Category: देश

National-News

इंग्लंड-एशिया इनडोअर क्रिकेट कप स्पर्धेला श्रीलंकेत सुरुवात

भारतीय पुरुष व पुरुष मास्टर्स संघाची घोषणा कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेवर स्पर्धा संचालक म्हणून हिरान डी मेल यांची निवड झाली आहे. हि स्पर्धा इनडोअर अरीना, ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा, कोलंबो, श्रीलंका येथे सुरु झाली आहे. या स्पर्धेत यजमान श्रीलंकेसह, भारत, सिंगापूर असे तीन आशियायी देश व इंग्लंड सहभागी झाले आहेत. हि स्पर्धा १८ एप्रिल रोजी या स्पर्धेतील अंतिम सामने खेळवले जातील. भारतीय पुरुष संघाच्या कर्णधारपदी धनुष भास्करची तर उप कर्णधारपदी दैविक रायची (दोघेही कर्नाटक) वर्णी लागली आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी मुंबई, महाराष्ट्राच्या जयेश साळगावकरची निवड झाली आहे. जयेश साळगावकर याआधी सिंगापूरकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. या संघातील इतर खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. विजय गौडा, सुरज रेड्डी, अफरोज पाशा, कार्तिक सुब्रमनिअयन, एम. मल्लिकार्जुन, वैभव गुरुदत्त, अमरसिंग वर्मा, आशिक ख्रिस्त्य, जश जोशी व अधिराज जोहरी. हे सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी झालेल्या वेगवेगळ्या निवड चाचणी स्पर्धांमधून निवड केले आहेत. पुरुष मास्टर्स गटाच्या (४०+) भारतीय संघाच्या कर्णधारपदी प्रसन्ना कुमार (कर्नाटक) तर उप कर्णधारपदी प्रशांत कारीया (महाराष्ट्र) यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथील प्रशांत कारीयाच्या रूपाने महाराष्ट्राला प्रथमच भारताचे उपकर्णधार पद वाट्याला आले आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी प्रकाश राठोड यांची निवड केली आहे. या संघातील इतर खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. नरेश खुराना, प्रो. चिरंथना नंजप्पा, अंशुल शर्मा, अभिषेक वेस्ली, केशव रेड्डी, समीर शाह, राकेश चव्हाण, गौरव कांबळी, झुबीन हकीम, डॉ. सुनील मूर्थी यांची निवड करण्यात आली आहे. या भारतीय संघाची घोषणा इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेश (IISF) चे  अध्यक्ष अजय नाईक व सचिव मिलिंद पुंजा यांनी केली.

एनडीएची महाराष्ट्रासह राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये पिछेहाट होणार

सर्व्हेतील धक्कादायक आकडेवारी समोर नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूकीत एनडीएची महाराष्ट्रासह राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये पिछेहाट होणार असल्याची धक्कादायक आकडेवारी सर्व्हेतून समोर आलीय. लोकसभा निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या १९ एप्रिल…

केजरीवालांना हायकोर्टाचा झटका

जामीन फेटाळला;ईडीची कारवाई योग्यच नवी दिल्ली:  दिल्लीचे अटकेत असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाने झटका दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेची कारवाई योग्य ठरवली आहे. अटक योग्य की चूक…

“नरेंद्र मोदी जिंकले तर पुन्हा निवडणुका होणार नाहीत”

अर्थमंत्री सीतारमण यांच्या पतीची टीका नवी दिल्ली : देशातील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत”, अशी खरमरीत टीका  अर्थमंत्री सीतारमण यांच्या पती परकला…

राहुल गांधींनी राजकारणातून एक पाऊल मागे घ्यावे

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित असलेला निकाल न मिळाल्यास राहुल गांधी यांनी राजकारणातून माघार घेण्याचा विचार करावा, असा सल्ला राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत…

रामेश्वरम कॅफे स्फोटात भाजपा कार्यकर्ता ताब्यात

काँग्रेसचा सनसनाटी दावा बंगळूरु: काँग्रेसने आज भाजपावर खळबजनक आरोप केला आहे.  तपास यंत्रेणेकडून म्हणजेच ‘एनआयए’कडून बंगळुरु बॉम्बस्फोट प्रकरणात भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन याबाबतचे…

काँग्रेसची गॅरंटी महिलांना लखपती करणार

जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५ गॅरंटी जाहीर नवी दिल्ली- महिलांना वर्षाला एक लाख रुपयांची मदत देण्याची गॅरंटी देणारा निवडणूक जाहीरनामा आज काँग्रेसने प्रसिध्द केला. या जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५…

तैवानमध्ये महाभीषण भूकंप

तैपैई : गेल्या २५ वर्षात झाला नाही इतका महाभीषण भूकंपाने आज बुधवारी सकाळी तैवान हादरले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची ७.२ इतकी नोंद झाली आहे. या भूकंपामध्ये अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. तैवान…

कधी ना कधी भाजपचे सरकार जाणार

राहुल गांधींनी दिला कठोर कारवाईचा इशारा नवी दिल्ली : आयकर विभागाने काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला सुमारे 1800 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. ही नोटीस…

केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दिल्लीत ‘इंडीया’ रणशिंग फुंकणार

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील प्रमुख नेते असलेल्या अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्याने आम आदमी पक्षाकडून या अटकेविरोधात देशभरात आंदोलनं करून ईडी आणि केंद्र सरकारचा निषेध केला जात आहे. आता विरोधी…