Category: रायगड

raigad news and updates

मे.इझिनॉक्स स्टिल्स लि. कंपनीच्या समपहरण केलेल्या मालमत्तेचा जाहीर लिलाव

अशोक गायकवाड रायगड : मे.इझिनॉक्स स्टिल्स लि.कंपनीच्या समपहरण केलेल्या मालमत्तेचा तहसील कार्यालय, खालापूर येथे सोमवार, २३ डिसेंबरला जाहीर लिलाव होणार आहे. लिलाव घेण्यास कोणीही न आल्यास किंवा योग्य बोली न लागल्यास सचिन किर्दत, तलाठी सजा सावरोली यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने रु. १/- नाममात्र बोलीवर लिलाव घेण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.अशी माहिती खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली आहे. मे.इझिनॉक्स स्टिल्स लि. तर्फे डायरेक्टर सुधीर गुप्ता, रा. आनंदवाडी-सावरोली, ता. खालापूर, यांच्याकडून येणे असलेल्या जमीन महसूलाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी, विनिर्दिष्टी केलेल्या मालमत्तेचे समपहरण करण्यात आले असून विक्रीसाठी यामध्ये निश्चित केलेल्या दिवसापूर्वी तलाठी सजा सावरोली यांना, देय रक्कम दिली नसेल तर, उक्त मालमत्ता, तिच्यावर बसविण्यात आलेल्या सर्व भारापासून व तिच्या संबंधात करण्यात आलेली सर्व अनुदाने व संविदा यांपासून मुक्त, अशी मालमत्ता तहसिल कार्यालय, खालापूर येथे सोमवार,दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता, जाहीर लिलावाव्दारे विकण्यात येणार आहे, असे खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी कळविले आहे. गाव आनंदवाडी भू- मापन क्रमांक व पोट-विभाग सं. नंबर क्रमांक ५/१, क्षेत्र (चौमी) ४ हजार ७००, उपविभागीय अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार संबंधीत क्षेत्रासाठी हातची किंमत १ कोटी १८ लाख ६४ हजार २००, उपविभागीय अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार क्षेत्र रु.३८१० चौमी साठी हातची किंमत १ कोटी १८ लाख ६४ हजार २००, देय असलेल्या जमीन महसूलीची थकबाकी १ कोटी ०२ लाख २२ हजार ७६०.

रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने उज्ज्वल परंपरा कायम राखली – सखाराम पवार

अशोक गायकवाड अलिबाग :रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेला एक उज्ज्वल परंपरा आहे. ही परंपरा आजही या संघटनने कायम ठेवली आहे. याचे उदाहरण आजचा जिल्हा मेळावा आहे, असे कौतुगोद्गार रा.जि.प.…

५०व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा – हरिद्वार, उत्तर प्रदेश – २०२५.

महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी साखळीत दोन विजयाने बाद फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा केला.   मुंबई:- महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी “५० व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” साखळी सामन्यात सलग दोन विजय मिळवीत…

माथेरान नगर परिषदेकडून मच्छरदाणीचे वाटप

माथेरान : माथेरानचा संपूर्ण भाग हा जंगलाने व्यापलेला असून यामध्ये काही प्रमाणात विषारी सापांचे प्रमाण असल्यामुळे थंडीच्या दिवसात हे साप कधी कधी चुकून घरामध्ये शिरतात. आणि या विषारी सापांपासून कुणालाही…

अत्याधुनिक ड्रोन प्रणालीद्वारे सागरी सीमांवर नजर ठेण्यात येणार – मंत्री नितेश राणे

अशोक गायकवाड रायगड : महाराष्ट्र राज्याच्या जलधीक्षेत्रात होत असलेली अवैध मासेमारी रोखण्यासाठी राज्य शासनाने ठोस उपाययोजना केल्या आहेत. अत्याधुनिक ड्रोन प्रणालीद्वारे सागरी सीमांवर नजर ठेण्यात येणार असून या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या…

लोकशाही दिनात ३० दिवसांत कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरावर अर्ज करा – किशन जावळे*

अशोक गायकवाड रायगड : तालुकास्तरीय लोकशाही दिनात ३० दिवसांत कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरावर अर्ज करता येईल असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे. लोकशाही दिनामध्ये अर्जदाराने आपल्या वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारींचे…

 ई रिक्षा चालू ठेऊन बिनधास्तपणे उपोषण करा!

पर्यटकांसह पालकांची मागणी   माथेरान : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरान मध्ये प्रायोगिक तत्त्वावर एकूण २० ई रिक्षा सुरू आहेत. सहा महिन्यांचा हा पायलट प्रोजेक्ट डिसेंबर मध्ये पूर्ण झाला असून उर्वरित…

उन्हाळ्यात ‘हर घर जल’ की पुन्हा पायपीट ?

विक्रमगड : भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने २०१९ मध्ये जलजीवन मिशनअंतर्गत हर ‘घर नल, हर घर जल’ योजना सुरू केली योजना आहे. ग्रामीण कुटुंबाला दरडोई दररोज ५५ लिटर नळाचे पाणी नियमितपणे…

‘नमो चषक’ भव्य दिव्य स्वरूपात होणार – रामशेठ ठाकूर

अशोक गायकवाड पनवेल :मागिल वर्षी नमो चषक क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्याच अनुषंगाने यंदा नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात होईल, असा विश्वास माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी…

तळोजा तुरुंगाधिकाऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला

 लाच घेताना झाली होती अटक अशोक गायकवाड पनवेल : तळोजा तुरुंगाधिकाऱ्यांना लाच घेताना झाली होती अटक. याप्रकरणी दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्या. जयराज वडणे यांनी तुरुंगाधिकारी निवृत्ती कन्नेवाड यांचा…