कपिल पाटील पुन्हा मंत्री, वामन म्हात्रे महापौर होतील
वन मंत्री गणेश नाईक यांचे भाकीत बदलापूर: गुणी लोकप्रतिनिधींच्या मागे उभे राहणे माझे काम आहे. तसेच ज्यांच्यात धमक असते ते कधीही माजी होत नाहीत. कपिल पाटील हे जिल्हा परिषदेचे…
raigad news and updates
वन मंत्री गणेश नाईक यांचे भाकीत बदलापूर: गुणी लोकप्रतिनिधींच्या मागे उभे राहणे माझे काम आहे. तसेच ज्यांच्यात धमक असते ते कधीही माजी होत नाहीत. कपिल पाटील हे जिल्हा परिषदेचे…
अशोक गायकवाड रायगड : कृषी विभागामार्फत सन-२०२३ या वर्षांमध्ये जिल्ह्यातील कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्थानी विविध कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे…
रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने १७ दिवसात ३९५ कलमे व ९ परिशिष्ट्ये असणारी जगातील सर्वांत मोठे संविधान लिहिले आणि २६ जानेवारी १९५० पासून या देशात संविधान…
अशोक गायकवाड रायगड : जिल्हा उद्योंग केंद्रामार्फत जिल्ह्यातील निर्यात प्रचालन कार्यशाळा सोमवार, ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वा.नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या यांनी दिली आहे. विकास आयुक्त (उद्योग) यांच्या निर्देशानुसार ‘राज्यामध्ये निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष साध्य करण्यासाठी आणि निर्यात वाढीला प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनवण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाच्या जिल्हा हे निर्यात केंद्र उपक्रमाला प्रोत्साहन देण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्यात प्रचालन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमास सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधित कामकाज करणारे घटक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या यांनी केले आहे. ००००
गडचिरोली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नववर्षाच्या पहिल्या दिवशी गडचिरोलीतील विविध उपक्रमात व्यस्त होते. फडणवीस यांच्या उपस्थितीत कोट्यावधीचे इनाम असलेल्या कमांडकर तारक्कासह ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यावेळी फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत…
पुणे ग्रामीण, रायगड, ठाणे शहर उपांत्य फेरीत सांगली:- पुणे ग्रामीण, रायगड, ठाणे शहर यांनी ५१व्या कुमार/ कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमार गटात उपांत्य फेरी गाठली. यजमान सांगलीला मात्र उपांत्य फेरी गाठण्यासाठी “सुवर्ण चढाई” पर्यंत झुंजावे लागले. सांगली विरुध्द पुणे ग्रामीण आणि ठाणे शहर विरुध्द रायगड अशा उपांत्य लढती होतील. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असो.ने युवक मराठा मंडळाच्या सहकार्याने राज्य संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सांगली,सांगलीवाडी येथील चिंचबाग मैदानावर सुरू असलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सांगलीने सुवर्ण चढाईच्या डावात नंदुरबारचा ३०-२९ असे चकवित उपांत्य फेरी गाठली. सुरवातीपासून अतितटीने खेळला गेलेल्या या सामन्यात पूर्वार्धात १३-१२ अशी आघाडी सांगलीकडे होती. पण नंदुरबारने पूर्ण डावात त्यांना २३-२३असे बरोबरीत रोखले. ही कोंडी सोडविण्याकरीता ५-५ चढायांचा जादा डाव खेळविण्यात आला. त्यानंतर ही २९-२९ अशा बरोबरीत हा डाव संपला. शेवटी सामन्याच्या नियमानुसार सुवर्ण चढाई देण्यात आली. त्याकरिता पुन्हा नाणेफेक करण्यात आली. नंदुरबारच्या बाजूने नाफेकीचा कौल लागला. पण नंदुरबारचा खेळाडू चढाईत गुण घेऊ न शकल्याने पंचाने त्याला बाद दिले. आणि सांगलीने एकच जल्लोष केला. आदित्य येसगुडे, व्यंकटेश वडार यांच्या झंझावाती चढाया त्यांना ओम् शिंदे, प्रतीक जाधव यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे सांगलीला हा विजय मिळविता आला. प्रणव