Category: ठाणे

Thane news

 ठाणे महापालिकेने आखला शंभर दिवसांचा कार्यक्रम

 कार्यालयीन कामकाज, ऑनलाईन सेवा सज्जता आणि स्वच्छता मोहिमेवर भर   ठाणे : नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने १०० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये कमीत कमी कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांची सज्जता आणि सर्व कार्यालयांची सर्वंकष स्वच्छता मोहीम यावर भर देण्यात आला आहे. या सर्वाची यशस्वी अमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिकेनेही कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यात, नागरी सुविधांच्याबाबतीत कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यात यावे. महापालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करणे. माहिती अधिकाराचा वापर करून नागरिक जी सर्वसामान्यपणे उपलब्ध असलेली माहिती विचारतात ती विभागांनी आधीच पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करावी. महापालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्यात, यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित वेळ ठरवून त्यावेळी शक्यतो फिल्ड व्हिजिट ठेवू नयेत. नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करावे. तसेच, महापालिका क्षेत्रात उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करावे. त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अमलबजावणी करावी, असेही या कृती कार्यक्रमात स्पष्ट करण्यात आले आहे. कृती कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे बैठक घेतली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे यांच्यासह पालिकेचे सर्वच अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामगिरीबाबतचे सादरीकरण केले. या आढावा बैठकीच्या सुरुवातीला आयुक्त राव यांनी राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाबाबत विवेचन केले. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबतचे कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणेने कृती कार्यक्रम हाती घ्यावा. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचे काटेकोर आयोजन आणि यशस्वी अमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिले. नागरिकांचे जीवन सुखकर करणे याला प्राधान्य आहे. आपल्या मुलभूत कर्तव्यांचा तो महत्त्वाचा भाग असून त्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर काटेकोर नियोजन करावे. प्रशासन सुसंगत पद्धतीने काम करीत असल्याचे नागरिकांना जाणवले पाहिजे, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. 0000

आतकोली क्षेपणभूमी येथून दगड आणि पाणी यांची चोरी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी भिवंडीतील आतकोली येथे क्षेपणभूमीसाठी भूखंड देण्यात आला आहे. या भूखंडावर अनधिकृतपणे प्रवेश करून सुमारे ५४१० ब्रास दगड आणि दररोज सुमारे…

 मराठी माध्यमात प्रवेश घेतलेल्या पालकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार

 महात्मा गांधी विद्यामंदिरमध्ये `मराठी गौरव सन्मानपत्र’ सोहळा संपन्न   कल्याण : मुलांचे शालेय शिक्षण मातृभाषेतून  झाले पाहिजे व ते शिक्षण सर्वोत्तम असतें हे विविध शैक्षणिक तज्ञांनी अधोरेखित केलेले आहे. मात्र भारतीयांवर असलेला इंग्रजीचा प्रभाव यामुळे पालक मातृभाषा मराठीमध्ये प्रवेश न घेता मुलांना इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात मराठी शाळांच्या पटसंख्येवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाहाविरुद्ध जाऊन मुलांना मराठी माध्यमात प्रवेश घेतलेल्या पालकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्याचा कार्यक्रम डोंबिवली येथील रेल चाइल्ड संस्था संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या  शाळेने आयोजित केला होता. मातृभाषा मराठीतून शालेय शिक्षण घेणे चांगले असतें हे पटल्याने पाल्यांचे प्रवेश घेतल्याने शाळेची पटसंख्या वाढली व  अभिजात , समृद्ध , संपन्न अशा मराठी या ज्ञानभाषेतून शिकण्याची सुवर्णसंधी पाल्यास दिली म्हणून `मराठी गौरव सन्मानपत्र’ देऊन पालकांचा नुकताच गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पुणे येथील मराठी काका  अनिल गोरे, गणेश मंदिर संस्थान अध्यक्ष अलका मुतालिक,  सेवानिवृत्त एसीपी बाळकृष्ण वाघ, कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रदीप गवळी, रे.चा.संस्था कार्यवाह झरकर, कोषाध्यक्ष पटवर्धन, निमंत्रित सदस्य मंगेश देशपांडे, १४३ विधानसभा प्रमुख प्रल्हाद म्हात्रे,  सीआरसी प्रमुख महेश्वरी आदी मान्यवर व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे अनिल गोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये मराठी माध्यमातून शालेय शिक्षणाचे उपयुक्तता तसेच शैक्षणिक फायदे अत्यंत रंजक माहितीद्वारे सांगितले. त्यांनी आवाहन केले कि पालक वर्गाने सर्व परिचितांना, नातेवाईकांना, मित्रांना  मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यास  प्रेरित करावे.  इंग्रजी शाळेत मुलांना घालून पालक चूक करत आहेत कारण मराठी माध्यमातील शिक्षण हे कस्तुरीमृगासारखे आहे. गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्ष अलका मुतालिक पालकांशी संवाद साधताना म्हणाल्या की, मराठी शाळेची मुले जीवनामध्ये कुठेही कमी पडत नाही हा त्यांचा अनुभव आहे. मराठी शाळेतच मुलांच्या व्यक्तीमत्वाचा खरा विकास होतो व तेथेच मुलांचं भविष्य उज्वल आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर सारखी एखादी शाळा ` पालकांचा असा सत्कार करते व असा स्तुत्य उपक्रम राबवते हे कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमादरम्यान प्रल्हाद म्हात्रे यांचा माजी विद्यार्थी म्हणून ` मराठी गौरव सन्मानपत्र ‘ देऊन गौरव करण्यात आला. तसेच  उपस्थित पालकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात प्रल्हाद म्हात्रे यांनी ५१००० रू. चा धनादेश शाळेला मदत म्हणून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अजयकुमार जोगी यांनी केले व सूत्र संचालन ललिता कुलकर्णी यांनी केले.

