ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार “मालमत्ता पत्रक’’
ठाणे : स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या मालकीबाबत “मालमत्ता पत्रक” (प्रॉपर्टी कार्ड) दिले जात आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील ३९ ग्रामपंचायतीमधील ४ हजार ५२३ नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे…
ठाणे जिल्ह्याचे पाणी ‘पेटणार’ ?
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न पेटणार आहे. ठाणे जिल्ह्यातील पाणी महागणार असल्याच्या बातम्यांनी सामाजिक संघटनांसह राजकीय संघटनांनीही रस्त्यावर उतरून विरोध करण्याची तयारी दर्शविली आहे. नवी मुंबईसह जवळपास सर्वच शहरांना बारवी धरणातून…
अटलजींनी कधीही सुडाचं राजकारण केलं नाही… राज ठाकरे
आज अटलजींची १०० वी जयंती. भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल आदर, कुतूहल होतं आणि ज्या नेत्यांनी देखील माझ्याबद्दलच्या स्नेहात कधीही हात आखडता घेतला नाही, त्यात अटलजी हे अग्रणी. स्व. बाळासाहेबांवरच्या फोटोबायोग्राफ़ीच्या…
मामीनेच काढला मामाचा काटा
पुणे : पुण्यातील हायप्रोफाईल मर्डरचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात पुण्यातील भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांची रहस्यमयरित्या मर्डर करण्यात आली होती. ही मर्डर दुसरीतिसरी कुणी केली नसुन या मामाच्या पत्नीनेच म्हणजेच…
कल्याण ग्रामीणच्या आमदारांचा ‘ऑन द स्पॉट’ पंचनामा
आमदार आपल्या भेटीला! शेकडो ग्रामस्थांसह रहिवाशांच्या तक्रारींचा निपटारा डोंबिवली : आमदार आपल्या भेटीला या कार्यक्रमाद्वारे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी तक्रारींचा निपटारा करताना ऑन द स्पॉट पंचनामा करून शेकडो ग्रामस्थांसह रहिवाशांना दिलासा दिला आहे. ज्या विभागाशी संबंधित तक्रार असेल त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन आमदार मोरे यांनी हजरजबाबीपणा दाखवून दिला. ‘आमदार आपल्या भेटीला’! डोंबिवली शहर शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या वतीने आयोजित ‘आमदार आपल्या भेटीला’! या कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्रातील ग्रामस्थांसह रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोमवारी सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत मध्यवर्ती शाखेत पार पडला. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार राजेश मोरे यांना भेटण्यासाठी 100 हून अधिक नागरिकांनी खासगी, तसेच सार्वजनिक अर्थात सामाजिक समस्या मांडल्या. यावेळी डोंबिवली शहर, नेतीवली विभाग, एमआयडीसी विभाग, दिवा शहर, 14 गावे, 27 गावे, शिळफाटा विभाग, आदी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या नागरिकांनी सार्वजनिक समस्यांमध्ये बस सेवा, रखडलेली शासकीय कामे, अर्थ साह्य, वैद्यकीय सेवा, पाणी समस्या आणि शैक्षणिक समस्येसह नोकरी संदर्भात प्रश्न मांडले. तर खासगी समस्यांमध्ये आर्थिक फसवणूक, शिफारसपत्र, शासकीय योजनांचा लाभ मिळविणे, यांसारख्या प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी ग्रामस्थांसह रहिवाशांच्या समस्यांना त्वरित प्रतिसाद देताना आमदार राजेश मोरे यांनी शासनाच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून अनेक समस्यांचे निराकरण केले. पोलिस, तहसीलदार कार्यालय, महानगरपालिका, रेशनिंग कार्यालय, शैक्षणिक विभाग यांसह विविध शासकीय यंत्रणांशी संवाद साधून तक्रारदारांच्या कामांना गती दिली. नवी दिशा, नवी आशा कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या. नवनियुक्त आमदार राजेश मोरे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनीही गर्दी केली. पहिल्याच कार्यक्रमात अनेक प्रश्न मार्गी लागल्याने तक्रारदारांमध्ये समाधान दिसून आले. आमदारांनी दाखवलेल्या तत्परतेने व संवेदनशीलतेने उपस्थित नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
जानेवारीपासून होणार जनतेच्या आरोग्याची माहिती गोळा
००००० ठाणे : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची माहिती गोळा केली जाणार आहे. ही माहिती गोळा करण्यासाठी येणार्या अधिकार्यांना जनतेने सहकार्य करावे. असे आवाहन राष्ट्रीय सांख्यिकी…
भाजपा, विश्वास सामाजिक संस्थेच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम ठाणे : माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने भाजपा ठाणे शहर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन जलसिंचन क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या वसुंधरा संजीवनी मंडळाचे मुख्य मार्गदर्शक आनंद भागवत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले आणि विश्वास सामाजिक संस्थेच्या सदस्य वृषाली वाघुले यांनी शिबिराचे आयोजन केले होते. गेल्या १८ वर्षांपासून दरवर्षी २५ डिसेंबर रोजी अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीदिनी विश्वास सामाजिक संस्थेकडून शिबीर भरविले जात आहे. या शिबिराला भाजपाचे आमदार निरंजन डावखरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, सरचिटणीस शीतल कारंडे, भाजयुमोचे शहर सरचिटणीस प्रशांत कळंबटे, महिला मोर्चाच्या ओवळा मंडल अध्यक्षा अर्चना पाटील, मध्य मंडल अध्यक्षा कांचन पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, विविध सेल प्रमुख यांनी भेट दिली.
मुकुंद केणी प्रतिष्ठान आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा
ठाणे : कळवा विभागातील दरवर्षीप्रमाणे यंदाही मुकुंद केणी प्रतिष्ठान आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन कळवा विभागात करण्यात आले होते. माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला मुकुंद केणी व मंदार मुकुंद केणी यांच्या…
कल्याणमधील मुलीच्या हत्याप्रकरणातील गुन्हेगाराला राजकीय पाठबळ
माजी नगरसेवक महेश गायकवाड यांची टीका कल्याण : येथील पूर्वेतील चक्कीनाका भागातील निष्पाप अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या…