मराठे, आलम मंसुर, पृथ्वीराज गलांडे पाटील, अतुल रोठोड यांचा खेळ नंदुरबारच्या विजया करीता थोडासा कमी पडला. पुणे ग्रामीणने ५-५ चढाईत कोल्हापूरचे आव्हान ३१-३० असे संपविले. पहिल्या डावात १३-१० अशी आघाडी घेणाऱ्या पुणे ग्रामीणला कोल्हापूरने पूर्ण डावात २५-२५ असे बरोबरीत रोखले. या बरोबरीमुळे दोन्ही संघाना ५-५ चढाया देण्यात आल्या. त्यात एका गुणांनी पुणेकरांनी बाजी मारली. प्रणव भांगर, साहिल माने यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. कोल्हापूरच्या समर्थ देशमुख, शुभम रेपे यांनी शेवटच्या १० मिनिटात भन्नाट खेळ करीत. सामन्यात बरोबरी साधली. पण विजय मात्र त्यांच्या पासून दूरच राहिला. रायगडने परभणीवर ३८-३३ अशी मात केली. विश्रांतीला १९-१२ अशी आघाडी घेणाऱ्या रायगडला परभणीने नंतर कडवी लढत दिली. राज मोरे, नीरज मिसाळ यांच्या दमदार चढाया त्यांना समीर हिरवे, हर्ष सुकर यांची मिळालेली भक्कम बचावाची साथ यामुळेच रायगडने हे साध्य केले. परभणीच्या रमेश गायकवाड, बाबुराव जाधव, विजय तारे यांनी विश्रांतीनंतर आपला खेळ उंचावत कडवी लढत दिली. शेवटच्या सामन्यात ठाणे शहरने मुंबई उपनगर पश्र्चिमचा ३७-३३असा पाडाव केला. आक्रमक सुरुवात करीत ठाण्याने पहिल्या डावात २१-१२ अशी मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात उपनगरने आपला खेळ गतिमान करीत ही आघाडी कमी करीत आणली. पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडले. आफताब मंसूरी, आदित्य पिनाने, सोहम जाधव यांच्या सर्वांगसुंदर खेळाने ठाण्याने हा विजय साकारला. उपनगरच्या ओम् कुदळे यांनी आक्रमक चढाया करीत ही आघाडी कमी केली. पण पायाला असलेल्या दुखापतीमुळे तो आपल्या संघाला पूर्ण न्याय देऊ शकला नाही. त्याला अर्शद चौधरी, अश्विन देसाई यांची मोलाची साथ लाभली. विजयापासून मात्र उपनगर दूरच राहिले.
माथेरान : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक हौशींकडून जल्लोष केला जातो. यात पार्टी करून मद्यपान केले जाते. यातून काही जण नशेत वाहन चालवितात. परिणामी अपघात होतात. तसेच भर रस्त्यात किंवा…
चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात प्रवाशी सुखरूप. माथेरान : सगळीकडे थर्टीफस्टची धामधूम सुरू असताना नेरळ माथेरान घाटात पर्यटकाच्या वाहनाला भीषण अपघात घडला.सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी दैवबलवत्तर म्हणून यातील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले आहेत.चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सुरक्षा कठड्यावरून आदळून खालच्या रस्त्यावर येवून आपटली.यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले. कार रस्त्यातच मध्ये असल्याने येणाऱ्या वाहनांना काही काळ अडथळा निर्माण झाला होता. पुणे नंबर पासिंग असलेली एम एच 12 बी बी 3333 क्रमांकाची ईनोवा कार मधील पर्यटक हे माथेरान फिरून परतीच्या प्रवासाला नेरळ दिशेने निघाले होते.कारचालक माथेरान घाट उतरत असताना कड्यावरचा गणपतीकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रक रस्त्याच्या 134 या क्रमांकावर वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्ता सोडून सुरक्षा कठडा असणारा कठडा चढून खालच्या वळणा वरील रस्त्यात आदळली.यामध्ये कारचे नुकसान झाले होते,परतू कार मधील पर्यटक सुखरूप होते.दैवबलवत्तर म्हणून यावेळी समोरून कुठलेही वाहन आले नव्हते तर खोल दरी देखील बाजूला नसल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.दरम्यान वाहनातील पर्यटक घाबरून दुसऱ्या वाहनात बसून कार तिथेच सोडण्यात आल्याची माहिती समोर आली. दरम्यान पर्यटकांच्या बाबत कुठलीही माहिती मिळू शकलेली नसून या बाबत नेरळ पोलीस ठाण्यात देखील कुठली तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी दिली आहे. एकूणच थर्टीफर्स्टची धामधूम सुरू असताना माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला.