शाकंभरी नवरात्र उत्सव निमित्त 64 भाज्यांची आरास

कल्याण : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, पारनाका, कल्याण पश्चिम (दिंडोरी प्रणित) येथे शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त 64 भाज्यांची आरास साकारण्यात आली. शाकंभरी नवरात्र उत्सव निमित्त कल्याण पारनाका स्वामी समर्थ सेवा केंद्रात…

अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणीही ठाण्यात ढोल-ताशे व बॅण्ड वाजवा

 भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची मागणी   ठाणे : महापालिकेचा दहा लाखांहून अधिक मालमत्ता कर थकविणाऱ्या आस्थापनांच्या दरवाजाबरोबरच ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणीही ढोल-ताशे व बॅण्ड वाजवावेत, अशी मागणी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना अनधिकृत बांधकामांची माहिती होण्याबरोबर माफियांनाही काहीसा आळा बसू शकेल, असे  वाघुले यांनी पत्रात म्हटले आहे. मालमत्ता थकबाकीदार बिगरनिवासी आस्थापनांच्या मालमत्तांच्या दरवाजात ढोल-ताशांसह बॅण्ड वाजविण्याचा स्तुत्य निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. एकीकडे मालमत्ता कराच्या थकबाकीमुळे महापालिकेचे उत्पन्न घटले असताना, ठाणे शहरात सुरू असलेल्या शेकडो अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. एक सात मजली अधिकृत इमारत बांधल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीत सुमारे एक कोटी रुपयांचा महसूल जमा होतो. मात्र, सद्यस्थितीत दुर्देवाने शेकडो अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात असल्याकडे  वाघुले यांनी लक्ष वेधले. अनधिकृत बांधकामांना बेकायदा नळजोडणी दिली जात असून, महापालिकेच्या अधिकृत वाहिन्यांना सांडपाणी व मलवाहिन्या जोडल्या जात आहेत. या इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, चारचाकी वाहने रस्त्यालगत उभी करून वाहतूककोंडीत भर पडत आहे. ठाणे शहराच्या बकालपणात वाढ होत आहे. अशा भीषण परिस्थितीत अनधिकृत बांधकामे करणाऱ्या माफियांना जरब बसविण्याची आवश्यकता आहे, असे  वाघुले यांनी पत्रात म्हटले आहे. महापालिकेच्या बारा प्रभाग समितीतील अतिक्रमण व निष्कासन उपायुक्तपदाबरोबरच परिमंडळ २ चा कार्यभार  शंकर पाटोळे यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी ढोल ताशांसह बॅण्ड वाजविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी  वाघुले यांनी केली आहे. 00000

