Category: ठाणे

Thane news

रतन टाटांचे स्वप्न साकारण्यासाठी युवा उद्योजक अर्जुन देशपांडेंचा पुढाकार

रास्त दरातील औषधांकरता राबवणार मिशन जेनरिक औषधे घराघरात ठाणे : दिग्गज भारतीय उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर सामाजिक दृष्टिकोन आणि भारतीयांना रास्त दरातील वैद्यकीय सेवा पुरवण्याचे त्यांचे स्वप्न साकारण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान युवा उद्योजक अर्जुन देशपान्डे यांनी स्वीकारले आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वस्त किमतीत औषधे मिळायला पाहिजेत या उद्देशाने वयाच्या १६ व्या वर्षी अर्जुन देशपांडे यांनी जेनरिक आधार या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली होती.रतन टाटा यांना आपले प्रेरणास्रोत मानून अर्जुन देशपांडे यांनी किफायतशीर किंमत असणाऱ्या जेनरिक औषधे उपलब्ध करून देण्यास प्रार्थमिक्ता दिली होती. अर्जुन देहस्पंडे यांना टेड टॉकच्या माध्यमातून रतन टाटा यांना भेटण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी देशपांडे यांनी आपला उद्देश आणि कल्पना त्यांच्यासमोर मंडळी होती. समाजाच्या कल्याणासाठी नेहमीच आग्रही पावले उचलणाऱ्या रतन टाटा यांनी देशपांडे यांच्या संकल्पना आर्थिक आणि नैतिक पाठबळ दिले होते. आपल्यासाठी रतन टाटा हि एक व्यक्ती नसून एक ऊर्जास्रोत होते.त्यामुळे त्यांचे स्वप्न साकारणे हाच आपला आता दृढसंकल्प असल्याचे अर्जुन देशपांडे यांनी सांगितले. महाराष्ट्रासह देशातील उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली आणि पंजाबच्या जोडीने १७ राज्यातील नागरिकांना स्वस्त दरातील औषधे अर्जुन देशपांडे पुरवत आहेत. हा आपल्यासाठी केवळ एक उद्द्योग नसून सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न आहे, असे अर्जुन देशपांडे म्हणाले. रतन टाटा आणि  अर्जुन देशपांडे या जोडीने भारतीय युवकांपुढे एक प्रेरणादायी उदाहरण कायम केले आहे. रतन टाटा यांच्या जयंतीच्या निमीत्ताने दृढ संकल्प आणि योग्य मार्गदर्शनामुळे कुठलेही स्वप्न प्रत्यक्षात उतरवता येते असा संदेश अर्जुन देशपांडे यांनी युवकांना दिला आहे.

ठाणे आणि कळवा – मुंब्रा विधानसभेसाठी जिजाऊ संघटनेच्या उमेदवारांचा अर्ज दाखल

ठाणे : जाहिर झालेल्या २०२४ विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे , याच पार्श्वभूमीवर जिजाऊ संघटनेचे अनेक उमेदवार कोकणातील वेगवेगळ्या भागातून अर्ज भरत आहेत . ठाणे विधानसभा…

