Category: ठाणे

Thane news

आमदार प्रताप सरनाईक यांना विविध समाजाचा पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे : ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार – शिवसेना , भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस , आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रताप सरनाईक यांना मतदारसंघातील विविध संस्था , समाज घटक , सामाजिक संस्था यांचा पाठींबा दरदिवशी वाढत आहे. गेल्या १५ वर्षात झालेली प्रचंड विकासकामे आणि पुढील ५ वर्षाचे संकल्प पत्र पाहता आमदार सरनाईक यांचा विजय निश्चित असून त्यांना ठाणे – मीरा भाईंदर मधील यादव समाज तसेच , अल्पसंख्याक संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. यावेळी प्रताप सरनाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे , असा निर्धार यावेळी करण्यात आला. ‘सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास’ हे सूत्र घेऊनच आमदार सरनाईक यांनी आजवर विकासाची कामे सर्वाना सोबत घेऊन केली असल्याने त्यांना व्यापक जन समर्थन मिळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यादव समाज या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राहतो. विशेष म्हणजे ‘फेक नॅरेटिव्ह’मुळे यातील काही लोक लोकसभा निवडणुकीत हे महाविकास आघाडीसोबत गेले होते. पण आता त्यांनी शिवसेना – भाजप महायुतीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांची विकासकामे दिसत आहेत आणि त्यांची प्रभावी कार्यशैली , मतदारसंघातील जनतेशी त्यांचा असलेला थेट संपर्क यामुळे आम्ही त्यांना समर्थन देत आहोत व त्यांच्या सक्रिय प्रचारात उतरायचे ठरवले आहे , आमचे प्रत्येक मत हे आमदार प्रताप सरनाईक यांना मिळणार आहे , असे यादव समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.प्राचीन काळात माणसाच्या जीवनात गायीचं अद्वितीय महत्त्व होतं. वैदिक काळात गायींना धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे गायीला कामधेनूही म्हटलं गेलं. राज्यातील विविध भागात गायीच्या विविध प्रजाती आढळतात. गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी घेण्यात आला व तसा शासन निर्णयही लगेच प्रसिद्ध करण्यात आला होता. भारतीय परंपरेत गायीला प्रचंड महत्त्व आहे. त्याचा हवाला देऊनच सरकारने हा निर्णय घेतल्याने यादव समाज हा खुश आहे. या निर्णयाने यादव समाज आणखी प्रभावित झाला. राज्य सरकार व आमदार सरनाईक यांच्या विकासकामांचा धडाका यामुळे आम्ही यादव समाज आमदार सरनाईक यांना एक गठ्ठा मतदान करणार , असेही पदाधिकारी म्हणाले.आमदार प्रताप सरनाईक यांनी मतदारसंघात लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम केले आहे. कोणताही भेद त्यांनी केला नाही. सर्व समाजघटकांसाठी त्यांनी विकासाची अनेक कामे केली आहेत.  त्यामुळे सर्व समाजातून त्यांना समर्थन , पाठींबा मिळत आहे. गेल्या १५ वर्षात आमदार प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण मतदारसंघात चौफेर विकास केला आहे. ठाणे – मीरा भाईंदर मेट्रो , सूर्या पाणी योजना , नाट्यगृह , कॅशलेस हॉस्पिटल , सिमेंट काँक्रीटचे रस्ते , विविध समाज भवने , चांगली उद्याने ,  चौपाटी विकास यासह असंख्य विकास कामे झाली आहेत. प्रत्येक समाज घटकासाठी झालेली विकासकामे व त्यांचा दांडगा जनसंपर्क या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे. अल्पसंख्याक बांधवांसाठीही विकासाची कामे झालेली आहेत. त्यामुळे विविध अल्पसंख्याक समाजाच्या संघटनांनी आमदार सरनाईक यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी नजीब मुल्ला यांना विजयी करा – धनंजय मुंडे