 ठाणे युवा क्रिकेटपटू ‘यशस्वी भूपेंद्र कुमार जयस्वाल’ यांचा शिव गौरव पुरस्काराने सन्मान

 ११वा वार्षिक ‘विहंग संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल २०२५’ युवकांच्या प्रतिभेला सलाम आणि भारतीय संविधानाला आदरांजली देत, ११वा वार्षिक ‘विहंग संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल २०२५’ ठाण्यात साजरा होणार आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली संस्थापक अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनात आणि संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल टीमच्या प्रयत्नांमुळे या वर्षीचा कार्यक्रम एका ऐतिहासिक क्षणाला साक्षी ठेवणार आहे – शिव गौरव पुरस्कार २०२५चा मानकरी ठरले आहेत भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख तारा यशस्वी जयस्वाल. यशस्वी जयस्वाल हे स्फोटक फलंदाजी आणि अपराजित निर्धारासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या आयपीएलमधील विक्रमी कामगिरीसह त्यांनी क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे – कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध १३ चेंडूत वेगवान पन्नाशी पूर्ण करण्याचा विक्रम आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून १२४ धावांची भव्य खेळी केली. ही खेळी संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या न खेळलेल्या खेळाडूंच्या विक्रमात नोंदली गेली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सामन्यांत ८२ आणि ८४ धावा तसेच सराव सामन्यात ४५ धावांच्या योगदानाने त्यांनी संघाच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीसह नम्रता आणि क्रीडासंस्कारांमुळे त्यांना शिव गौरव पुरस्कार २०२५ देण्यात येणार आहे. हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे. हा सोहळा ११ जानेवारी २०२५ रोजी उपवन तलाव, ठाणे येथे संपन्न होणार आहे. ‘यशस्वी जयस्वाल यांना शिव गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. ते भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायक आहेत,’ असे प्रतिपादन संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हलचे संस्थापक-अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. विहंग संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल २०२५ बद्दल: संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल टीमच्या आयोजनाखाली ११वा वार्षिक विहंग संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल १० जानेवारी ते १३ जानेवारी २०२५ दरम्यान ठाण्यातील उपवन तलावाच्या किनारी साजरा होणार आहे. हा उत्सव भारतीय सांस्कृतिक विविधतेचे प्रतिबिंब आहे आणि संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या कलासंवर्धनासाठीच्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे. फेस्टिव्हलमध्ये पारंपरिक संगीत, बॉलीवूड, लोककला आणि आधुनिक नृत्यसंगीताचे अप्रतिम सादरीकरण होणार आहे.

१ व्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते होणार उद्घाटन – मंत्री प्रताप सरनाईक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होणार अनिल ठाणेकर ठाणे : ठाणेकरांसाठी एक खास सांस्कृतिक पर्वणी ठरू पाहत असलेल्या विहंग ‘संस्कृती आर्ट फेस्टिवल’ चे आयोजन १०…

ठाण्यात यंदाही दर्यादारी सी-फूड फेस्टिव्हल’मध्ये खवय्यांसाठी पर्वणी मासे मिळणार फक्त ५९ रुपयात

कल्याण : होडीत असलेल्या आगरी कोळी थीम रेस्टॉरेंट दर्यादारीचे तृतीय वर्षपुर्तीनिमीत्त ठाण्यात खास खवय्यांसाठी ‘दर्यादारी सी-फुड फेस्टीवल’ चे आयोजन केले आहे. आगरी माणसं आणि त्यांचा आदरतिथ्य जगजाहिर आहे. हेच आदरतिथ्य…

मिशन मोडवर काम करून जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा-गुलाबराव पाटील

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी नेमून दिलेली कामे गांभीर्यपूर्वक लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा अत्यंत कठोर शब्दात सूचना…

ठाण्यात कर थकबाकीदारांवर कारवाईची चिन्हे ठाणे महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश

ठाणे : आपापल्या विभागातील मोठे थकबाकीदार शोधून त्यांच्याकडून चालू वर्षीची रक्कम आणि थकबाकी वसुल करण्यासाठी कृती आराखडा निश्चित करण्याबरोबरच आवश्यक तेथे जप्ती, पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात यावी, असे…