूर्ण होईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकारी श्रेया शिरवटकर यांनी दिली आहे.