अनिल ठाणेकर ठाणे : कळवा मुंब्र्यातील विधानसभा निवडणुकीतील ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य-अयोग्यची लढाई आहे, सत्य-असत्याची लढाई आहे, धर्म-अधर्माची लढाई आहे, नजीब मुल्ला यांची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलो आहे. मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी नजीबभाईला निवडून आणण्याची ही योग्य वेळ आहे. येत्या २० तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून नजीबभाईला विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांनी मतदारांना केले. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ शमशाद नगर, मुंब्रा येथे मंत्री धनंजय मुंडे यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीरसभेला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यातही महिलांची संख्या लक्षणीय दिसत होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी नगरसेवक राजन किणे, अनिता किणे, मोरेश्वर किणे, रुपाली गोटे, आशरीन राऊत, इब्राहिम राऊत, अजिज शेख, राजू अन्सारी, जफर नोमानी, मनिषा भगत, नेहा नाईक, संगिता पालेकर, ठाणे महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपागर, युवक जिल्हाध्यक्ष विरु वाघमारे, रिदा रशीद, शर्मिला किणे,राजा सूर्यवंशी, नसीम खान, काळूराम पाटील, दत्तुमामा आदी मान्यवर उपस्थित होते. जे स्वतःला लोकांपेक्षा मोठे समजतात, भगवान, ईश्वर, अल्लापेक्षाही मोठे समजतात त्यांना त्यांची जागा दाखवायची हीच योग्य वेळ आहे.कळवा मुंब्र्याची ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य-अयोग्यची लढाई आहे, सत्य-असत्याची लढाई आहे, धर्म-अधर्माची लढाई आहे, नजीब मुल्ला यांची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलो आहे. जितेंद्र आव्हाड हा माणूस दुतोंडी आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाजप बरोबर जाण्यासाठी पत्रकावर सही केली होती. सही करताना विधान परिषदेची मागणीही आव्हाड यांनी केली होती. पण नंतर दादाच्या भितीने सही केली अशी पलटी मारली. टोरन्ट कंपनीकडून इलेक्ट्रिकचा पैसा खाणाऱ्याला पराभूत करा मग मीही टोरन्ट कंपनीला ठेवणार नाही असे वचन देतो. लाडक्या बहिणींना महायुती सरकारने मासिक १५०० मानधन सुरु केल्यावर त्याविरोधात बोलणारे महाविकास आघाडीने आता महिलांना तीन हजार रुपये देम्याचे जाहीर केले आहे.पण ज्या कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश येथून ही कल्पना आणली तेथील निवडणूका संपल्यावर तीन हजार रुपये देण्याची योजना बंद झाली आहे.महाराष्ट्रतही माताभगिनींची महाविकास आघाडीकडून अशीच फसवणूक होवू शकते. मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी नजीबभाईला निवडून आणण्याची हीच योग्य वेळ आहे. येत्या २० तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून नजीब मुल्ला यांना विजयी करा, असे आवाहन मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. चौकट जितेंद्र आव्हाड म्हणतात मला निवडून द्या, मी महिन्याभरात टोरन्ट पाॅवर घालवतो. मंत्री, आमदार असताना टोरन्ट का घालवले नाहीत उलट टोरन्टला चार्ज देतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. मुंब्रा कळव्यातील मतदारांच्या मतांवर आमदार होऊनही थोड्याश्या पैशासाठी मतदारांचे पाकिट मारुन जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःचे घर भरले आहे. यामुळेच टोरन्ट पाॅवर हटविण्यासाठी विद्यमान आमदाराचा पराभव करून मला निवडून द्या असे आवाहन नजीब मुल्ला यांनी केले. 0000

संजय केळकरांना तेली व नामदेव शिंपी समाजाचा पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे : संजय केळकर यांनी समाजातील सर्व घटकांसाठी आजवर भरीव कार्य केले असून ते एकनिष्ठ व एकवचनी आमदार म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांच्या या कार्यामुळे विधानसभा निवडणुकीत तेली समाजसह नामदेव शिंपी समाजाने त्यांना पाठिंबा दिला आहे. ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात तिसऱ्यांदा विजयाची हट्रिक करण्यासाठी भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून संजय केळकर रिंगणात उतरले आहे. मॉर्निंगवॉक, चौक सभा, प्रचार दौरे यामध्ये केळकर यांनी खऱ्या अर्थाने प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना समर्थन देणाऱ्या संस्था आणि नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. त्यानुसार ठाणे शहर विधानसभेचे आमदार म्हणून काम करत असताना केळकर यांनी सर्व सामान्यांमधील अगदी कुठल्याही समाजाच्या किंवा अतिसामान्य व्यक्तिला तसेच कुणासही तितक्याच तन्मयतेने महत्व देता व त्याला कुठल्याही प्रकारे मदत करण्यास तत्परतेने अगदी घरातीलच व्यक्ती असावी असे रात्री अपरात्री सुध्दा धावून जात असतात. केळकर यांच्या याच कार्यशैलीमुळे व पक्षासोबत एकनिष्ठ, एकवचनी दोनवेळा विधानसभा आमदार म्हणून निवडून आला आहात. तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून विधासनसभेत पाठविण्यासाठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे ठाणे शहरातील सर्व समाज व ज्ञातीमधील सर्व बंधू-भगिनी आपणास पाठिंबा व्यक्त करून या लेखी निवेदनाद्वारे आपणांस सुयश चिंतून आपण पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून यावेत म्हणून शुभेच्छा प्रकट करीत असल्याचे पाठिंबा पत्रात म्हंटले आहे. तर दुसरीकडे तेली समाजाने देखील केळकर यांचे समाजातील कार्याची दखल घेत, त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

