Category: ठाणे

Thane news

संजय केळकर यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने दिला जाहीर पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच असून त्यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी आपल्या पदाधिकारी यांच्या सह नुकतीच केळकर यांनी भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे. भाजपने पुन्हा एकदा संजय केळकर यांच्या विश्वास दाखवत ठाणे शहर विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यानुसार त्यांनी आता आपला प्रचार सुरू केला आहे. त्यांना विविध संघटना आणि पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. त्यात आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी केळकर यांनी भेट घेतली आणि पाठिंबा दर्शविणारे पत्र दिले आहे. केळकर यांना ठाणे शहरातील जनतेची सेवा करण्याची संधी भाजपने दिली त्यासाठी मी भाजपचे आभार मानतो असे सांगत उघडे यांनी केळकर यांच्या कार्याचा गौरव केला. केळकर हे असे आमदार आहेत की जे गोर गरीब जनेतसाठी सदैव सेवेत उपलब्ध असतात. जनेतला न्याय देणार खरा आमदार हे केळकर आहेत असेही ते म्हणाले. केळकर हे आपल्याच पक्षाचे उमेदवार असल्याचे समजून त्यानुसार त्यांच्यासाठी आपल्या सर्वांना एकदिलाने काम करायचे आहे असे अवाहन त्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना केले. केळकर यांना भरघोस मतांनी निवडून आणायचे असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

सिडकोच्या २६ हजार घरांच्या अर्जनोंदणीसाठी अखेरचे ७ दिवस

नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ६८ हजार इच्छुकांनी या महागृहनिर्माणात घर मिळावे यासाठी अर्जनोंदणी केली आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणीची अखेरची मुदत सिडकोने…

नवी मुंबईत शिंदे शिवसेनेचे बंड कायम;

ऐरोलीत विजय चौगुले, तर बेलापूरमध्ये विजय नहाटा रिंगणात नवी मुंबई : नवी मुंबई ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघात महायुतीत झालेली बंडखोरी रोखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपयश आल्याचे सोमवारी…

ठाणे जिल्ह्यात ९० उमेदवारांची निवडणुकीतून माघार,

जिल्ह्यात २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या ४७ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले असतानाच, त्यापाठोपाठ सोमवारी उमेदवारी…

मतविभागणी टाळण्यासाठी नाशिक (पश्चिम) मधून माकपची माघार – डॉ. उदय नारकर

ठाणे : मतविभागणी टाळण्यासाठी, नाशिक पश्चिमची जागा भाजपच्या पदरात पडू नये, यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नाशिक (पश्चिम) मधील उमेदवार डॉ. डी. एल. कराड हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत,…

 “माझे संभाषण रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न”

भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता केला आरोप   ठाणे : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. तर या भेटीवेळी दीपेश म्हात्रे यांनी त्यांचे संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी मोबाईल खिशात सुरु ठेवला होता, जेणेकरून मी काहीही चुकीचं बोललो असतो तर सर्वांना सांगितले असते, असा खळबळजनक दावा जगन्नाथ पाटील यांनी दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता केला आहे. डोंबिवली येथे नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे दीपेश म्हात्रे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी करून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश केला. निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने मात्र महायुतीच्या बंधनात अडकल्याने भाजपच्या पारंपरिक मतदारसंघ असलेला आणि भाजपचे रवींद्र चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवली त्यांना निवडणूक लढविणे शक्य नसल्याने दीपेश म्हात्रे यांनी निवडणुका घोषित होण्याच्या काही दिवस आधीच मशाल हाती घेतली होती. यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून डोंबिवली विधानसभेसाठी अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली. तर दीपेश म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात जोरदार प्रचार देखील सुरु केला आहे. तर काही दिवसांपूर्वी दीपेश म्हात्रे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. याभेटीबाबत जगन्नाथ पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता अनेक विषयांवर भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी एका उमेदवाराने माझी भेट घेतली होती. तर या भेटी दरम्यान मला डोंबिवली विधानसभेची गणित समजावून सांगत होता. मात्र मी त्यांना सांगितले तुम्ही कितीही जोर लावला तरी या ठिकाणी तुला यश मिळणार नाही आणि येत्या २० तारखेच्या गणितात रवींद्र चव्हाण पास होतील, असे संभाषण झाल्याचे जगन्नाथ पाटील यांनी सांगितले. तर संबंधित उमेदवाराने भेटीवेळी संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी मोबाईल खिशात सुरु ठेवला होता, जेणेकरून मी काहीही चुकीचं बोललो असतो तर सर्वांना सांगितले असते, असा खळबळजनक दावा जगन्नाथ पाटील यांनी दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता केला आहे. महायुतीचे राजेश मोरे आणि रवींद्र चव्हाण विजयी होणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे डोंबिवली येथे पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात सर्व पदाधिकाऱ्यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबोधित करून दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले. तर कल्याण लोकसभेतील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असे मत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