बोंडारपाडा वांगणपाडा आदिवासी पाड्यातील १५० मुलानं सोबत दिवाळी साजरी

ठाणे :श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठान, ठाणे तर्फे ठाणे शहर, पालघर जिल्हातील बोंडारपाडा व वांगणपाडा आदिवासी पाड्यातील  बोंडारपाडा व वांगणपाडा आदिवासी पाड्यातील १५० मुलानं सोबत दिवाळी साजरी. दिवाळीच्या पूर्व संध्याला दीपोत्सव उपक्रमा अंतर्गत २६ व २७ ऑक्टोंबर २०२४ पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळेतील व जिल्हा परीषद प्राथमिक विद्यालय बोंडारपाडा आणि वागणपाड्यातील एकूण १५० आदिवासी विद्यार्थ्यांना नवीन कपडे आणि फराळ वाटप करण्यात आले. आदिवासी पाड्यांवर कोणतेही साधन नसताना गेली ६ वर्ष सत्यात काम करीत आहे व त्यातून अनेक रंग मुलांमधून फुलताना दिसत आहे. मुख्यमंत्री सुंदर शाळे मध्ये जि.प. शाळा बोंडारपाडा शाळेचा तिसरा क्रमांक आला. जी परसबाग संस्थेने माहिती देत तेथील विध्यार्थी व शिक्षकांनी मेहेनत घुन ती निर्माण केली व त्याचे आज फलित मिळत आहे, तसेच ठाणे शहरातील वस्तीत मुलांना ग्राउंड नाही, शिक्षण नाही त्यातून उन्नतीचे ध्येय गाठण्याचे ध्येय बाळगणाऱ्या मुलांना संस्थे तर्फे दरवर्षी फराळ नवीन कपडे, मुलांची वार्षिक फी, मुलांचे शैक्षणिक वर्ग त्यातून गाणी, शैक्षणिक साहित्य असे अनेक उप्रकम आपण करीत असतो. सदरप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री. निखिल बुडजडे, ड्रिमलँड रिऍलिटी कंपनीचे सर्वेसर्वा श्री. दिपक मोरे, विद्या मोरे, श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रुपेश शिंदे, पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळेतील  मुख्याध्यापक अमोल पाटील, वागणंपाडा शाळेचे मुख्याध्यापक तवर सर व शिक्षक वर्ग आणि गावकरी कुटुंब उपस्थित होते तसेच संस्थेचे आरती गाढवे, पूनम सावंत, पल्लवी लंके, राजेंद्र गोसावी, किशोर म्हात्रे, अजय भोसले, उत्कर्षां पाटील, मंगेश निकम, निशांत कोळी, शुभम कांबळे, निशांत कोळी, स्नेहल गुळीक, चेतन जामगांवकर, रितिक राऊत, वसंत कुळेकर, नितीन कुळेकर, अभि कुळेकर तसेच हितचिंतक माजी शिक्षक गणेश पाटील  इत्यादी सदस्य उपस्थित होते.

हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने नजीब मुल्ला यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, आरपीआय – आठवले गट, आरपीआय – कवाडे गट या महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने नजीब मुल्ला यांनी सोमवारी, १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंब्रा कळवा के विकास के लिए नजीब है ना, मी नजीबची लाडकी बहीण या घोषणांचे फलक घेऊन लाडक्या बहिणींनी रॅलीत सहभाग घेतला. याप्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते, अल्पसंख्याक महामंडळाचे चेअरमन मुश्ताक अंतुले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक,  शिवसेना उपनेते दशरथ पाटील, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आरपीआय (आठवले गट) ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, पीआरपी ठाणे जिल्हाध्यक्ष महेंद्र पवार यांच्या उपस्थितीत आदी मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. शिवसेना, भाजपा, आरपीआय – आठवले गट, आरपीआय – कवाडे गट महायुती,राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांनी, सोमवारी २८ ऑक्टोबर, रोजी १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातून हजारो महायुती कार्यकर्त्यांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, राजन किणे, अनिता किणे, राजेंद्र साप्ते, उमेश पाटील, मोरेश्वर किणी, विश्वनाथ भगत, गणेश साळवी, मनोज लासे,  विजया लासे,  गणेश कांबळे, वहिदा खान, अंकिता शिंदे, रुपाली गोटे, आशरीन राऊत, हफिजा नाईक, प्रियांका पाटील, हसिना अब्दुल अजीज शेख, यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. दत्तुवाडी, मुंब्रा स्टेशन जवळ,  मुंब्रा स्टेशन फ्लायओव्हर, दत्तुवाडी-शंकर मंदिर-कौसा कब्रस्तान,-कौसा तलावपाळी ते एम. एम. व्हॅली सर्कल, कौसा या मार्गाने, मुंब्रा कळवा के विकास के लिए नजीब है ना, मी नजीबची लाडकी बहीण या घोषणांचे फलक घेऊन हजारो लाडक्या बहिणींनी रॅलीत सहभाग घेतला. यावेळी महायुती शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे  पदाधिकारी, कार्यकर्ते हे भगवे, तिरंगी आदी विविध रंगी झेंडे फडकावत, ढोलताशांच्या गजरात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या टोप्या घालून मोठ्यासंख्येने रॅलीत सहभागी झाले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. चौकट पाणी प्रश्न सोडविणार, विकास भूखंड अतिक्रमणापासून वाचवून त्याचा विकास करणार, सर्व गोरगरीबांच्या संपर्कात राहून त्यांची कामे करणार, घोषणा कमी करणार जास्त कृती करुन लोकांची कामे करणार ,१५ वर्ष खोटी आश्वासने, कृती शून्य कारभार करणाऱ्यांनी भाजपची खोटी भिती निर्माण केली आहे. कळव्याची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी हायवेला जोडणारा काऊंटर रिंग रुट तयार करणार, विटाव्याच्या पलिकडे नवीन पूल बांधणार, पारसिक च्या मागून नवीन सर्विस रोड बांधणार आहोत. या मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी आपल्या भावाला, आपल्या मुलाला विजयी करा, असे आवाहन महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदा संघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी केले आहे.