ठाणे जिल्ह्यात ‘पिपाणी’मुळे ‘तुतारी वाजविणाऱ्यां’ची डोकेदुखी ?

ठाणे : लोकसभा निवडणूकांमध्ये तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर राष्ट्रवादीने (शरद पवार गट) निवडणूक लढविली होती. परंतु या निवडणूकीमध्ये ‘तुतारीवाजविणारा माणूस’ या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चिन्हासोबत ‘ट्रम्पेट’ या चिन्हाला देखील भरमसाठ मतदान झाले. ‘ट्रम्पेट’ला प्रचलित भाषेत ‘पिपाणी’ म्हटले जाते. या पिपाणी चिन्हामुळे शरद पवार गटाला अनेक जागांवर फटका बसला होता. ठाणे जिल्ह्यात आता विधानसभा निवडणूकीसाठी शरद पवार गटाने पाच उमेदवार उभे केले आहेत. या पाचही उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आता पिपाणीमुळे तुतारी वाजविणाऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण १८ विधानसभेच्या जागा आहेत. महाविकास आघाडीने येथील मुंब्रा कळवा, शहापूर, उल्हासनगर, बेलापूर आणि मुरबाड या मतदारसंघात महायुतीसमोर उमेदवार उभे केले आहेत. यातील मुंब्रा कळवा मतदारसंघात…

महाराष्ट्रातील बकासुराचा नाश आता जनतारूपी भीम करणार -अनंत गीते

उल्हासनगर : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस चुरशीचं होतांना दिसत आहे, आणि याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक ४ मधील मराठा सेक्शनमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ एक भव्य चौक सभा आयोजित करण्यात आली होती. उत्साहाने भरलेली ही सभा शिवसेना नेते अनंत गीते आणि उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांच्या धारदार भाषणांनी गाजली. त्यांनी महायुती सरकारवर जोरदार प्रहार करत, जनतेला जणू महाराष्ट्राच्या भविष्याची शपथ दिली. सभेच्या सुरवातीलाच शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. “लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीच्या तीन महिन्यांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी केलेली फसवणूक आहे. या योजनेतून राज्यातील महिलांची फसवणूक होत आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जणू आरसा दाखवला. त्यांच्या या रोखठोक टीकेने श्रोत्यांत एकच खळबळ उडाली. कल्याण पूर्वचे महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे यांनी त्यांच्या भाषणात उल्हासनगरातील मूलभूत समस्यांना हात घातला. पाणी, वीज, रस्ते आणि वाढती गुन्हेगारी हे मुद्दे मांडून त्यांनी तीन वेळा आमदार राहूनही विद्यमान आमदारांनी या क्षेत्रात कोणताही विकास न केल्याचे ठणकावून सांगितले. “येथील जनतेला त्रास सहन करावा लागतो. हा त्रास संपवण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी येथील लोकांच्या मनाला हात घातला. शिवसेना नेते अनंत गीते यांनी आपल्या सडेतोड भाषणातून राज्यातील “नीच राजकारण” आणि फोडाफोडीच्या खेळीवर संताप व्यक्त केला. “महाराष्ट्राची संस्कृती नाती जोडण्याची आहे, ती फोडण्याची नाही. परंतु सध्याच्या सरकारने पक्ष, घर, आणि नाती तोडून महाराष्ट्राला एक विषारी झाडासारखे फोडण्याचे काम केले आहे. या झाडाला मुळासकट उपटावे लागेल, आणि हे काम महाराष्ट्रातील जनतारूपी भीम करतील,” असे ते ठामपणे म्हणाले. अनंत गीते यांनी पुढे सांगितले की, “धनंजय बोडारे म्हणजे जनतेचा भीम आहे, जो महाराष्ट्रातील बकासुराचा नाश करणार आहे.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांमध्ये जणू नवचैतन्य निर्माण केलं. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार धनंजय बोडारे यांना विधान भवनात भगवा फडकवण्यासाठी त्यांनी मतदारांना मनःपूर्वक आवाहन केले आहे. अनंत गीते म्हणाले, “आज महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराने निर्धार केला आहे की यावेळी महाविकास आघाडीचं सरकार राज्यात निवडून यावं. आमच्या हक्काचे सरकार सत्तेत आणण्यासाठी कल्याण पूर्व मतदारसंघातील जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे यांना मतदान करावे. त्यामुळे विधानभवनात भगवा फडकेल आणि शिवसेनेचा आवाज बुलंद होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या सभेला शिवसेना संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, कल्याणचे शहरप्रमुख शरद पाटील, दिलीप मालवणकर, प्रकाश तरे, शेखर यादव, रोहित साळवे, अंजली साळवे, वसुधा बोडारे, सुरेंद्र सावंत, राजेंद्र शाहू, कैलास तेजी, जया तेजी, बापू सावंत, मंगला पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपास्थित होते. परिसरातील सर्व शिवसैनिकांनी सभा यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले. शिवसैनिक, महिला आघाडी व हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सभेत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. सभेच्या अखेरीस जनतेने धनंजय बोडारे यांना विधानसभेत पाठवण्याची शपथ घेऊन निश्चय व्यक्त केला.

