ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आमदार महेंद्र दळवी व जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत डॉ. नितीन अंबाडेकर व डॉ.पुरुषोत्तम मडवी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांचे केले कौतुक अशोक गायकवाड रायगड : आरोग्य विभागाचे संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, नर्सिंग विभागाचे उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम मडवी यांनी सदिच्छा भेट दिली. शिबिरामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधाबाबत माहिती घेतली आणि या उपक्रमाबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले. तसेच या शिबीराकरिता सेंट्रल टीबी डिव्हिजनल टीम यांनी भेट दिली.आमदार महेंद्र दळवी यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिराची २८ डिसेंबरला सांगता कार्यक्रम संपन्न झाला. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील १७४ ज्येष्ठ महिला तर २९० पुरुष असे एकूण ४६४ नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेतली. ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येणारे उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात तसेच हृदयरोग-गरजेनुसार 2D ECHO, X…