 कल्याणमधील नाराजांची समजूत काढण्यास अपयशी;

भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र पवार, महेश गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल कल्याण : महायुती, महाविकास आघाडीचे नेते कल्याण पूर्व, पश्चिमेतील विधानसभेसाठी इच्छुक नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यास अपयशी ठरले आहेत. त्यामुळे भाजपचे नरेंद्र पवार, शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठींकडून होणाऱ्या कारवाईची तमा न बाळगता सोमवारी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांना दाखल केले. सोमवार मुहुर्ताचा चांगला दिवस असल्याने भाजपचे नरेंद्र पवार यांनी अपक्ष म्हणून कल्याण पश्चिमेतून उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी नरेंद्र पवार शक्तिप्रदर्शन करत आपल्या कार्यकर्त्यांसह दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या उमेदवारी अर्जामुळे भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे प्रदेश नेते पवार यांची समजूत काढण्यात अपयशी ठरले आहेत. पाच वर्षापूर्वी नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिमेतून भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. भाजप, संघाचा मोठा मतदार या मतदारसंघात आहे. ही ताकद ओळखून पवार यांनी पक्ष कारवाईची तमा न बाळगता उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली. तीन वर्षापासून पवार कल्याण पश्चिम मतदारसंघात विविध प्रकारचे उपक्रम राबवून जनसंघटन करत होते. या बळावर आपण ही निवडणूक लढवित असल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले. पवार यांची उमेदवारी महायुतीचे कल्याण पश्चिमेतील उमेदवार विश्वनाथ भोईर यांची डोकेदुखी वाढविणारी आहे. या मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अभ्यासू, माजी नगरसेवक सचिन बासरे निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघातून शहरप्रमुख रवी पाटील इच्छुक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर भोईर यांनी त्यांच्या एकनिष्ठ राहण्याची भूमिका घेतली. त्याची पोचपावती म्हणून त्यांना पुन्हा उमेदवारीच्या माध्यमातून मिळाली आहे. कल्याण पूर्वेतून महायुतीच्या उमेदवार म्हणून सुलभा गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघातून शिंदे शिवसेनेच्या एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्ज दाखल करू नये असे शिवसेना वरिष्ठांचे आदेश होते. या आदेशामुळे काही इच्छुक शांत झाले. आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामुळे दुखावलेले शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी मात्र पक्षादेश बाजुला ठेवत सोमवारी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर पाटील या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्वेतून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. दोघांनीही कल्याणमध्ये काँग्रेसला उमेदवारी न देण्यात आल्याने पदाचे राजीनामे दिले आहेत. कोट पंधरा वर्ष कल्याण पूर्वेचे शोषण झाले. सामान्य लोकांना आता विकास पाहिजे म्हणून त्यांच्या मागणीप्रमाणे आपण ही निवडणूक लढवित आहोत. ठाकरे गटाच्या यापूर्वीच्या उमेदवाराला आताच्या महायुतीच्या उमेदवाराने मदत केली होती. त्यामुळे बंडखोरीची भाषाला आम्हाली कोणी शिकवू नये. महेश गायकवाड– शहरप्रमुख, शिंदे शिवसेना. कोट महेश गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीत शिवसेनेच्या कोणीही कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांनी सामील होऊ नये. महायुतीचा धर्म सर्वांनी पाळायचा आहे. जे या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गोपाळ लांडगे- जिल्हाप्रमुख, शिंदे शिवसेना.  

१३४ कामगारांना मुक्त न करणाऱ्या साहाय्यक आयुक्तांना शिस्तभंग कारवाईच्या नोटिसा

फेरीवाला, अतिक्रमण नियंत्रण पथकातील कामगार बदली प्रकरण कल्याण –कल्याण डोंबिवली पालिकेतील अनेक वर्ष एकाच प्रभागात ठाण मांडून बसलेल्या दहा प्रभागातील फेरीवाला हटाव, अतिक्रमण नियंत्रण पथकातील १३४ कामगारांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी केल्या आहेत. हे…

