Category: होम

खर्च विषयक बाबींसाठी आयोगाकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

  ठाणे:-  ठाणे,भारत निवडणूक आयोगाने ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक बाबींसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. २३ भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून चित्तरंजन धनगडा माझी (आयआरएस), २४ कल्याण मतदारसंघासाठी नकुल अग्रवाल (आयआरएस) आणि २५  ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमती चंद्रा प्रकाश मीना (आयआरएस) व राहिल गुप्ता (आयआरएस) यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने कळविली आहे.

निवडणूक आयोगाच्या गोदामात सापडले सापाच्या विळख्यातील भंगारजमा ईव्हीएम !

ठाणे जिल्ह्यातून २६ ईव्हीएम गायब झाल्याची तक्रार असताना २७ भंगारजमा ईव्हीएम सापडले ! अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा निवडणूक सुरु असतानाच आणि देशभर ईव्हीएमबाबत उलटसुलट चर्चा सुरु असतानाच निवडणूक आयोगाच्या ताब्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील गाळ्यात सापाच्या विळख्यातील भंगारजमा ईव्हीएम सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महत्वाचे म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून २६ ईव्हीएम गायब झाल्याची तक्रार असताना २७ भंगारजमा ईव्हीएम सापडल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिकेच्या मालकीचे दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील प्रेक्षक गॅलरी (स्टॅण्ड)च्या खाली काही रिकाम्या खोल्या आहेत. यातील  खोलीत निवडणूक आयोगाकडून निवडणूकीशी संबंधित काही गोष्टींचा साठा करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या ताब्यातील खोलीत २०१४ च्या निवडणुकीनंतर निवडणुकीशी संबंधित काही वस्तु ठेवल्या असल्याची आठवण १० वर्षानंतर निवडणूक आयोगातील अधिकार्‍यांना झाली. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी, ठाणे नगर पोलीस ठाण्यातील पोलीस, तलाठी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासह येथे धाव घेत सदर खोली उघडण्याचा प्रयत्न केला. अर्धवट तुटलेल्या दरवाजाचे कुलुप चावीने उघडण्याचा प्रयत्न केला असता ते उघडले जात नसल्याने दगडाने कुलुप तोडून दरवाजा उघडण्यात आला. सदर खोलीत प्रवेश केला असता खोलीत वीजेची व्यवस्था नसल्याचे आढळून आले. मोबाईल टाॅर्चच्या उजेडात खोलीत पहाण्याचा प्रयत्न केल्यावर गंज लागलेल्या अवस्थेतील अनेक पेट्या आढळून आल्या. या पेट्या उघडल्यावर निवडणूक आयोगाच्या गोदामात सापडले. सापाच्या विळख्यातील पेटीमध्ये शेकडो तयार मतदान ओळखपत्रे, बंद लिफाफे व २७ भंगारजमा झालेले ईव्हीएम आढळून आले. महत्वाचे म्हणजे या खोलीत सापांचे अस्तित्व आढळून आले. गंज लागलेल्या पेटींवर साप फिरताना दिसत होते. ठाणे महापालिकेकडून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खोली २०१४ साली गोदाम म्हणून वापरण्यासाठी निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. ही खोली जवळपास १० वर्षे उघडण्यातच आली नव्हती आता लोकसभा निवडणूका सुरु असताना २०२४ साली ही खोली उघडण्यात आली. यात सापडलेले शेकडो तयार मतदान ओळखपत्रांचे वाटपच झाले नसल्याचे दिसून येते आहे. २०१४ साली ठाणे जिल्ह्यातील २६ ईव्हीएम गायब झाल्याची तक्रार करण्यात आली होती. येथे तर प्रत्यक्षात भंगारजमा झालेले २७ ईव्हीएम सापडले असल्याने गायब झालेले ईव्हीएम हेच आहेत का याची चौकशी करण्याची मागणी विरोधी राजकीय पक्षांनी केली आहे. अशावेळी याची शहानिशा न करताच सापडलेले या सर्व वस्तू चक्क भंगारात विकण्याचे आदेश संबंधित यंत्रणेकडून देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. याविषयी ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. चौकट निवडणूक आयोगाच्या गोदामात सापडलेल्या ईव्हीएमबद्दल ट्विटरवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, ही घटना म्हणजे काय निर्लज्जपणा चाललेला आहे ते पहा. लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रयत्न आहे, असे म्हटले आहे.

वारसा कर आणि वादात भर!

विशेष प्रमोद मुजुमदार गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे सल्लागार सॅम पित्रोदा यांच्या वारसा करासंबंधीतील वक्तव्याकडे निवडणुकीच्या प्रचारसभेचा कल वळला आणि पक्षाने जणू ‘सेल्फ गोल’ केला. दुसरीकडे कर्नाटक सरकारवर मुस्लीमांना ओबीसी…

हवामानबदल आणि जागतिक तणावामुळे महागाई वाढण्याची शक्यता

रिझर्व्ह बँकेने आपल्या मासिक अहवालात हवामानातील बदल आणि जागतिक तणावाला महागाई कमी होण्याचा सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. हवामान खात्याने आपल्या अंदाजात म्हटले आहे की या उन्हाळी हंगामात कमाल…

लोकसंख्या शिक्षण काळाची गरज

विशेष श्याम ठाणेदार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात भारताने चीनला मागील वर्षीच मागे सारून अव्वल स्थान प्राप्त केले. तज्ज्ञांनी २०२३ साली भारत चीनला मागे सारून सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल…

शरद पवार उर्वरित महाराष्ट्राची माफी मागतील?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अमरावती येथे येऊन अमरावतीतील नागरिकांची माफी मागितली होती. त्यांनी आता इथे न थांबता विदर्भात झालेल्या शेतकरी आत्महत्यांबाबत वैदर्भियांची माफी मागावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री…

प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ !

बुलढाणा : चीनने मोठ्या प्रमाणावर निवडणूक रोखे खेरदी करून भाजपाला लाभ करून दिला आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनविरुध्द ब्रही काढायला तयार नाहीत, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी…

मराठा आरक्षणची सुनावणी जूनपर्यंत पुढे ढकलली

मुंबई : महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय श्रेणीतील मराठ्यांच्या नोकऱ्या अन् शिक्षणातील १० टक्के कोट्याच्या आव्हानावर मुंबई उच्च न्यायालय १३ जून रोजी पुन्हा सुनावणी सुरू करणार आहे. स्थगिती मागणाऱ्या सर्व याचिकांवर…

त्यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही – फडणवीस

जळगाव : इंजिनमधे केवळ चालक बसतो. शरद पवार यांच्याकडे सुप्रिया सुळे यांना जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा आहे. यांच्या इंजिनमध्ये फक्त यांच्या परिवारासाठी जागा आहे, सामान्य माणसासाठी नाही. यांच्यासाठी यांचा परिवार दुनिया…