Category: ठाणे

Thane news

वाल्मिकी आणि बुध्द समाजाचा मतदानावर बहिष्कार !

ठाणे : विधानसभा  निवडणुकीच्या  दरम्यान बौद्ध आणि वाल्मिकी समाजाचे प्रश्न मर्गिस लावू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं असल तरी समाजाच्या प्रश्नांकडे कानाडोळा केला आहे. मग तो घराचा प्रश्न असो किंवा…

निवडणूकीच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार- जत्रा बंद ठेवा – संदीप माने

अनिल ठाणेकर ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी,.२० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे, मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता मतदान सुरळीतपणे पार पडणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने बाजार व जत्रा अधिनियम, १८६२ चे नियम ५ ग अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी, मतदानाचा दिवस असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता ठाणे जिल्ह्यातील, ठाणे: करावे गाव, गावदेवी मैदान, से.36, नवी मुंबई आणि मुंब्रा बाजारपेठ व कौसा बाजारपेठ, कल्याण: मांडा, भिवंडी: दुगाड, खारबाव, कोपर, वडवली तर्फे राहूर, राहणाळ, घोलगाव, शहापूर: पिवळी, शेणवे, मळेगाव, टेंभूर्ली (खराडे, चांग्याचा पाडा) या ठिकाणांवर भरणारा आठवडा बाजार किंवा जत्रा बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हादंडाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी डॉ.संदीप माने दृकश्राव्य माध्यमांनी (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडिया) अशा बातम्या प्रदर्शित करु नयेत. तसेच राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली ठाणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात निर्भयपणे, मुक्त वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक पोलीस यंत्रणा व केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान सज्ज आहेत. मतदानादिवशी मतदान केंद्रांवर कोणतीही गर्दी होणार नाही व सर्व मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी सर्व केंद्रीय सुरक्षा यंत्रणा तसेच स्थानिक पोलीस यंत्रणांनी दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना मतदान केंद्रात मार्गदर्शन करून त्यांचे मतदान जलदगतीने होईल, याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच मतदान केंद्र व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणावरील विषयाबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात पार पडली. या बैठकीस संबंधित सर्व केंद्रीय निवडणूक निरीक्षक, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख, कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर यांच्यासह सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, गुजरात पोलीस, गोवा पोलीस, छत्तीसगड पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते.स्थानिक पोलीस दलाबरोबरच मतमोजणी केंद्रांवर तसेच मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या जवानांनी मतदान केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. सर्व नागरिकांना तसेच मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदान खोलीमधील व्यवस्थापन सुरळीत होईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. मतदानासाठी रांगेचे व्यवस्थापन तसेच गर्दीचे व्यवस्थापन करताना स्थानिक पोलीस यंत्रणांबरोबरच केंद्रीय सुरक्षा यंत्रणाची मदत होईल. तसेच संवेदनशील व गर्दी होणाऱ्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आले असल्याचे श्री. शिनगारे यांनी यावेळी सांगितले.ईव्हीएमची वाहतूक तसेच स्ट्रॉंगरुमची सुरक्षा व्यवस्थाही चोखपणे ठेवण्यात आली असून केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना अर्लट मोडवर राहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत.मतदान केंद्राच्या परिसरात अपुरी जागा असेल तेथे विशेष काळजी घेण्याचे निर्देश यावेळी केंद्रीय निरीक्षकांनी दिले. तसेच गर्दी होणाऱ्या ठिकाणी, जेथे मतदारांची जास्त रांगा लागतात अशा परिसरात ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात यावेत. मतदान प्रक्रियेसंदर्भात अथवा मतदानास उशीर होत असल्यासंदर्भात कोणतीही अफवा पसरवू नये, यासाठी सोशल माध्यमांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही केंद्रीय निरीक्षकांनी यावेळी दिले. प्रत्येक मतदान केंद्रांवर पुढील तास महत्त्वाचे असून अवैध मद्य वाहतूक, अवैध रोकड वाहतूक आदींवर भरारी पथकाने लक्ष ठेवावे, अशा सूचनाही केंद्रीय निरीक्षकांनी यावेळी दिल्या. ठाणे शहर व जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा प्रमाणात सुरक्षा यंत्रणांची तैनात करण्यात आली आहे. तसेच संवेदनशील तसेच गर्दीच्या ठिकाणीही योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर तसेच मतदानाच्या रांगेत गर्दी होऊ नये, मतदारांना लवकरात लवकर मत देता यावे, यासाठी मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांबरोबरच पोलीस यंत्रणाही सर्वतोपरी मदत करणार आहे. संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे तसेच अरुंद रस्ते असलेल्या ठिकाणी ड्रोन, सीसीटीव्ही, विशेष पथकाद्वारे लक्ष ठेवण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त डुंबरे यांनी यावेळी सांगितले. चौकट ठाणे जिल्ह्यात २८ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगामार्फत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहिता काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनामार्फत कठोर कारवाई करण्यात येते. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमधून एकूण २८ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १६ कोटी ५९ लाख ४ हजार रोख रक्कम, ३ कोटी ३२ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा,१ कोटी ८० लाख ३२ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, २३ लाख २६ हजार रुपये किंमतीच्या मौल्यवान वस्तू – दागिने आणि ७ कोटी १२ लाख १७ हजार रुपये किंमतीचे मोफत वाटपाचे / इतर साहित्य ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमधून प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहे.

निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी टीएमटीची बसव्यवस्था

ठाणे : बुधवार, २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेने (टीएमटी) बस व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. या…

प्रीतम जे एम म्हात्रे यांचा विजय निश्चित राज भंडारी

उरण :  उरण तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे हे प्रचंड मतांनी निवडून येणार असल्याचा दावा शेकापच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे. 20 नोव्हेंबर रोजी उरण विधानसभेची मतदान प्रक्रिया पडणार आहे. त्यांच्या प्रचाराला, रॅलीला सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेकापने तालुक्यातील गावागावात केलेल्या विकास कामांच्या जोरावर प्रीतम जे एम म्हात्रे हे प्रचंड मतांनी निवडून येतील याबद्दल तीळ मात्र शंका नाही. विकासाचे काम करणारे दमदार आमदार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या रूपाने पाहिले जाते. प्रीतम म्हात्रे हे सामान्य जनतेच्या मनातील उमेदवार आहेत. उरण मतदार संघात तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडीमुळे होणारे अपघात, नौदलाच्या सेफ्टी झोन, जेएनपीए विस्थापित हनुमान कोळीवाड्याचे पुनर्वसन आदी प्रश्न स्थानिक व भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचे आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी शेकापचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवारांपेक्षा प्रीतम जे म्हात्रे यांचे सामाजिक काम मोठे असून ते प्रचंड मतांनी निवडून येतील असे शेकापचे ज्येष्ठ नेते अनिल शिंदे यांनी सांगितले. ते उमेदवार म्हणून नव्हे तर गेली काही वर्षे या परिसरात सामाजिक काम करत असल्याने त्यांचा विजय नक्की असल्याचे गिरीश माळी यांनी सांगितले. धार्मिक कार्य ते सामाजिक, शैक्षणिक कार्यात प्रीतम जे एम म्हात्रे यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रीतम म्हात्रे यांचे सामाजिक कार्य उरण, पनवेल, खालापूर, रायगड परिसरातील नागरिकांना माहिती आहे. कोरोना काळात केलेली मदत तसेच इरसाळवाडी दुर्घटनाग्रस्त जनतेला दिलेला दिलासा हे येथील जनतेने पाहिलेले आहे. प्रीतम जे एम म्हात्रे यांची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ दिसून आली. त्यांनी येथील बेरोजगारीचा प्रश्न हाती घेतला आहे. उरण विधानसभा मतदारसंघात शिट्टीचा आवाज जोरदार होईल आणि प्रीतम म्हात्रे प्रचंड मतांनी निवडून येतील असे जेष्ठ कार्यकर्ते तरुण वर्ग सांगत आहे. यानिमित्ताने शेकाप आपला बालेकिल्ला राखेल असे बोलले जात आहे. शांत, शिस्तप्रिय आणि नम्र स्वभावाचा सुशिक्षित उमेदवार म्हणून प्रीतम दादा म्हात्रे यांची छबी निर्माण होत आहे. आज पर्यंत त्यांनी अनेकांना आधार दिला आहे. 20 नोव्हेंबर रोजी प्रीतम दादा म्हात्रे यांना बहुमताने निवडून द्या असे तालुका सहचिटणीस सुरेश पाटील यांनी आवाहन केले आहे.…