 कपिल पाटील फाउंडेशनची दिवाळी पहाट संस्मरणीय

 कल्याणमध्ये भूमी त्रिवेदी, अभिजीत सावंत, प्राजक्ता शुक्रेच्या गीतींची सूरमयी मैफल कल्याण: कपिल पाटील फाउंडेशनतर्फे कल्याणमध्ये दहा वर्षांपासून दिवाळी पाडव्याच्या दिवशी आयोजित करण्यात येणारी `दिवाळी पहाट’ यंदाही स्मरणीय ठरली. मांगल्याचे प्रतीक दीपावली उत्सवानिमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देत हजारो कल्याणकरांनी उपस्थित राहून सूरमयी संगीताची मेजवानी अनुभवली. प्रख्यात गायिका भूमि त्रिवेदी यांची प्रभू श्रीराम, भगवान शिवशंकरावरील गीते व जुगलबंदी, `इंडियन आयडॉल’फेम गायक अभिजीत सावंत यांची थिरकवायला लावणारी हळुवार गीते, मनाला स्पर्श करणारी गायिका प्राजक्ता शुक्रेचे बोल, गायिका जुईली जोगळेकरची जोशपूर्ण आवाजातील नजाकत आणि बंजारा डान्स ग्रूपमधील कलाकारांचे बहारदार नृत्याने रसिकांना चार तास खिळवून ठेवले. नम्रता संभेराव व प्रसाद खांडेकर यांची विनोदाची तुफान कॉमेडी लक्षवेधी ठरली. मृण्मयी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमातून कल्याणमधील हजारो नागरिकांबरोबर संवाद साधला. माझ्या कारकिर्दीत कल्याणवासियांचा सिंहाचा वाटा आहे. दहा वर्षांपासून दिवाळी पहाटच्या निमित्ताने कल्याणकरांबरोबर दिवाळीचा आनंद घेता येतो. यापुढील काळातही दिवाळीत संगीतरुपी गोडवा कायम राहील, अशी ग्वाही माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नागरिकांना दिली. या कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, शहराध्यक्ष वरुण पाटील, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, अर्जुन म्हात्रे, प्रशांत पाटील, सुमित पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.

 महाराष्ट्राचे कुमार व मुली (ज्युनिअर) खो-खो संघ जाहीर

 स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर मुंबईत धाराशिव : अलीगड, उत्तरप्रदेश येथे २५ ते २९ नोव्हेंबर  या कालावधीत होणाऱ्या ४३व्या कुमार व मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कुमार व मुली (ज्युनिअर) संघ महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी जाहीर केले. धाराशिव येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून हे संघ प्रशांत कदम (सातारा),  गोविंद शर्मा (छत्रपती संभाजीनगर), संदीप चव्हाण (पुणे) व भावना पडवेकर (ठाणे) या निवड समिती सदस्यांनी निवडले. या संघात धाराशिवबरोबरच सांगली, सोलापूर, ठाणे, पुणे, अहिल्यानगर, सातारा, नाशिक, मुंबई उपनगर, रत्नागिरी, जालना या जिल्ह्यातील खेळाडूंचा समावेश आहे. या संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर १७ नोव्हेंबरपासून ओम साईश्वर मंडळ, लालबाग, मुंबई येथे होणार आहे. महाराष्ट्राचे संघ असे : कुमार गट : सोत्या वळवी, विलास वळवी, भरत वळवी, राज जाधव, जितेंद्र वसावे (सर्व धाराशिव), प्रज्वल बनसोडे, प्रेम दळवी, पार्थ देवकाते (सर्व सांगली), कृष्णा बनसोडे, शुभम चव्हाण (सर्व सोलापूर), आशिष गौतम (ठाणे), चेतन गुंडगळ, भावेश माशिरे (सर्व पुणे), अनय वाल्हेकर (अहिल्यानगर), प्रतिक जगताप (सातारा), प्रशिक्षक : युवराज जाधव (सांगली), मुली गट : अश्विनी शिंदे, तन्वी भोसले, सुहानी धोत्रे, प्रणाली काळे (सर्व धाराशिव), सानिका चाफे, प्रतीक्षा बिराजदार, धनश्री तामखडे (सर्व सांगली), प्राजक्ता बनसोडे, स्नेहा लामकाने (सर्व सोलापूर), दीक्षा काटेकर, धनश्री कंक (सर्व ठाणे), सुषमा चौधरी (नाशिक), दिव्या गायकवाड (मुं. उपनगर), रिद्धी चव्हाण (रत्नागिरी), जोया शेख (जालना), प्रशिक्षक : श्रीकांत गायकवाड (मुंबई), व्यवस्थापिका सुप्रिया गाढवे (धाराशिव). 000