नजीब मुल्ला यांच्या समोरील घड्याळाचे बटन दाबून त्यांना विजयी करा – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

अनिल ठाणेकर ठाणे : आपण महायुतीमधून लढतो आहोत, महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्यायचे आहे. वेळ बदल घडविण्याची आहे. मतदारसंघातील वेळ बदलायची आहे, चांगली वेळ आणायची असेल तर नजीब मुल्ला यांच्या समोरील घड्याळाचे बटन दाबून त्यांना विजयी करा, असे आवाहन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मतदारांना केले.तर क्लस्टर डेव्हलपमेंट-रीडेव्हलपमेंट होणार, सुसज्ज रस्ते करणार, कळवा, खारीगाव, पारसिक नगर परिसराचा विकास करणार असे आश्वासन मतदारांना १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी दिले. नजीब मुल्ला यांची प्रचार सभा खारेगाव येथील जय भारत स्पोर्ट्स क्लब च्या पटांगणात आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, विभागप्रमुख शाम पाटील,  शहरप्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक उमेश पाटील, मनोज लासे,विजया लासे,अनिता गौरी, गणेश कांबळे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपागर, शिवसेना पदाधिकारी राकेश पाटील, रचना पाटील, सुनील पाटील, सुनील गौरी आदी पदाधिकारी तसेच मोठ्यासंख्येने मतदार उपस्थित होते. नजीब मुल्ला यांच्या रुपाने एक आश्वासक चेहरा मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून महायुतीने दिलेला आहे. ठाणे महापालिकेतील कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.मतदारांनी लोकप्रतिनिधी निवडून देताना खासदार, आमदार,…

प्रताप सरनाईक यांना विविध संस्था – समाज संघटनांचा पाठिंबा जाहीर

अनिल ठाणेकर ठाणे : ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार   शिवसेना , भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस , आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रताप सरनाईक यांना मतदारसंघातील विविध संस्था , समाज…

फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंटधारकावर गुन्हा दाखल

आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या ठाणे : समाजात जातीय तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचा मजकूर समाजमाध्यमांवर पोस्ट करणाऱ्या “आमची मुंबई” या फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंटधारकांविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी 145 मिरा भाईंदर…

ठाण्यातील खोपट बसस्थानकावरील प्रवाशांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

ठाणे : लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्ज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वांनी न चुकता दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहन खोपट परिसरातील बसस्थानकावर करण्यात आले. 148 ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूकविषयक मतदार जनजागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खोपट परिसरातील बसस्थानकावर मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या जनजागृती मोहिमेत बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाचे मतदान जनजागृतीबाबत लावण्यात आलेले मोठे फलक हे प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी स्वीपच्या पथकाने बसस्थानकावरील प्रवाशांना मतदानाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमात ठाणे परिवहन बसस्थानक येथील सर्व अधिकारी, कर्मचारी व प्रवासी सहभागी झाले होते. यावेळी ‘मतदान जनजागृती’विषयक “माझं मत माझा अधिकार”, “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” आणि “जागरूक मतदार लोकशाहीचा आधार” या घोषणा सर्व प्रवाशांनी मोठ्या आवाजात सामूहिकपणे दिल्या.

मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

ठाणे : विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदारयादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य…