Category: ठाणे

Thane news

निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

ठाणे : विधानसभा निवडणूकीचे काम करण्यास नकार देणाऱ्या विविध शासकीय निमशासकीय आस्थापनातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये ठाणे जिल्ह्यातील 72 लाख 29 हजार 339 मतदार करणार मतदान

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.ठाणे जिल्ह्यात 134-भिवंडी ग्रामीण (अ.ज.), 135-शहापूर (अ.ज.), 136-भिवंडी पश्चिम, 137-भिवंडी पूर्व, 138-कल्याण पश्चिम, 139-मुरबाड, 140-अंबरनाथ (अ.जा.), 141-उल्हासनगर, 142-कल्याण पूर्व, 143 डोंबिवली, 144-कल्याण ग्रामीण, 145-मिरा भाईंदर, 146-ओवळा माजिवाडा, 147-कोपरी पाचपाखाडी, 148-ठाणे,…

कळवा मुंब्र्यात लोकच बदल घडविणार- आनंद परांजपे

पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणार- नजीब मुल्ला ठाणे : १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार नजीब मुल्ला यांनी कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आणि अभिवादन करून कळवा…

रविवारच्या दिवशी रायगड गल्ली परिसरात केळकरांच्या झंझावाताला जोरदार प्रतिसाद

अनिल ठाणेकर ठाणे : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांची रविवारी सकाळी जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचा श्रीगणेशा रायगड गल्ली परिसरातील गणेश मंदिरातील बाप्पाच्या दर्शनाने झाला. रविवार असल्याने सुट्टीच्या दिवशी मतदारांशी संवाद साधल्याने या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहण्यास मिळाले. याचदरम्यान महिलांनी त्यांचे औक्षण सुद्धा केले. पाचपाखाडी, चंदनवाडी , नामदेववाडी परिसरातून प्रत्येक घरातून महिला प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या झंझावात रॅली रायगड गल्ली भागातुन सुरू झाली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार, अशोक (भाऊ) राऊळ,…

ओवळा माजिवड्यात प्रताप सरनाईक यांचा झंझावात

अनिल ठाणेकर ठाणे : प्रताप सरनाईक यांच्या प्रचार रॅलीत आगरी कोळी बांधवांनी त्यांच्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन प्रचाराचा उत्साह द्विगुणीत केला. त्यांनी प्रताप सरनाईक यांना देखील पारंपारिक वेशभूषा परिधान करण्याचा आग्रह…

गुजरात उच्च न्यायालयाचा अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचारी म्हणून नियमित करण्याचा आदेश देशभरात लागू करा !

अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : गुजरात उच्च न्यायालयाचा अंगणवाडी सेविका, मदतनिसांना वर्ग ३ व ४ चे शासकीय कर्मचारी म्हणून नियमित करण्याचा आदेश संपूर्ण देशात ताबडतोब लागू करा, अशी मागणी अखिल भारतीय…

ई रिक्षा वाढत्या पर्यटनाचा केंद्रबिंदू

माथेरान : माथेरानच्या पर्यटन वाढी सोबतच राजकारणाचा एक अविभाज्य भाग बनलेल्या ई रिक्षामुळे इथल्या गल्लीबोळातले राजकारण सुध्दा रंगताना दिसत आहे.काही राजकीय पक्षांनी या ई रिक्षाचा मुद्दा घेऊन पतसंस्था निवडणुकीत विजय मिळवला होता तर काही गावाचे हित पाहणाऱ्या राजकीय लोकांनी राजकारण बाजूला ठेवून सकारात्मक विचार करून गावात सुविधा उपलब्ध व्हायलाच हव्यात याकामी ई रिक्षा साठी आपली प्रतिष्ठा पणाला लावून परिणामाची चिंता न करता पतसंस्था निवडणुकीत पराभवाला सामोरे गेले आहेत.मुळात ज्यांनी ज्यांनी ई रिक्षाला प्रखर विरोध दर्शवून राजकारण करून सर्वसामान्य लोकांची मते घेऊन पतसंस्थेत सत्ता स्थापन केली तीच राजकीय पक्षांची मंडळी या ई रिक्षाचा आपल्या घरापर्यंत वापर करताना दिसत आहेत. ह्याच ई रिक्षा यापुढेही प्रत्येक राजकीय वातावरणात महत्वाचा विषय ठरणार आहेत. एकीकडे ई रिक्षाला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूने याचा वापर सुध्दा तितक्याच जोमाने करायचा अशी दुहेरी भूमिका विरोधक मंडळी बजावत आहेत. सध्या ह्या रिक्षांची संख्या वीस असून अद्यापही उर्वरित ७४ रिक्षा येणार आहेत. आणि याच येणाऱ्या रिक्षांची संख्या कमी व्हावी यासाठी राजकीय पक्षांना हाताशी धरून कुणी या पक्षातून दुसऱ्या पक्षात बेडूक उड्या मारत आहेत.आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकी मध्ये ई रिक्षा समर्थक आणि विरोधक असाच सामना पहावयास मिळणार आहे. ई रिक्षामुळे खऱ्या अर्थाने पर्यटन क्रांती घडत आहे हेही विरोधात असणाऱ्या लोकांना माहीत आहे परंतु केवळ राजकारण करून लोकांची दिशाभूल करून सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय मंडळी अग्रेसर दिसत आहेत. लवकरच ई रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट डिसेंबर महिन्यात पूर्ण होऊन उर्वरित ७४ रिक्षा डेरेदाखल होणार आहेत यात शंकाच नाही. या सर्व मिळून ९४ ई रिक्षा सुध्दा पर्यटकांना कमी पडणार आहेत. गावाच्या इतिहासात प्रथमच एक नाविन्यपूर्ण बदल ई रिक्षाच्या माध्यमातून समस्त नागरिक अनुभवत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे आबालवृद्ध मंडळी बरोबरच रुग्णांना सुध्दा या सेवेचा लाभ मोठया प्रमाणावर होत आहे. स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने पर्यटकांना ही एक पर्वणीच ठरली आहे. आजवर हजारो पर्यटकांसह स्थानिक लोक सुध्दा याचा उपभोग घेत आहेत.अधिकारी वर्गाला सुध्दा आपल्या कार्यालयापर्यंत सध्या तरी मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.मुळात ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीनी सहकार्याची भूमिका बजावली नव्हती त्यांनी आपले हात झटकले होते.कारण हा एक संवेदनशील विषय असल्यामुळे सुप्रीम कोर्टाशिवाय परवानगी मिळणे कठीण होते. त्यासाठी रिक्षा संघटनेने जवळपास बारा वर्षे पाठपुरावा केल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सनियंत्रण समितीच्या परवानगीने पायलट प्रोजेक्ट म्हणून या रिक्षा कार्यरत आहेत.पर्यटकांची वाढती संख्या पाहता वीस रिक्षा अपुऱ्या पडत आहेत त्यासाठी सनियंत्रण समितीने लवकरच उर्वरीत ७४ रिक्षांना परवानगी देऊन इथे पर्यटन क्रांती घडवून आणावी अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे. या ई रिक्षांची संख्या कमी आहे इथे आल्यावर खूप वेळ प्रतीक्षा करावी लागते. एक सोयीस्कर आणि स्वस्त प्रवास उपलब्ध झाला आहे हे खूपच छान आहे.रिक्षात मोठया बॅगा घेत नाहीत त्यासाठी हमाल करावा लागतो हा खर्च परवडत नाही त्यासाठी सामान सुध्दा घ्यायला हवे. लोचन पानसरे—-पर्यटक मुंबई

मुरबाड विधानसभा क्षेत्रात नक्कीच परिवर्तन घडेल-सुरेश म्हात्रे

राजीव चंदने मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांना अनुकूल वातावरण आहे. महायुतीच्या कारभाराला कंटाळलेले नागरिक मुरबाड मध्ये नक्कीच परिवर्तन घडवतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी आज व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या सरळगाव येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी सरळगाव, टोकावडे येथील कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. तसेच शिरोशी येथील कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केले. तर तळेगाव, न्याहाडी, मोरोशी भागात रॅली काढून मतदारांना महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी उमेदवार सुभाष पवार, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आप्पा घुडे, महिला उपजिल्हाप्रमुख राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक वाघचौरे, आरपीआय सेक्युलर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. रुपाली कराळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कविता वारे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत परिवर्तनाची नांदी घडविली. तीच परंपरा विधानसभा निवडणुकीतही कायम राहील, असा विश्वास खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी व्यक्त करून महायुती सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महाविकास आघाडीला विजयी करावे, असे आवाहन श्री. म्हात्रे यांनी केले. मुरबाड तालुक्याबरोबरच बदलापूर शहर, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातूनही मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबरच शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व कॉंग्रेसचे कार्यकर्तेही झोकून कार्य करीत आहेत. महायुतीचे काही भागातील कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नक्कीच परिवर्तन घडेल, असा विश्वास उमेदवार सुभाष पवार यांनी व्यक्त केला. मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये २०२१ मध्ये सर्व शाळांमध्ये १०० टक्के शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यातील काही शिक्षक निवृत्त झाले असून, तेथील रिक्त जागी शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शिक्षकांच्या रिक्त जागांच्या मुद्द्यांवरुन तालुक्यातील मतदारांची दिशाभूल केली जात आहे, याकडे सुभाष पवार यांनी लक्ष वेधले.

