योगाभ्यासात सातत्य राखा – योगगुरू शेखर पेटकर
ठाणे : श्री अंबिका योग कुटीर आणि श्री आनंद भारती समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दर रविवारी सकाळच्या सत्रात श्री आनंद भारती समाज सभागृहात गेली साडे तीन दशके त्रैमासिक विनामूल्य योगाभ्यासाचे…
Thane news
ठाणे : श्री अंबिका योग कुटीर आणि श्री आनंद भारती समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दर रविवारी सकाळच्या सत्रात श्री आनंद भारती समाज सभागृहात गेली साडे तीन दशके त्रैमासिक विनामूल्य योगाभ्यासाचे…
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागात सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामधील काही योजनांसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द…
माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी कल्याण : राज्य शासनाकडून कल्याण पश्चिमेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या कामगार कल्याण केंद्राच्या इमारतीसाठी आगामी अर्थसंकल्पात 5 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची मागणी भाजपचे माजी आमदार…
ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली ग्वाही ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी एमएमआरडीए मार्फत रस्ते विकासाची विविध कामे सुरू आहेत. या…
ठाणे : जगातील मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आज शिल्लक राहिलेला दिसत नाही, ही एक शोकांतिका आहे. मात्र समाज माध्यमे ही पावरफुल आहेत. या माध्यमांचा वापर…
अनिल ठाणेकर ठाणे : स्मार्ट मीटरसारखी अनेक धोरणं ही, सरकारपुरस्कृत रक्तपिपासू शोषक-व्यवस्था होय, असा जोरदार हल्लाबोल धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी राज्य शासनावर केला. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…
ठाणे : राज्यातील चार चाकी वाहन धारकांना १ एप्रिलपासून फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी…
ठाणे महापालिकेचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे विशेष वॉर्ड तयार ठाणे : सध्या चीनमध्ये एचएमपीव्ही (Human Metapneumo virus) साथीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. भारतातही काही रुग्ण आढळले आहेत.…
ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली ग्वाही ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी एमएमआरडीए मार्फत रस्ते विकासाची विविध कामे सुरू आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी, पर्यावरण मान्यता, वृक्षांशी निगडित विषय आदी गोष्टींबाबत ठाणे महानगरपालिका पूर्णपणे सकारात्मक आहे. हे विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. एमएमआरडीएमार्फत ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. या बैठकीस, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहायक संचालक नगररचना संग्राम कानडे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांच्यासह महापालिका, एमएमआरडीए, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता यांचे एकत्रीकरण, आनंद नगर ते साकेत उन्नत रस्ता, बाळकुम ते गायमुख किनारी रस्ता, गायमुख ते पायेगाव खाडी पूल, कासारवडवली ते खारबाव खाडी पूल, कोलशेत ते काल्हेर खाडी पूल, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग या वाहतूक सुधारणा प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ठाणे महानगरपालिकेशी निगडित भूसंपादन, पर्यावरण परवानगी, वृक्षारोपण, जल-मल वाहिन्यांचे स्थलांतरण यावर या बैठकीत चर्चा झाली. ऐरोली ते कटाई नाका ऐरोली ते कटाई नाका या उन्नत रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव जागेसाठी भूसंपादन करण्याचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे, तसेच या वाढीव भूसंपादनाच्या खर्चासाठी निधीची मागणी करण्यासाठी सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. ऐरोली ते कटाई या रस्त्यासाठी १२.५९ हेक्टर जागेचे संपादन ठाणे महापालिकेद्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी मूळ प्रस्ताव २५३ कोटी रुपयांचा होता. त्यात वाढ होऊन आणखी जागा किती लागेल, तसेच त्याचा खर्च किती येईल यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर, भूसंपादन आणि वाढीव खर्च या दोन्हींचे सुधारित प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. घोडबंदर रस्ता एकत्रीकरण घोडबंदर रोड आणि सेवा रस्ता एकत्रिकरण करण्याच्या प्रकल्पात महावितरणच्या वीज वाहिन्यांचे स्थलांतरण हे मोठे आव्हानात्मक काम असेल. या वाहिन्यांच्या स्थलांतरणासाठी महावितरण, एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिका यांनी पुढील आठ दिवसात एकत्रित सर्वेक्षण करावे. तसेच या स्थलांतरणाचा आराखडा तयार करावा, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. सुरक्षा अनामत रकमेबाबत सवलत नवी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर, वृक्ष कापणीसाठी घेण्यात येणाऱ्या सुरक्षा अनामत रकमेत एमएमआरडीएला सवलत देण्यासाठी कायद्याचा अभ्यास करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उद्यान विभागाला दिले. त्याचप्रमाणे, बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण, नवीन झाडे लावणे ही कामेही ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत करण्यात येतील. त्यासाठी लागणारा खर्च एमएमआरडीएकडून दिला जाईल, असे एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले. ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या कामासाठी दररोज आठ लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मल-जलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी या प्रकल्पासाठी देण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच, अमृत जल योजनेअंतर्गत पंधराशे एमएम आकाराच्या जलवाहिनीच्या मार्ग स्थलांतराबाबतही आजच्या बैठकीत निर्देश देण्यात आले. गायमुख ते पायेगाव खाडीपूल गायमुख ते पायेगाव या खाडी पुलाच्या कामाला गती देण्यासाठी भूसंपादन, सीआरझेड वनविभाग अधिक क्षेत्राचा विस्तृत आराखडा पंधरा दिवसात तयार करण्यात यावा, असे निर्देश अश्विन मुदगल यांनी बैठकीत दिले.
अशोक गायकवाड अलिबाग :*रायगड जिल्ह्यात १ हजार ८३० गावांमध्ये स्वच्छता अभियान जनजागृतीसाठी स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान २६ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानात स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुटुंबांचा सन्मान करण्यात येणार असून, अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी केले आहे. जिल्ह्यात वैयक्तिक शौचालय, शोष् खड्डा, अथवा परसबाग, कंपोष्ट खत खड्डा तसेच कचरा वर्गीकरण साठी हिरव्या व निळ्या रंगाच्या दोन डस्ट बिन असणाऱ्या कुटुंबांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनातील उत्कृष्ट कुटुंब म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. २१ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य प्रत्यक्ष गृहभेटी देऊन या चार बाबी वापरात आहेत का याची माहिती ते घेणार आहेत. २६ जानेवारी रोजी या कुटुंबांचा ग्रामपंचायत चे वतीने सत्कार होणार आहे. सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरी चे प्रमाणपत्र देऊन पात्र कुटुंबांना गौरविण्यात येईल.ग्रामीण भागातील सर्व गावात दृश्यमान स्वच्छता राहावी. व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहन देनेसाठी स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे स्वच्छता सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. गाव स्वच्छ, सुंदर राहण्यास याची मदत होणार असल्याने जास्तीत जास्त ग्रामस्थांनी यात सहभागी होऊन स्वच्छतेची व्याप्ती वाढवावी असे आवाहन पाणी व व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे. 00000