अनधिकृत फलक, पोस्टर्स यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश

ठाणे : निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीशिवाय लागलेले सर्व प्रकारचे दिवाळी शुभेच्छा किंवा त्याप्रकारचे अनधिकृत फलक, पोस्टर्स यावर सर्व सहाय्यक आयुक्तांनी तत्काळ कारवाई करावी. काही ठिकाणी त्या फलकांचे सांगाडे (तात्परुत्या फ्रेम) कायम असल्याचे निर्दशनास आले आहेत. फलकांचे सांगाडेही काढण्यात यावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे सोमवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत फलकांबाबत कठोर कारवाईचे आदेश दिले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर करावाई करून सगळे फलक, पोस्टर्स काढून घेण्यात आले होते. आता दिवाळीचे दिवस असल्याने पुन्हा एकवार शुभेच्छांसाठी फलक लावले जाण्याची शक्यता आहे. ज्या फलकांना जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी असेल, त्यांनाच असे शुभेच्छा फलक लावता येतील, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, परिमंडळ उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी बैठकीतील सादरीकरणाचे संचालन केले. मतदारांच्या सोयीच्या दृष्टीने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून मतदारांसाठी आवश्यक तेथे रॅम्प, शौचालय सफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांचे नियोजन करावे. मतदारांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आयुक्त राव यांनी सांगितले. दिवाळीची सुटी लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची सफाई, पाणी पुरवठा या व्यवस्था सुरळीत राहतील याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. त्याचबरोबर, बांधकाम प्रकल्पांच्या परिसरातील रस्ते, चिखल आणि धूळीने भरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. शहर विकास विभागाने सर्व बांधकाम व्यावसायिकांना परिसरातील रस्ते खराब होणार नाहीत, त्यावर वेळोवेळी पाण्याची फवारणी होईल याविषयी पुन्हा सूचना द्याव्यात, असेही आयुक्त राव म्हणाले.

मुरबाडमधून सुभाष पवार यांचा शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज

रॅलीला हजारो नागरिकांची गर्दी मुरबाड : मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनात खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानिमित्ताने मुरबाड शहरातील वातावरण महाविकास आघाडीमय झाल्याचे पाहावयास मिळाले. मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सुभाष पवार यांना उमेदवारी दिल्याने महायुतीपुढे आव्हान निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुरबाड मधील कुणबी भवन येथून रॅलीला सुरुवात झाली. बेंजो, ब्रास बॅण्ड, ढोलच्या गजरात शहराच्या विविध भागातून रॅली निघाली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संतोषी माता मंदिराच्या मैदानात रॅली पोहोचल्यावर झालेल्या जाहीर सभेत मुरबाड मतदारसंघात परिवर्तन घडविण्याचे आवाहन करण्यात आले. या रॅलीच्या निमित्ताने मुरबाड तालुक्याने इतिहासातील सर्वात मोठी रॅली अनुभवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे, लोकनेते आमदार गोटीरामभाऊ पवार, शिवसेनेचे उपनेते अल्ताफ शेख, उमेदवार सुभाष पवार,  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे,  जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे, कॉंग्रेसचे बदलापूर शहर अध्यक्ष संजय जाधव, मुरबाड तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर घुडे, संतोष विशे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बदलापूरचे प्रभारी अध्यक्ष कालिदास देशमुख, विश्वनाथ जाधव, जयराम मेहेर, लियाकत शेख, सुधीर पष्टे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कविता वरे आदी उपस्थित होते. मुरबाड हा सुसंस्कृत मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या १५ वर्षात मतदारसंघाचे नुकसान झाले. बदलापूर शहरात पाणी, वीज आदी प्रश्न तीव्र आहेत. गेल्या १५ वर्षांत फुटले नव्हते, तेवढे नारळ प्रथमच फोडले गेले, अशी टीका उमेदवार सुभाष पवार यांनी केली. मुरबाड शहरातील भव्य रॅलीने मतदारांमधील उत्साह अनुभवता आला, याबद्दल लोकनेते गोटीराम पवार यांनी कौतुक केले. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मतदारांनी ताकद दाखवावी. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आदेश अंतिम असून, आता अशक्य काहीही नाही. सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन सुभाष पवार यांना विजयी करावे, असे आवाहन खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी केले आहे.

रेल्वे कामगार संघटनेच्या मान्यतेसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता कामगारांचे शक्ती प्रदर्शन

अनिल ठाणेकर ठाणे : नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला पुन्हा मान्यता  मिळविण्यासाठी ४  ते ६  डिसेंबर २०२४  दरम्यान निवडणूक  होणार असून,  या निवडणुकीचे नामांकन अर्ज २५ ऑक्टोबर २०२४  रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल  येथील महाप्रबंधक कार्यालयात  कामगारांच्या उपस्थित भरण्यात आले, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. भारतात रेल्वे कामगारांची संख्या जवळजवळ अकरा लाख असून, मध्य रेल्वेच्या कामगारांची संख्या जवळपास एक लाख आहे.  या उद्योगात कामगार कायद्यानुसार  युनियन मान्यतेसाठी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक केली जाते. या उद्योगात  नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला पुन्हा मान्यता  मिळविण्यासाठी ४  ते ६  डिसेंबर २०२४  दरम्यान निवडणूक  होणार असून,  या निवडणुकीचे नामांकन अर्ज २५ ऑक्टोबर २०२४  रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल  येथील महाप्रबंधक कार्यालयात  कामगारांच्या उपस्थित भरण्यात आले. याप्रसंगी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्त्यांनी सीएसटी येथे मोर्चा नेऊन आपले शक्तिप्रदर्शन केले. मिटिंग सुरू होण्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक ७  आणि ८ पासून DRM कार्यालय मार्गे उपनगरीय लॉबीपर्यंत कामगार मोर्चाने गेले, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना  ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे (AIRF)  महामंत्री  कॉ.  शिवगोपाल मिश्राजी आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ( NRMU ) व  कोकण रेल्वेचे महामंत्री (CRKR) कॉ. वेणू पी. नायरजी यांनी पुष्पहार अर्पण केला, त्यानंतर जनरल मॅनेजर ऑफिस कंपाऊंड क्षेत्राकडे  मोर्चा पुढे जाऊन मिटिंग सुरू झाली. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे  महामंत्री कॉ.  वेणू नायरजी यांनी आपल्या तेजस्वी भाषणातून  चांगला संदेश देऊन  रेल्वे कामगारांचा उत्साह वाढविला.  त्यानंतर ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे महामंत्री कॉ.  शिवगोपाल मिश्राजी यांनी सरकारची सद्यस्थिती, युनियनची गरज आणि पेन्शन योजनेच्या  UPS  गोंधळाबद्दल बोलून इंटक प्रणित संघटना कामगारांच्या पाठीत   खंजीर खुपसते.  उदा.  १९६०,१९७४  चा संप फोडून सरकारची लॉयल्टी व आपल्या मुलांना रेल्वेत नोकरीत सामावून घेतले. AIRF/ NRMU ला 100 वर्षाचा इतिहास या युनियनला आहे. UPS मध्ये राहिलेले मुद्दे सुद्धा चर्चेद्वारे सोडविले जातील याची हमी यावेळी त्यांनी कामगारांना दिली व ज्या कर्मचाऱ्यांना आपल्या निवडीनुसार UPS किंवा NPS घेण्यासाठी ऑप्शन देण्यात आले आहे त्यांनी ऑप्शन देताना विचार पूर्वक निवड करावी हे सुद्धा सांगितले आहे.NRMU व AIRF सारख्या संघर्षशील युनियनची कर्मचार्‍यांना गरज का आहे.  हे स्पष्ट केले.नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या अध्यक्षा कॉ.  कामाक्षी बागलवाडीकर यांनी सर्वांचे आभार  मानले. रेल्वे मुख्यालय व विभागातील सर्व पदाधिकारी, युवा, महिला कॉम्रेड,  सर्व DC चे पदाधिकारी आणि विभागातील सर्व सक्रिय सदस्यांनी या मिटिंगमध्ये  सहभाग घेतल्यामुळे मिटींगला हजारोच्या संख्येने उपस्थिती होती . याप्रसंगी ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे झोनल सचिव कॉ. जे. शिंदे,  नॅशनल  रेल्वे मजदूर युनियनचे सर्व सहाय्यक सचिव कॉ. विवेक नायर, कॉ. पी. टी. एस. राजा, कॉ. श्याम नायक, कॉ. बी.एल. यादव, कॉ. विनय सावंत कॉ. संतोष कुमार, कॉ. आर. के. मलबारी, WP, सर्व मंडळाचे अध्यक्ष, मंडळ सचिव, युवा महिला, शाखा पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते यांच्या साक्षीने नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने मान्यतेच्या निवडणुकीसाठी नामांकन मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी सहर्ष बाजपेयी यांना दिले.

महायुतीचे उमेदवार संजय केळकरांच्या मध्यवर्ती निवडणुक कार्यालयाचे उद्घाटन

अनिल ठाणेकर  ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजितदादा गट) आणि रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्या खोपट येथील मध्यवर्ती निवडणुक कार्यालयाचे उद्घाटन भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते…