Category: ठाणे

Thane news

ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात

ठाणे : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने ठाणे जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जाते. यंदाही हे सर्वेक्षण पार पडले…

सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांचा प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा

राज भंडारी पनवेल : करंजाडे येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी उरण विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. उरण विधानसभा मतदारसंघातून शेकापचे प्रीतम जे एम म्हात्रे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांना विविध संघटनांचा, पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यासह प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला. प्रीतम म्हात्रे हे उरणचे आमदार व्हावे ही काळाची गरज आहे. ते तरुण उमेदवार असल्याने आणि उरणचा विकास व्हावा यासाठी नागरिकांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन विनोद साबळे यांनी केले.

नजीब मुल्ला हे नक्कीच निवडून येतील – भाऊ कदम

अनिल ठाणेकर ठाणे : अजितदादांनी लाडक्या बहिणींची काळजी घेतली त्यामुळे बहिणींनी मला ओवाळले. या बहिणींचा उत्साह पाहून अजितदादांनी दिलेले उमेदवार नजीब मुल्ला हे नक्कीच निवडणूक येतील अशीआशा मला वाटते असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी काढले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महिला जिल्हाप्रमुख लता पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, गणेश साळवी, गणेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. अजितदादा पवार यांनी मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. लोकांचे विकासकामे होण्यासाठी लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी  महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला निवडून येणे गरजेचे आहे. नजीब मुल्ला यांच्या विरोधात माजी मंत्री असलेले उमेदवार उभे असले आणि सामना अटीतटीचा असला तरी अजितदादांनी लाडक्या बहिणींची काळजी घेतली त्यामुळे बहिणींनी मला ओवाळले. या बहिणींचा उत्साह पाहून अजितदादांनी दिलेले उमेदवार नजीब मुल्ला हे नक्कीच निवडणूक येतील अशीआशा मला वाटते असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी काढले.१४९ – मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे (शिवसेना, भाजपा, आरपीआय – आठवले गट, आरपीआय – कवाडे गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांची  गुरुवारी प्रभाग क्रमांक २३, शिवसेना मध्यवर्ती शाखा, कळवा नाका येथून प्रचार रॅली आयोजित करण्यात आली. या प्रचार रॅलीत प्रसिद्ध अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारकभाऊ कदम यांची विशेष उपस्थिती होती. नजीब मुल्ला यांची प्रचार रॅली शिवसेना मध्यवर्ती शाखा, कळवा नाका येथून सुरु होऊन मनिषा नगर, सह्याद्री सोसायटी, सुदामा सोसायटी, साईबाबा नगर, गीतांजली सोसायटीमार्गे, गावदेवी मंदिर-शंकर मंदिर, आईनगर, घड्याळ चौक , शिवसेना मध्यवर्ती शाखा,कळवा नाका येथे समारोप करण्यात आला.

 कल्याण, डोंबिवलीतील बंडखोरांचे पाठीराखे प्रचारातून गायब

बंडखोर, अपक्षांचा एकला चलो रे मार्गाने प्रचार   कल्याण : कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवलीत ज्या पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठबळावर शिंदे शिवसेना, भाजपमधील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. ते सर्व जोरकस कार्यकर्ते, पदाधिकारी आता बंडखोरांच्या प्रचारातून गायब झाल्याचे चित्र आहे. शिवसेना, भाजपने बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईचा फटका आपणास आणि येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये आपणास बसू नये म्हणून सुरुवातीला बंडखोरांना पाठबळ देणारे भाजप, शिवसेनेतील कार्यकर्ते आता बंडखोरांच्या प्रचारातून गायब झाल्याचे समजते. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेतून महेश गायकवाड दोन वर्षांपासून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. माजी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकारानंतर वातावरण बदलले. कल्याण पूर्व भागातून शिंदे शिवसेनेतून नीलेश शिंदे, विशाल पावशे, प्रशांत काळे यांची नावे विधानसभेसाठी चर्चेला होती. या गटाने लोकसभा अधिवेशन सुरू असतानाच्या काळात दिल्लीत जाऊन खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन विधानसभेची व्यूहरचना आखली होती. यात शिंदे, पावशे उमेदवारीसाठी आघाडीवर होते. भाजपने कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात अचानक सुलभा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शिंदे शिवसेनेतील महेश गायकवाड यांच्यासह निष्ठावान गट तीव्र नाराज झाला. या गटाने सुरूवातीला सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीवरून जोरदार फडफड केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. शिंदे यांनी या नाराज निष्ठावान शिवसैनिकांना सबुरीचा सल्ला दिल्यानंतर ते शांत झाले. ही नाराजाची ताकद आपणास मिळेल या आशेने महेश गायकवाड निवडणूक लढविण्याच्या विषयावर ठाम राहिले. महेश गायकवाड यांनी गणपत गायकवाड यांना आव्हान देण्यासाठी आपला उमदेवारी अर्ज कायम ठेवला. शिवसेनेकडून झालेल्या हकालपट्टीच्या कारवाईला त्यासाठी ते सामोरे गेले. आता महेश गायकवाड कल्याण पूर्वेत जोरदार प्रचार करत आहेत. यासाठी स्थानिकांसह भिवंडी भागातून त्यांनी तगडी फौज कल्याण पूर्वेत प्रचारात उतरवली असल्याचे समजते. या प्रचारात सुरुवातीला महेश यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारे निष्ठावान शिवसैनिक मात्र त्यांच्या प्रचारातून गायब असल्याचे चित्र आहे. डोंबिवलीत ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी गणेशोत्सव काळात आगरी समाजातील माजी नगरसेवक, समाजाला संघटित करून भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत दीपेश यांनी मंत्री चव्हाण यांच्यावर त्यांचा वाढदिवस इतर विषयांवरून व्यक्तिगत पातळीवर टीका केल्याने हा विषय चिघळला. दीपेश यांचे पोलीस संरक्षण काढण्यात आले. त्यांचे समर्थन करणाऱ्या एका ज्येष्ठ माजी नगरसेवकाला तडीपाराची नोटीस बजावण्यात आली. या कारवायांमुळे दीपेश यांच्या पाठीशी असलेला आगरी समाजासह इतर नाराज गट त्यांची साथ सोडून पुन्हा मूळ स्थानी आला. आता दीपेश म्हात्रे प्रदेश काँग्रेसचे नेते संतोष केणे यांच्या साथीने प्रचारात उतरले आहेत. कल्याण पश्चिमेत माजी खा. कपिल पाटील यांचे नातेवाईक वरूण पाटील निवडणूक लढवित आहेत. भाजपने त्यांची हकालपट्टी केली आहे. लोकसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमेत शिवसेनेने काम न केल्याच्या रागातून शिवसेनेला उपद्रव देण्यासाठी ही खेळी पाटील गटाकडून खेळण्यात आल्याचे समजते. 00000

 ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट

दिवाळीनंतर पालिकेचे निघाले दिवाळे   ठाणे : यंदा दिवाळी सणापुर्वी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासह एक महिन्याचे आगाऊ वेतन देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या तिजोरीत राज्य शासनाकडून वस्तु व सेवा करापोटी मिळालेले ९५ कोटी आणि इतर रक्कम असे जेमतेम १०० कोटी रुपये शिल्लक आहेत. या रक्कमेतून पुढच्या म्हणजेच डिसेंबर महिन्याचे वेतन देण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. तसेच निवडणुक कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याने पालिकेची कर वसुली ठप्प झाली आहे. यामुळे दिवाळीनंतर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिकेचा यंदाच्या वर्षाचा म्हणजेच २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ५ हजार २५ कोटी रुपयांचा आहे. या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना पालिकेने कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून दिले आहे. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. याशिवाय, शहर विकास विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि अग्निशमन विभागांकडून पालिकेला चांगले उत्पन्न मिळते. यामुळे या विभागांची कर वसुली महत्वाची मानली जाते. मालमत्ता विभागाने ८९३ कोटीपैकी ४२१ कोटींची, अग्निशनम दलाने १०० कोटींपैकी ५० कोटी ५८ लाख, शहर विकास विभागाने ७५० कोटींपैकी ३३० कोटी आणि पाणी पुरवठा विभागाने २२५ कोटींपैकी ४११ कोटी रुपयांची कर वसुली केली आहे. राज्य शासनाकडूनही पालिकेने विविध प्रकल्पांसाठी मोठ्याप्रमणात अनुदान मिळालेले आहे. यामुळे करोना काळानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या पालिकेची आर्थिक स्थिती काहीशी रुळावर येताना दिसून येत होते. याशिवाय, पालिकेने मार्च २०२३ पर्यंतची ठेकेदारांची देयकेही दिली आहेत. यामुळे पालिकेचे दायित्वही काही प्रमाणात कमी झालेले आहे. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पालिकेने सानुग्रह अनुदानासह एक महिन्याचे आगाऊ वेतन दिले आहे. ठाणे महापालिकेचे २ ते ४ या संवर्गातील ६३०० कर्मचारी, शिक्षण विभागातील ७३६ कर्मचारी, ठाणे परिवहन सेवेचे १४९३ कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी व इतर असे ३६५ कर्मचारी यांना २४ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले. तर, ४९२ आशा सेविकांना गतवर्षीप्रमाणेच सहा हजार रुपयांची दिवाळी भेट दिली. याशिवाय, कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच बॅंक खात्यात जमा करण्यात आले. ही सर्व एकत्रित रक्कम सुमारे २२ कोटी रुपये आहे. तसेच स्वच्छता कामांचे देयके, कर्मचाऱ्यांची देणी असे एकूण २३२ कोटी रुपये पालिकेने खर्च केले. यामुळे पालिकेच्या तिजोरीत दिवाळीनंतर ख़डखडाट झाला आहे. पालिकेच्या तिजोरीत राज्य शासनाकडून वस्तु व सेवा करापोटी मिळालेले ९५ कोटी आणि इतर अशी जेमतेम १०० कोटी रुपये आहेत. वस्तु व सेवा कराच्या रक्कमेतून अधिकारी आणि कमर्चाऱ्यांचे वेतन देण्यात येते. यामुळे ही रक्कम नोव्हेंबर महिन्याच्या वेतनासाठी वापरली जाणार आहे. मालमत्ता कराची दिवसाला ५० लाख ते एक कोटी रुपयांची करवसुली होती. पंरतु निवडणुक कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याने पालिकेची कर वसुली ठप्प झाली आहे. यामुळे पालिकेची आवक बंद झाल्याने दिवाळीनंतर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याचे चित्र आहे. ०००००