द्वेष गाडायचा असेल तर जितेंद्र आव्हाड हाच एकमेव पर्याय – संजय सिंह

अनिल ठाणेकर ठाणे : भाजप हा पक्ष फक्त द्वेषाचे राजकारण करीत आहे. धर्माच्या नावावर या देशात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या द्वेषाचे राजकारण आता मुंब्र्यात आणले जात आहे अन् त्या राजकारणाला गाडायचे असेल तर जितेंद्र आव्हाड हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन आप चे राष्ट्रीय प्रवक्ते , खासदार संजय सिंह यांनी केले.  महाविकास आघाडीचे उमेदवार,  आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी संजय सिंह यांनी मुंब्रा येथील अलमास कॉलनी आणि  तन्वीर नगर येथे सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर शमीम खान,  शानू पठाण, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संजय सिंह पुढे म्हणाले की, इथे डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ जमा झालेले लोक बघून आपले ठाम मत झाले आहे की  त्यांचा विजय एक लाख मतांनीच होणार आहे. आपण जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी येण्याची दोन कारणे आहेत: पहिले म्हणजे, डॉ.जितेंद्र आव्हाड हे दुसर्‍याचे दुःख पाहून त्याच्या दुःखी होणारे व्यक्तिमत्त्व आहे. मी जेव्हा मोदींच्या हुकूमशाहीविरोधात बोललो तेव्हा मला जेलमध्ये टाकण्यात आले. त्याप्रसंगी दिल्लीत माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जितेंद्र आव्हाड हेच धावून आले होते आणि दुसरे कारण म्हणजे जो कोणी द्वेष पसरविणाऱ्या भाजपविरोधात लढतो, त्याच्या सोबत उभे राहण्यासाठी मी नेहमीच सज्ज असतो. जितेंद्र आव्हाड हे द्वेषाच्या राजकारणाविरोधात लढत आहेत. म्हणूनच मी इथे आलो आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेण्याची भाषा देशाचे विधी मंत्री करीत आहेत. पण, जेपीसीसमोर हा विषय चर्चेला आता आला आहे. 800 पानांच्या अहवालापैकी फक्त 100 पाने वाचून झाली आहेत. त्याआधीच जर कायदा करण्याची भाषा केली जात असेल तर ते संविधानविरोधी कृत्य आहे. हे सरकार संविधानाशी आणि लोकशाहीशी गद्दारी करीत आहेत. आजची स्थिती अशी आहे की, “वतन की हालत सुनायेंगे तो पत्थर भी रोऐंगे” हे शिंदे सरकार नको त्या गोष्टी सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे. माझे म्हणणे आहे की त्यांनी कधी तरी शिक्षण, रोजगार, महागाई, महिला अत्याचार यावर बोलावे, असे आवाहन सिंह यांनी केले. योगी महाराष्ट्रात येतात आणि बटेंगे.. काटेंगेचा  नारा देत आहेत. मी तुम्हाला सांगतोय की हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे. कारण, भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी खोटं बोलण्यात मास्टरकी मिळविली आहे. मोदी म्हणतात की से लोक बेटी पळवतील; लोक सुरक्षित नाहीत. माझे म्हणणे आहे की गेल्या दहा वर्षात जर लोक सुरक्षित नसतील तर मोदींचे अपयश असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा. लक्षात घ्या कोणताच धर्म द्वेष पसरवित नाही. द्वेष हटवण्यासाठी बंद पडलेले घड्याळ फेकून तुतारी वाजविली पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांचा विजय हा तमाम सामन्यजणांचा विजय असणार आहे. त्यामुळेच तुतारी समोरील एक नंबरचे बटन दाबा,असे आवाहन केले. दरम्यान,  डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी, महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात महागाई वाढलेली आहे. महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत आहेत. असहिष्णुतेची परंपरा आपल्या महाराष्ट्रात वाढीस लागली आहे. ती गाडण्यासाठी आपणाला लढावे लागणार आहे. काल परवा केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून गेले. धर्मद्वेषाचे राजकारण हे सरकार  उघड्या डोळ्याने पहात आहे. द्वेषाचे राजकारण करून आपण विजयी होऊ असे त्यांना वाटत असले तरी आपण ते होऊ द्यायचे नाही. द्वेषमूलक राजकारण करणाऱ्या सरकारचा महाराष्ट्रात नक्कीच पराभव होणार आहे, असा विश्वासही डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.  विशेष म्हणजे, यावेळेस उपस्थित जनसमुदायाने एक नंबर.. एक नंबर अशा घोषणा देत डॉ.जितेंद्र आव्हाड यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

भुजबळांनी ईडीच्या गैरवापरचा भांडाफोड केला- जितेंद्र आव्हाड

ठाणे : ईडी, सीबीआय, आयकर विभाग या यंत्रणांचा वापर करून विरोधकांना सतावून आपल्या पक्षात घेण्याचे काम भाजपा करत असल्याचे आम्ही सातत्याने सांगत होतो. मंत्री छगन भुजबळ‌ यांनी केलेल्या विधानामुळे तपास यंत्रणाचा गैरवापर होत असल्याचे उघड झाले असून…