विविध रांगोळ्या साकारत लाकड्या बहिणींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

ठाणे : दिवाळीचे सणाचे औचित्य साधून ठाणे महापालिका प्रभाग क्र. 22 करिता आरोग्य दूत म्हणून ओळखले जाणारे निखिल बुडजडे यांनी रांगोळी आणि किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते. `अबकी बार शिंदे…

निवडणुका होईपर्यंत प्रतिस्पर्धी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटू नका!

 भाजपचा पदाधिकाऱ्यांना सल्ला डोंबिवली : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची भेट घेतली आहे. तत्पूर्वी त्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांची देखील भेट घेतली आहे. ठाकरे गट उमेदवाराच्या या भेटीगाठीने भाजप शिंदे गटाच्या गोटात खळबळ माजली आहे. याच भीतीतून भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी महायुती पदाधिकाऱ्यांना ‘निवडणुका होईपर्यंत कुणीही प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा कार्यकर्त्यांना भेटू नका. शुभेच्छा काय त्या फोनवरून द्यायला सांगा. 20 तारखेनंतर आपली मैत्री जपा असा सल्ला दिला आहे. अंबरनाथ मध्ये मनसेने ठाकरे गटाला दोस्तीचा वादा दिला असताना आता शिंदे गटातील पदाधिकारी देखील वानखेडे यांना भेटत असल्याने आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधात संदेश जात असल्याने या कानपिचक्या दिल्या जात आहेत का ? अशी चर्चा आता रंगली आहे. दिवाळीची धामधूम संपताच आता राजकीय मंडळी उमेदवाराच्या प्रचारासाठी कामाला लागली आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघात महायुती मधील शिवसेना शिंदे गटाने मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या विरोधात उमेदवार दिल्याने मनसैनिक नाराज आहेत. त्यातच अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील मनसैनिकांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. दिवाळी दीपोत्सवाला वानखेडे यांनी आमदार पाटलांची भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी देखील वानखेडे हे माझे मित्र आहेत. एक मित्र म्हणून मी त्यांना नक्कीच मदत करेल. पक्षाची भूमिका जी काही असेल ते नंतर पाहिले जाईल असे सांगितले. यामुळे महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात खळबळ माजली आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे उमेदवार वानखेडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अंबरनाथ येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कानपिचक्या दिल्या आहेत. भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी आपल्या सांभाषणात म्हणाले, निवडणुकीच्या काळात आपला वाढदिवस असेल तर एखादा प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा कार्यकर्ता आपल्याला भेटायला येतो. त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून संभ्रम निर्माण करतो. त्यामुळे 20 तारखेपर्यंत आपली मैत्री, आपले संबंध बाजूला ठेवा, आणि कुणालाही भेटू नका, फोनवरून शुभेच्छा स्वीकारा. त्यांना सांगा तुमच्या निवडणुका तुम्ही लढा आमच्या निवडणुका आम्ही लढतो. बाकी सगळं 20 तारखेनंतर असं भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी म्हणाले. 20 तारखेपर्यंत फक्त राजकारण, निवडणूक, महायुती आणि धनुष्यबाण इतकंच लक्षात ठेवा, असं सूर्यवंशी म्हणाले.