Category: ठाणे

Thane news

महापालिकेच्या डास प्रतिबंधाच्या नियमास गृहसंस्थांचा विरोध

 कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील ५० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांनी अधिकृत पेस्ट कंट्रोल एजन्सी नेमून डास आळीनाशक औषधांची फवारणी करण्याचे परिपत्रक महापालिका प्रशासनाने काढल्यानंतर यास आता गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला आहे. परिपत्रकानुसार गृहसंकुलात डासांच्या आळ्या आढळल्यास दंडही भरावा लागणार आहे. महापालिकेच्या या परिपत्रकाचा गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला आहे. तसेच महापालिकेच्या कारवाईला देखील सामोरे जाण्याचा तयारी दर्शविली आहे. तसा ठरावच संघटनेने केला. संघटनेच्या या निर्णयास ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. महापालिकेच्या निर्णयामुळे आता वाद पेटण्याची चिन्हे आहेत. दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन आणि ठाणे जिल्ह्याच्या सहकार विभागाच्या वतीने सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अधिवेशन भरविले होते. यावेळी गृहनिर्माण संस्थांचा पूनर्विकास, समस्या याविषयी संस्थांतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेकडून फवारणी केली जाते. महापालिकेने नुकताच एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ५० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या गृहसंकुलांना स्वत:च डास प्रतिबंधक फवारणी करावी लागणार आहे. तसेच डासांच्या आळ्या आढळल्यास दंडही भरावा लागणार आहे. महापालिकेने गृहनिर्माण संकुलांना नोटीसा देखील बजावल्या आहेत. या निर्णयास दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन या गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला. संमेलनामध्ये फेडरेशनचे महापालिकेच्या परिपत्रकाचा विषय निघाला. फवारणीचा खर्च उचलणार नाही. गुन्हा दाखल झाल्यास त्यास आम्ही तयार आहोत. लोकप्रतिनिधींनी हा विषय प्राधान्यांने मांडायला हवा असे ते म्हणाले. यास खासदार नरेश म्हस्के आणि आमदार संजय केळकर यांनीही पाठिंबा दिला. फवारणी करण्यासाठी महापालिका पत्रक काढत असेल तर नागरिकांनी हे पैसे भरू नका असे म्हस्के म्हणाले. असे परिपत्रक महापालिकेने तातडीने रद्द केले पाहिजे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. तातडीने हे परिपत्रक रद्द करून घेऊ असेही केळकर म्हणाले. कचरा, मलनिस्सारण वाहिन्या, रस्ते आम्हीच स्वच्छ करायचे. आता डासांचा प्रतिबंधही आम्ही करायचा, मग महापालिका केवळ दंड लावून कर घेणार का? ठाणे महापालिकेच्या निर्णयाला आमचा पूर्णत: विरोध आहे. -सिताराम राणे, अध्यक्ष, दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन. मुख्यमंत्र्यांचा मोबाईलद्वारे संवाद देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने सात दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. या कार्यक्रमास भाजपचे आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. फडणवीस यांनी दरेकर यांच्या मोबाईलवर संपर्क साधून उपस्थितांशी संवाद साधला. या संमेलनातील निर्णय, अडचणींबाबत मुंबईत बैठक बोलविणार असल्याचे फडणवीस म्हणाले. तक्रारीत ठाणे जिल्हा अग्रेसर कोकण विभागातील गृहनिर्माण संस्थेच्या तक्रारींपैकी ८० टक्के तक्रारी या ठाणे जिल्ह्यातील असतात. यामध्ये निवडणुक, परिक्षण, विशेष सभा, पूर्नविकास या विषयांवरील तक्रारी अधिक आहेत. कायद्याच्या अभावामुळे या तक्रारी वाढलेल्या दिसून येते. गृहनिर्माण सोसायट्यांमधील पदाधिकारी आणि तक्रारदारांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळेच तक्रारी वाढत असल्याचे सहकार विभागाचे सह-निबंधक मिलिंद भालेराव यांनी सांगितले. जिल्ह्यात ३० हजाराहून अधिक सोसायट्या आहेत त्यापैकी केवळ ५० टक्केच सोसायट्यांचे परिक्षण झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 00000

मुंबई नाशिक महामार्गावर कारला लागलेल्या आगीमळे महामार्गावर वाहतुक कोंडी

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील दिवे अंजूर भागात सोमवारी सकाळी एका कारला अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात वाहतुक कोंडी झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या…