अंबरनाथ नगरपालिकेचा टीडीआरला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय अंबरनाथः बांधकाम परवानगी घेताना मुळ चटईक्षेत्र निर्देशांक अर्थात एफएसआय, प्रिमीयम एफएसआय आणि त्यावर अनुज्ञेय असलेला सहायक चटईक्षेत्र निर्देशांक अर्थात अँसिलरी एफएसआय वापरला जातो. अशावेळी हस्तांतरणीय विकास हक्क अर्थात टीडीआरची मागणी केली जात नाही. त्यामुळे शहरात टीडीआरच्या माध्यमातून संपादित होणाऱ्या जमिनींची प्रकरणी कमी झाली असून त्याचा विकास योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम होतो आहे, अशी बाब अंबरनाथ नगरपालिकेच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे टीडीआर निर्मिती थंडावली असून त्याचसाठी अंबरनाथ नगरपालिकेने आता नव्या वर्षातील बांधकाम परवानग्यांसाठी एफएसआयसह तितकाच समान टीडीआर घेण्याचे सक्तीचे केले आहे. याबाबतचा आदेश नुकताच पालिका प्रशासनाने जाहीर केला. एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीचा बांधकाम क्षेत्राला मोठा फायदा झाला. यात अनेक मुद्द्यांवर सुतुत्रता आली. या नियमावलीनुसार रहिवासी बांधकाम परवानगी प्रकरणामध्ये कमाल बांधकाम क्षमतेच्या मयदित, वापरलेला बेसिक एफएसआय, प्रिमियम एफएसआय आणि टिडीआर या सर्वांवर ६० टक्के अँसिलरी एफएसआय घेण्याची तरतूद आहे. मात्र बऱ्याचशा बांधकाम परवानगी प्रकरणात मुळ एफएसआय आणि प्रिमियम एफएसआय तसेच त्यावर अनुज्ञेय असलेला अँसिलरी एफएसआय वापरुन बांधकाम परवानगी प्रकरणे सादर केली जातात. अशा प्रकरणात टीडीआर वापरुन अतिरिक्त एफएसआय मागितला जात नाही. त्यामुळे नगरपरिषद हद्दीतील टीडीआरचे महत्व कमी झाले असून या माध्यमातून संपादित होणाऱ्या जमिनींची प्रकरणे कमी झाल्याची बाब अंबरनाथ नगरपालिकेच्या निदर्शान आली आहे. त्यामुळे शहराच्या विकास योजनेच्या अंमलबजावणीवर फरक पडतो आहे. विकास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरक्षणाखालील, विकास योजना रस्त्याखालील जमिनी टीडीआरच्या माध्यमातून संपादित करणे आवश्यक आहे. अंबरनाथ शहरात १९८ आरक्षणे आहेत. त्यातील अवघे चार टक्के आरक्षणे पालिकेच्या ताब्यात आली आहेत. विकास योजना रस्त्याखालील जमिनीच्या मालकांनी स्वतः पुढाकार घेऊन टीडीआरच्या मोबदल्यात या जमिनी नगरपालिकेला हस्तांतरीत करणे गरजेचे आहे. त्यामुळे या टीडीआरच्या निर्मितीला आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या वापराची सक्ती करण्याचा निर्णय अंबरनाथ नगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून सादर केल्या जाणाऱ्या सर्व बांधकाम परवानगी प्रकरणात एसएसआय आणि टीडीआर समान प्रमाणात वापरावा लागणार आहे. याबाबतचा आदेश नुकताच अंबरनाथ पालिका प्रशासनाने जाहीर केला आहे. उत्पन्न घटणार, पण आरक्षणांच्या विकासाला मदत सध्या प्रचलित एफएसआय वापरामुळे पालिका प्रशासनाला थेट उत्पन्न मिळते. मात्र त्याचवेळी टीडीआरचे महत्व कमी झाल्याने पालिकेला आरक्षण विकासासाठी जागा मिळत नाही. टीडीआर खासगी व्यक्तीकडून मिळेल. त्यामुळे पालिकेचे काही अंशी नुकसान होईल. पण आरक्षित भुखंडांवरचा विकास आणि त्यासाठी टीडीआर निर्मिती महत्वाची असल्याचे पालिकेच्या वतीने सांगितले जाते आहे. बांधकाम व्यावसासियांकाचे आस्ते कदम अंबरनाथ नगरपालिकेने एफएसआय आणि टीडीआर समान प्रमाणात वापण्याची सक्ती केली असली तरी त्यावर अद्याप बांधकाम व्यावसायिकांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेचा हा निर्णय बांधकाम व्यावसायिक कसा घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अंबरनाथ शहरात सुर्योदय सोसायटीत मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास सुरू आहे. शहरात विविध भागात अनेक गृहप्रकल्प सुरू आहेत. त्याचवेळी आलेल्या या निर्णयामुळे अनेक चर्चाही रंगल्या आहेत. मात्र हा निर्णय एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीच्या आधारेच घेतला असून मुंबई महानगर प्रदेशातील अनेक पालिकांनी वर्षभरापूर्वीच असा आदेश जाहीर केल्याची माहिती पालिकेच नगररचनाकार विवेक गौतम यांनी दिली आहे. 00000
शहापूर मराठा समाज मंडळाची मागणी शहापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृन हत्येच्या घटनेला महिना होत आला असून अजूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. हत्येचा तपास जलद गतीने व्हावा अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा शहापूर तालुका मराठा समाज मंडळाने शहापूर तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे दिला आहे.बिड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृन हत्येच्या घटनेला महिना होत आला असून मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. हत्या कटाच्या मुख्य सूत्रधारावर एका बड्या राजकीय व्यक्तीचा वरदहस्त असून तपास प्रक्रियेतही हस्तक्षेप असल्याने त्यास अटक होत नसल्याने मराठा समाजाच्या सरकारप्रती भावना तीव्र आहेत. या गुन्ह्याचा जलद गतीने तपास व्हावा,तसेच योग्य तपास होणेसाठी एस.आय.टी. स्थापन करावी किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करून कटात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तपास कामात सातत्याने दिरंगाई होत असेल तर महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा शहापूर तालुका मराठा समाज मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.आज (दि. 31)सकाळी मराठा समाज मंडळाच्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष विजय देशमुख, मिलिंद देशमुख, रवींद्र चौधरी, सचिन चौधरी व पदाधिकाऱ्यांनी शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेऊन हे निवेदन सुपूर्द केले. 00000