 ठाण्यातील रिक्षाचालकांकडून प्रवाशांची फसवणूक

‘धर्मराज्य पक्षा’ची आरटीओ आणि वाहतूक विभागाकडे तक्रार   ठाणे : ज्या रिक्षाचालकांकडून अशाप्रकारे मीटरमध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करुन, प्रवाशांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे, अशा समाजकंटकीप्रवृत्तीच्या रिक्षाचालकांचा शोध घेऊन, त्यांच्या रिक्षातील मीटर तपासण्यात यावेत आणि त्यात एखादा रिक्षाचालक दोषी आढळल्यास, त्याचा वाहन परवाना आणि रिक्षा-बॅच कायमस्वरुपी रद्द करुन, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नरेंद्र पंडित यांनी केली आहे. ठाणे शहरातील काही रिक्षाचालक आपल्या मीटरमध्ये फेरफार करुन, प्रवाशांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले असून, रिक्षाचालकांच्या विरोधात ‘धर्मराज्य पक्षा’कडे मोठ्याप्रमाणात तक्रारी आलेल्या आहेत. यासंदर्भात, प्रवाशांनी रिक्षाचालकांस विचारणा केल्यास, जाब विचारल्याचा राग येऊन, काही गुंडप्रवृत्तीचे रिक्षाचालक तर, थेट प्रवाशांशी अरेरावी करणे, असभ्य वर्तणूक करणे; तसेच, शिवीगाळ करणे यासारखे अशोभनीय प्रकार करीत असतात. रिक्षा-व्यवसाय हा, खासगी स्वरुपातील मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रकार असल्याने, समाजातील सर्व घटक, विशेषतः नोकरदारवर्ग रिक्षा वाहतुकीला प्राधान्य देतात. असे असतानाही, स्वतः कष्टकरीवर्गाचे प्रतिनिधित्व करीत असूनदेखील, सकाळ-संध्याकाळ अशा गर्दीच्या वेळी आणि ठिकाणी, खास करुन ठाणे स्टेशन परिसरात, काही रिक्षाचालकांकडून सरळ-सरळ भाडी नाकारली जातात. संतापजनक बाब म्हणजे, अशावेळी महिला, ज्येष्ठ नागरिकांना रिक्षा मिळविण्यासाठी अक्षरशः रिक्षाचालकांपुढे हात जोडावे लागतात. त्यातही अनेक विनवण्या केल्यानंतर किंवा वाहतूक पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर, एखादा रिक्षाचालक भाडे स्वीकारतो; मात्र, लांबचे भाडे असल्यास, हातचलाखीने आपल्या हँडलवर किंवा सीटखाली गुप्त पद्धतीने बसवलेली कळ दाबून, आधीच मीटरमध्ये फेरफार करण्यात आलेले असल्यामुळे, मीटर वाऱ्याच्या वेगाने पळते आणि नियमबाह्यपद्धतीने प्रवाशांकडून प्रवासी-भाडे उकळले जाते. काही दिवसांपूर्वी, समाजमाध्यमांद्वारे एका वाहतूक पोलिसामार्फत, एक व्हिडिओ-क्लिप प्रसारित करण्यात आली होती. त्यामध्ये मीटरच्या डाव्याबाजूला, (आणि प्रवाशाच्या उजव्या हाताला) जिथे आकडे बदलत असतात, त्याठिकाणी कोपऱ्यात एक छोटा लाल रंगाचा ठिपका, सतत बंद-चालू (Blink) होत असल्यास, मीटरमध्ये नक्कीच फेरफार झालेला असल्याचे समजावे, अशी माहिती संबंधित वाहतूक पोलिसाने आपल्या व्हीडिओ-क्लिपद्वारे दिलेली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपायुक्त आणि ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसला संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही – किरेन रिजिजु