ठाण्यात शिव, फुले, शाहू, आंबेडकरी अनुयायांचा एल्गार

 सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करा ! अनिल ठाणेकर ठाणे : सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करावे, या मागण्यांसाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष, दलित, पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी, हे आजचे आंदोलन सुरूवात असून यापुढे जर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन राज्यभर होईल,  असा इशारा दिला. परभणी येथे दत्ताराव पवार या समाजकंटकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली होती. त्यानिषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचे चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणास अटक करून बेदम मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी, “आंबेडकर ही फॅशन झाली आहे,” असे विधान केले होते. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये शहरातील ७२  बुद्धविहारांशी संबधित लोक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्थांचे प्रतिनिधी तसेच दिव्यांगदेखील सहभागी झाले होते. यावेळेस मोर्चेकऱ्यांकडून छत्रपती शिवाजीमहाराज की जय, राष्ट्रपिता जोतिराव फुले यांचा विजय असो, राजर्षी शाहू महाराज यांचा विजय असो,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो , झिंदाबाद,  झिंदाबाद संविधान झिंदाबाद , जब तक सुरज चाँद रहेगा… बाबा तेरा नाम रहेगा,  सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे,  राजीनामा द्या.. अमित शहा राजीनामा द्या, हर जोर जुल्म की टक्कर मे, संघर्ष हमारा नारा है , जय जय जय जय भीम, जय भीम, जय भीम अशा घोषणा दिल्या. या मोर्चात  ठामपा मा. स्थायी समिती सभापती भय्यासाहेब इंदिसे, मा. परिवहन समिती सभापती जितेंद्रकुमार इंदिसे,  राजाभाऊ चव्हाण,  सुनील खांबे, सुखदेव उबाळे, भास्कर वाघमारे, आबासाहेब चासकर,  पंढरीनाथ गायकवाड,  गोविंद पठारे, प्रल्हाद मगरे, जयवंत बैले, शंकर जमदाडे, समाधान तायडे, राहुल घोडके, लोभसिंग राठोड, विशाल ढेंगळे, बाबासाहेब येडेकर, डॉ.प्रमोद जाधव, प्रमोद इंगळे, सुरेश कांबळे, अशोक कांबळे, प्रमोद इंगळे, विनोद भालेराव, तात्याराव झेंडे,  विमलताई सातपुते, सुमनताई इंगळे, दैवशाळा हराळे आदींसह हजारो शिव, फुले, शाहू, आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते. या प्रसंगी नानासाहेब इंदिसे म्हणाले की,  अमित शहा यांनी केलेला बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. तर, सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाई झाली तरच भीमसैनिकांचा राग कमी होईल, असे सांगितले सोमनाथ सुर्यवंशी हत्याप्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांन बडतर्फ करून आयपीसी 302 तथा बीएसएस 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करून  त्यांना अटक करावी, त्याच्या कुटुंबियांना एक कोटीचे अर्थसाहाय्य  आणि शासकीय नोकरी द्यावी;  तसेच, अमीत शहा लोकसभेत द्वेषातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानकारक विधान केले आहे. मात्र, अद्यापही त्यांनी माफी मागितलेली नाही. त्यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांना काढून टाकावे, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन:

ठाणे : शिवसेना नेते तसेच ठाणे महानगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, त्याच सोबत ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर सतीश प्रधान यांचे निधन झाले आहे. रविवारी दुपारी २ च्या सुमारास सतीश प्रधान यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. सोमवारी सकाळी…

डोंबिवलीत स्मार्ट सहेली उपक्रम सुरू

डोंबिवली : अबला महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे एकीकडे पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. तर दुसरीकडे लोकल वा लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही प्रवासी महिला असुरक्षित नसल्याच्या घटना घडत आहेत.…

नियम मोडणाऱ्या बेशिस्त चालकांना दाखवला वाहतूक पोलिसांचा इंगा

वाहतूक पोलिसांकडून कारवाईची झोड; बेशिस्त चालकांवर ब्रेथ ॲनालायझरचा वापर डोंबिवली : एकीकडे रस्ते अपघातांत वाढ होत चालली असून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस आणि शासनाकडून वारंवार आवाहन केले…

विशाल गवळीला दोन ते तीन महिन्यात होणार फाशी

मुख्यमंत्री फडणवीसांचं पीडितेच्या वडिलांना आश्वासन   कल्याण : कल्याण येथील चक्कीनाका भागातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवासांपूर्वी समोर आला होता.…

कोळसेवाडी परिसरातील नागरिकांनी विशाल गवळीच्या पुतळ्याला दिली फाशी

कल्याण : कल्याण कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 13 वर्षीय लहान मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत केलेल्या हत्याकांडामुळे संतापाची लाट पसरली असून आरोपी विशाल गवळी याला फाशी द्या…

ठाणकरपाडा परिसरात गटाराची दुरावस्था परिसरातील नागरी आरोग्य प्रश्न ऐरणीवर

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातील कल्याण पश्चिमेतील ठाणकरपाडा परिसरातील दीप ज्योती बिल्डिंग लगतच्या गटाराची दुरावस्था झाल्याने गटारातील सांडपाणी इतस्ततः पसरत असल्याने संभाव्य रोगराई पसरल्यास आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केडीएमसीच्या…

उलवे से.17,18,19 मधील गार्डनचे लवकरच लोकार्पण

प्रितम म्हात्रे यांनी घेतला पाठपुरावा करत असलेल्या कामांचा आढावा   पनवेल : सिडकोच्या माध्यमातून उलवे येथे नवीन वसाहत गेल्या काही वर्षापासून वसवली गेली आहे. परंतु आवश्यक त्या सुखसुविधा उपलब्ध नाहीत…