कलानी समर्थकांच्या घरावर ‘आयकर’चा छापा

३९ जणांना तडीपारीच्या नोटिसा उल्हासनगर : निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना ओमी कलानी यांच्या दोघा समर्थकांच्या घरी आयकर विभागाने रविवारी छापे टाकले. कमलेश निकम यांच्यासह ३९ जणांवर सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत निवडणूक काळात पोलिसांनी तडीपारीच्या नोटिसा बजावल्या आहेत. ओमी यांचे कट्टर समर्थक असलेल्या दोन स्थानिक नेत्यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकल्याची चर्चा होती. याबाबत निकम यांना विचारले असता, त्यांच्यासह एका समर्थकाच्या घरावर छापा टाकल्याची कबुली दिली. ‘राजकीय हेतूने कारवाई’ कल्याण ग्रामीणमधून पालांडे, अंबरनाथमध्ये प्रदीप पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यावर कलानी समर्थक सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आले आहेत. राजकीय हेतूने माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप कमलेश निकम यांनी…

भव्य प्रचार रॅलीने डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचाराची सांगता

शेवटच्या रॅलीत हजारो अबालवृद्धांचा जोशपूर्ण सहभाग अनिल ठाणेकर ठाणे : महाविकास आघाडीचे  अधिकृत उमेदवार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रचाराचा समारोप  सोमवारी प्रचंड गर्दीच्या रॅलीने मुंब्र्यात केला . या शेवटच्या भव्य प्रचार रॅलीत हजारो नागरिक , महिला आणि…

उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच

मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली उल्हासनगर : मतदानाची प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा,सुव्यवस्था आणि शांतता अबाधित ठेवण्याकरिता ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी कंबर कसली आहे.त्यासाठी…

कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट

फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले कल्याण : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता.  त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रचारावर भर देत होता. कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला होता. पण काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह हा नेत्यांच्या अंगलट येताना दिसला. कल्याण पश्चिम विधानसभेतील जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह त्यांच्या जीवावर बेतला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या दुर्घटनेतून राकेश मुथा थोडक्यात बचावले असले तरी सदर दुर्घटनेचे गंभीर परिणाम होऊ शकले असते. नेमके काय झाले? राकेश मुथा रविवारी रात्री उशिरा प्रचार करत असताना भोईरवाडी परिसरात त्यांच्या स्वागतासाठी दीडशे किलो वजनाचा भव्य हार तयार करण्यात आला होता. हा हार क्रेनच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यात टाकण्यात आला. मात्र, हारासोबत लावलेल्या इलेक्ट्रिक स्पार्कर्स फटाक्यांची ठिणगी उडाली आणि ती मुथा यांच्या डोक्याला लागली. या कारणाने त्यांच्या केसांनी पेट घेतला. मात्र, उपस्थित कार्यकर्त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून आग विझवली. यानंतरही राकेश मुथा कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहिले. त्यांच्या हावभावामुळे त्यांना अधिक दुखापत झालेली नसल्याचे दिसून आले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचा अतिरेकी उत्साह हा धोका निर्माण करू शकतो, हेच या घटनेवरून दिसून आले. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच राकेश मुथा यांचे बॅनर फाडल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. महापालिका अधिकारी जाणूनबुजून बॅनर फाडत असल्याचा आरोप करून मुथा यांनी निषेध आंदोलन करत दोन तास ठिय्या दिला होता. गेल्या काही दिवसांपासून राकेश मुथा यांचे बॅनर वारंवार फाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. विरोधकांना पराभव दिसत असल्यामुळेच त्यांच्याकडून हे कृत्य केले जात असल्याचा आरोप मुथा यांनी केला. तसेच महापालिका अधिकारी कुणाच्यातरी दबावात काम करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

पुरुषत्तोम इरनकला ‘आनंद श्री’ किताब

ठाणे  : ठाण्याच्या आद्य श्री आनंद भरती व्यायामशाळेच्या विद्यमाने ११४ व्या चंपाषष्ठी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ४२ व्या ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पहिल्या शॉर्ट गटातील देवा जिमच्या पुरुषोत्तम इरनकची ५८ स्पर्धामधून…

कोपरीत शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने

दोन्ही गटाच्या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचे वातावरण ठाणे : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच सोमवारी दुपारी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील कोपरी येथील अष्टविनायक चौकात दुचाकी रॅलीदरम्यान शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे चित्र दिसून आले.…