Category: देश

National-News

इंग्लंड-आशिया इनडोअर क्रिकेट स्पर्धा

भारतीय पुरुष संघाला पराभवाचा धक्का कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेत रंगत भरली जात असून काल भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला व भारत (२०.५ गुण) गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर फेकला गेला तर श्रीलंका (३५.५ गुण) व इंग्लंड (२१ गुण) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. या स्पर्धेत भारताला अजून एक सामना सिंगापूर विरुध्द खेळायचा असल्याने भारत अंतिम सामन्यात खेळताना दिसेल. इतर सर्व संघाचे साखळी सामने झाले असल्याने व त्यांना गुण वाढवण्याची कोणतीही संधी नाही. गुणतालीकेतील पहिले दोन संघ अंतिम सामना खेळातील. काल झालेल्या इंग्लंड विरुध्दच्या सामन्यात भारताचे खेळाडू प्रचंड दबावाखाली खेळताना दिसले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात ७५ धावा केल्या तर प्रती उत्तरादाखल…

राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी तमिळनाडूच्या निलगिरी येथून उड्डाण घेत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली, अशी बातमी पीटीआयने दिली आहे. तमिळनाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी निलगिरी येथे…

गुजरातचा विकास मी करणारच- मोदी

नवी दिल्ली:  गुजरातचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, असे माझे मत आहे. मी मुख्यमंत्री असल्यापासून माझा हा एकच मंत्र राहीला आहे, असे प्रतिपाद पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी केले. ते सोमवारी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी…

ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा चाकूहल्ला

 चर्चमध्ये प्रार्थनेवेळी माथेफिरूचा हल्ला सिडनी: ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी चाकूहल्ल्याची घटना घडली आहे. सिडनीच्या एका चर्चमध्ये माथेफिरूने बिशप आणि इतर अनुयायांवर प्रार्थना सुर असताना थेट हल्ला चढविला. या घटनेचा व्हिडिओ…

इंग्लंड-आशिया इनडोअर क्रिकेट स्पर्धेत भारत गुणतालिकेत अव्वल

भारतीय पुरुष संघाचा श्रीलंका डेव्हलपमेंट व सिंगापूरला दणका कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-आशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या…

मोदींच्या गॅरंटीचा जाहीरनामा सादर

नवी दिल्ली : पुन्हा सत्तेत आल्यास देशभर समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक लागू करण्यासोबतच ७० वर्षांच्या सर्व वयोवृद्धांना तसेच तृतीयपंथीयांना आयुष्यमान योजना लागू करण्याच्या १० महत्त्वपूर्ण घोषणांची मोदींच्या…

इंग्लंड-एशिया इनडोअर क्रिकेट कप स्पर्धेला श्रीलंकेत सुरुवात

भारतीय पुरुष व पुरुष मास्टर्स संघाची घोषणा कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेवर स्पर्धा संचालक म्हणून हिरान डी मेल यांची निवड झाली आहे. हि स्पर्धा इनडोअर अरीना, ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा, कोलंबो, श्रीलंका येथे सुरु झाली आहे. या स्पर्धेत यजमान श्रीलंकेसह, भारत, सिंगापूर असे तीन आशियायी देश व इंग्लंड सहभागी झाले आहेत. हि स्पर्धा १८ एप्रिल रोजी या स्पर्धेतील अंतिम सामने खेळवले जातील. भारतीय पुरुष संघाच्या कर्णधारपदी धनुष भास्करची तर उप कर्णधारपदी दैविक रायची (दोघेही कर्नाटक) वर्णी लागली आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी मुंबई, महाराष्ट्राच्या जयेश साळगावकरची निवड झाली आहे. जयेश साळगावकर याआधी सिंगापूरकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. या संघातील इतर खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. विजय गौडा, सुरज रेड्डी, अफरोज पाशा, कार्तिक सुब्रमनिअयन, एम. मल्लिकार्जुन, वैभव गुरुदत्त, अमरसिंग वर्मा, आशिक ख्रिस्त्य, जश जोशी व अधिराज जोहरी. हे सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी झालेल्या वेगवेगळ्या निवड चाचणी स्पर्धांमधून निवड केले आहेत. पुरुष मास्टर्स गटाच्या (४०+) भारतीय संघाच्या कर्णधारपदी प्रसन्ना कुमार (कर्नाटक) तर उप कर्णधारपदी प्रशांत कारीया (महाराष्ट्र) यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथील प्रशांत कारीयाच्या रूपाने महाराष्ट्राला प्रथमच भारताचे उपकर्णधार पद वाट्याला आले आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी प्रकाश राठोड यांची निवड केली आहे. या संघातील इतर खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. नरेश खुराना, प्रो. चिरंथना नंजप्पा, अंशुल शर्मा, अभिषेक वेस्ली, केशव रेड्डी, समीर शाह, राकेश चव्हाण, गौरव कांबळी, झुबीन हकीम, डॉ. सुनील मूर्थी यांची निवड करण्यात आली आहे. या भारतीय संघाची घोषणा इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेश (IISF) चे  अध्यक्ष अजय नाईक व सचिव मिलिंद पुंजा यांनी केली.

एनडीएची महाराष्ट्रासह राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये पिछेहाट होणार

सर्व्हेतील धक्कादायक आकडेवारी समोर नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूकीत एनडीएची महाराष्ट्रासह राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये पिछेहाट होणार असल्याची धक्कादायक आकडेवारी सर्व्हेतून समोर आलीय. लोकसभा निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या १९ एप्रिल…

केजरीवालांना हायकोर्टाचा झटका

जामीन फेटाळला;ईडीची कारवाई योग्यच नवी दिल्ली:  दिल्लीचे अटकेत असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाने झटका दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेची कारवाई योग्य ठरवली आहे. अटक योग्य की चूक…

“नरेंद्र मोदी जिंकले तर पुन्हा निवडणुका होणार नाहीत”

अर्थमंत्री सीतारमण यांच्या पतीची टीका नवी दिल्ली : देशातील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत”, अशी खरमरीत टीका  अर्थमंत्री सीतारमण यांच्या पती परकला…