अनिल ठाणेकर ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अवमान करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधी यांना बाबासाहेबांच्या संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही. असे वक्तव्य केंद्रीय अल्पसंख्यांक तथा संसदिय कामकाज मंत्री किरेन रिजिजु यांनी केले असुन त्यावेळी बाबासाहेबांना दिलेल्या हीन वागणुकीचे अनेक दाखले देत त्यांनी काँग्रेसचा पर्दाफाश  केला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मविआ आघाडीची पोलखोल करण्यासाठी ठाण्यात भाजप मिडिया सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रिजिजु बोलत होते. याप्रसंगी, खासदार नरेश म्हस्के, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, भाजप प्रदेश प्रवक्ते सागर भदे,माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, रिपाईचे भास्कर वाघमारे आदीसह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात महायुतीसाठी उत्तम वातावरण असल्याचे सांगुन केंद्रीय मंत्री रिजिजु यांनी, राहुल गांधींनी नागपुर येथील कार्यक्रमात संविधानाच्या नावाखाली कोऱ्या लाल रंगाच्या पुस्तिकेचे ढोंग रचल्याचे सांगितले. राहुल गांधी आणि काँग्रेसने नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित केले. त्यामुळेच १९५१ साली बाबासाहेबांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संविधानात देखील काँग्रेसने बदल केले, हा संविधानावरील पहिला हल्ला होता. १९७५ मध्ये आणीबाणी लागु करून संविधानाचा पायाच काँग्रेसने उध्वस्त केला.१९९० मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेतुन  पायउतार झाल्यावर आलेल्या सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला, त्यात भाजपचाही समावेश होता. तर दुसरीकडे २६ नोव्हे. रोजी संविधान दिन साजरा करून तसेच देशभरात संविधान मंदिरे उभारून भाजप संविधानाचा सन्मान करीत आहे. आणि, काँग्रेस केवळ संविधान बदलण्याचा बागुलबुवा उभा करून देशात फेक नॅरेटीव्ह पसरवत असल्याचे मंत्री रिजिजु यांनी सांगितले.नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर जगात देशाची प्रतिमा उंचावली. महाराष्ट्रात २०१४ नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर बदल झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते नागपुर समृद्धी महामार्ग हा जागतीक दर्जाचा महामार्ग उभारला आहे. राज्यात लाडकी बहिण सारख्या योजना लोकप्रिय होत आहेत. देशाला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र एक प्रकारे डबल इंजिनचे काम करीत आहे.तेव्हा,हा विकास अधिक वेगाने पुढे नेण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली असुन जातीजातीत विभागले जाऊ नका असे आवाहन मंत्री रिजिजु यांनी केले. आजवर काँग्रेसने मुस्लिमांसह एससी, एसटी आणि दलित समाजाची मते घेतली. पण त्यांना न्याय दिला नाही. याउलट भाजपने सबका साथ सबका विकास या अनुसार सहा अल्पसंख्यांक समाजाना समान दर्जा दिला आहे. तर हिंदु समाजात फूट पाडून इतकी वर्षे काँग्रेसने मुस्लिमांना मुर्ख बनवले. मुस्लिम समाजाची व्होट बँक खिशात ठेवूनही काँग्रेसने मुस्लिमांना कोणताच लाभ दिला नसल्याचे सांगुन मंत्री रिजिजु यांनी, काँग्रेसची फोडा आणि राज्य करा …ही निती आता चालणार नसल्याचे स्पष्ट केले.

रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची लूट

ठाणे : रिक्षातील इलेक्ट्रॉनिक मीटरमध्येही फेरफार करून प्रवाशांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. गेल्या महिन्यात मुंबईत घडलेल्या घटनेची एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. अशाच प्रकरणांमध्ये गेल्या महिन्याभरात ठाणे उपप्रादेशिक विभागाकडे तीन तक्रारी दाखल झाल्या असून त्याची दखल घेत परिवहन विभागाने रिक्षाचालकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड आकारला. रिक्षा प्रवासात अनेकदा प्रवाशांना चालकांच्या मुजोरीचा सामना करावा लागतो. काही वेळा मीटर वाढवण्यासाठी चुकीच्या किंवा लांब अंतरावरून रिक्षा घेऊन जाणे कमी अंतरासाठी अधिकचे भाडे आकारणे, अकारण वितंडवादांना प्रवाशांना सामोरे जावे लागत असते. ऑक्टोबरमध्ये मुंबईत यासंदर्भातील एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. असाच प्रकार आता ठाणे शहरातही सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणांत ऑक्टोबरमध्ये ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तीन तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर रिक्षाचालकांवर कारवाई केली. बाळकुम ते कापुरबावडी २३ रुपये मीटर होते, मात्र फेरफारीमुळे ४० रुपये होत असल्याचे प्रिया पार्टे म्हणाल्या. मीटर फेरफार असे… मीटरचा वेग वाढवण्यासाठी रिक्षाच्या हँडलमागे असलेले बटण रिक्षाचालकाने सुरू केल्यास मीटरचा वेग वाढतो. तर बंद केल्यास मीटरचा वेग पूर्ववत होतो. अशा वेळी चालकाने बटण सुरू करताच मीटरवरील शेवटच्या आकड्यानंतर एक छोटा पॉइंट बंद-चालू (ब्लिंक) होताना दिसतो. मीटरवर २३.०० सहसा असे मीटर भाडे दिसते, परंतु बटणाच्या साह्याने चालकाने त्यात फेरफार केल्यास मीटरवर दिसणाऱ्या रकमेच्या म्हणजेच २३.०० या रकमेच्या शेवटी एक पॉइंट दिसतो. म्हणजेच ही रक्कम मीटरवर २३.००. अशी दिसेल. असे आढळल्यास नागरिकांनी संबंधित रिक्षाचालकाची तक्रार त्याच्या रिक्षाच्या क्रमांकासहित जवळच्या प्रादेशिक विभागामध्ये करावी, असे परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले. मीटर वाढवण्यासाठी चुकीच्या किंवा लांब अंतरावरून रिक्षा घेऊन जाणे कमी अंतरासाठी अधिकचे भाडे आकारणे, अकारण वितंडवादांना प्रवाशांना सामोरे जावे लागत असते. मीटरच्या संदर्भात काही संशयित आढळल्यास वा चालक भाडे जास्तीचे घेत असल्यास ९४२०४७३९६९ या क्रमांकावर वा mh04 rikshawcomplaint@gmail. com या मेल आयडीवर संपर्क साधावा. – हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी 0000  

सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा दाखल करा – सुहास देसाई

अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विनधान करणारे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्ष सुजाता घाग यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी पत्र दिले आहे. आ. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर व्यंगात्मक टीका केली होती. या टीकेच्या अनुषंगाने ही तक्रार करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य, ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी , प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस राजेश कदम, माधुरी सोनार ताई , कोपरी पाचपाखाडी विधान सभा अध्यक्ष विक्रांत घाग, भिषण सिंग जोहर, इक्बाल शेख, राहुल बर्वे, फुलबानो पटेल, ज्योती निम्बर्गी, रेश्मा भानुशाली, हाजी बेगम , मल्लिका पिल्ले, आशिष खाडे आणि अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महिला धोरण, औद्योगिक धोरण, कृषी धोरण, युवा धोरण, क्रीडा धोरण निश्चित केले आहे. याबाबत शासन दरबारी नोंद आहे. असे असतानाही विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशाने शरद पवार यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले, असे विधान केले. त्यांचे हे विधान म्हणजे जनतेला मूळ मुद्यापासून भरकटवून टाकण्याचा प्रकार आहे. जनतेची दिशाभूल करून जनतेच्या मनात  शरद पवार यांच्याबाबत रोष निर्माण करून माथेफिरूंकडून शरद पवार यांचे जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रकार हा गंभीर गुन्हा असून आदर्श आचारसंहितेचा भंग देखील आहे. तसेच, सदाभाऊ खोत यांनी  शरद पवार  यांच्यावर झालेल्या शस्रक्रियेबाबतही अनुचित वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या तोंडाबाबतही लाजीरवाणी विधाने करून आमच्या तसेच शरद पवार  यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. सदाभाऊ खोत यांनी लोकांना चिथावणी देऊन शरद पवार यांच्या जीविताला धोका निर्माण करणे, जनतेची दिशाभूल करून आदर्श आचारसंहितेचा भंग करणे, तसेच आमच्या भावना दुखावणे असे प्रकार केल्याने सदाभाऊ खोत यांच्यावर संबधित प्रकरणाचे योग्य त्या कलमान्वये गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

विहंग प्रतिष्ठानतर्फे दिवाळी अंक प्रदर्शन

ठाणे : विहंग प्रतिष्ठान आणि नेहरुनगर नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ८ नोव्हेंबरपासून १० नोव्हेंबरपर्यंत नेहरुनगर कुर्ला येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनाचे…