Category: ठाणे

Thane news

भिवंडीत महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम राहणार 

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी दोन अर्ज भरले होते. त्यापैकी एक अपक्ष तर दुसरा काँग्रेसच्या नावाने भरला होता. परंतु काँग्रेसकडुन अधिकृत उमेदवारी मिळून…

ठाण्याला लागलेला गद्दारीचा कलंक पुसायचा आहे !

राजन विचारे यांना मतदारांची साथ ठाणे : महाविकास आघाडी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे या सच्चा शिवसैनिकाला मतदारांनी साथ दिली आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची हीच वेळ असून ठाण्याला लागलेला गद्दारीचा कलंक आपल्याला पुसायचा आहे. अशी साद घालत विचार यांनी आज जोरदार प्रचार केला. ठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या १० वर्षात केलेली कामे,युद्धपातळीवर सुरू असलेली प्रकल्प त्याचबरोबर भविष्यात नव्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी मी कटिबध्द असल्याचा विश्र्वास विचारे यांनी मतदारांना दिला. यावेळी जागोजागी मतदारांनी तुफान प्रतिसाद देत विचारे यांचे स्वागत केले. त्यावेळी जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ता अनिश गाढवे, संपर्कप्रमुख सुभाष म्हसकर, उप जिल्हाप्रमुख सुनील पाटील, राजेंद्र महाडिक, समन्वयक संजय तरे, सह समन्वयक राम काळे, विभाग प्रमुख वासुदेव भोईर, अरविंद भोईर, साईनाथ पाटील, मयूर पैलकर, प्रतिक राणे, जिवाजी कदम, युवासेना अधिकारी किरण जाधव, राज वर्मा, महिला उपविभाग संघटक राजेश्री सुर्वे, सुनंदा देशपांडे, वैशाली शिंदे, युवासेना आरती खळे, पूजा भोसले, विद्या कदम, ज्योती दुग्गल, उषा बोरुडे, गीता चव्हाण, कविता नार्वेकर, कॉंग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी अध्यक्ष सुहास देसाई, राष्ट्रवादी युवा अध्यक्ष विक्रम खामकर, महेश म्हात्रे सरचिटणीस कॉंग्रेस, आपचे सलुजा, संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज सकाळी घोडबंदर येथील हायलँड पार्क ढोकाळी येथून प्रचाराला सुरूवात झाली. रुणवाल सिटी येथून पुढे बाळकुम नाका, दादलानी पार्क, बाळकुम पाडा, लोढा कॉम्प्लेक्स, माजिवडा गाव, ऋतू पार्क,आनंद पार्क, श्रीरंग सोसायटी,वृंदावन सोसायटी, रुस्तमजी, पंचगंगा,राबोडी, मीनाताई ठाकरे चौक,गोकुळ नगर गोल्डन डाईज, नारळीपाडा, रुणवाल नगर, कोलवाड, जागमाता मंदिर,कोलबाड, प्रताप सिनेमा, खोपट, गोकुळदास, सिद्धेश्वर तलाव, टेंभी नाका,सिविल हॉस्पिटल,उथळसर, सेंट्रल मैदान पोलीस लाईन, धर्मवीर शक्तीस्थळ,खारकर आळी, सिडको, स्टेडियम ठाणा कॉलेज,खारटन रोड, तलावपाळी सिग्नल, काँग्रेस कार्यालय अशा परिसरातून प्रचाराची रॅली निघाली. अभ्यास कमी असल्याने भाषणात वायफळ बडबड – विचारे या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांची पायाखालची वाळू घसरली असून त्यांना चांगलाच घाम फुटलेला असल्याचा आरोप विचारे यांनी केला. त्यामूळेच वायफळ भाषण करण्यात ते व्यस्त आहेत. मुळात लोकसभा सारख्या निवडणुकीत देशहिताचे, राष्ट्रहिताचे, राज्याच्या दृष्टिकोनातून विकासाचे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवेत. मात्र त्यांचा अभ्यास कमी असल्याने भाषणात वायफळ बडबड करून जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला.

धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक तुम्हीच, मग प्रसंग खोटे कसे?

राजन विचारे यांचे मिंधेना रोखठोक प्रतिउत्तर ठाणे : प्रतिनिधी – धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक तुम्हीच होता त्यातले प्रसंग तुम्हीच दाखवले मग हे प्रसंग खोटे कसे असा सवाल उपस्थित करीत महाविकास आघाडीचे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्याच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर २ वर्षानंतर त्यांना आपण खोटं दाखवले असल्याची कबुली देतात याचा अर्थ तुम्ही जनतेला खोटा सिनेमा दाखविला असल्याचा आरोप विचारे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २०१३ मध्ये ते पाच आमदारांना घेऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, वारंवार त्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेवटच्या बंडा पर्यंत मी त्यांच्या सोबत होतो. मात्र त्यांना केवळ शिवसेना संपावयाचीच होती असा गंभीर आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यावर केला आहे.  आमच्यामुळेच विचारे निवडून येत होते, असे देखील शिंदे म्हणाले होते, मात्र मागील दोन निवडणुकीत केवळ आपल्या पुत्राचेच काम शिंदे यांनी केले. ठाण्यातील सर्व यंत्रणा मिंधे तिकडे घेऊन जात असत त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या कामावर निवडून आलो आहे. शिंदे यांनी केलेले बंड फोडलेली शिवसेना हे सर्व केवळ खुर्चीसाठीच होते, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. यांनी केवळ सेटिंगचे राजकारण केले शिंदे यांनी पहिले आमदराकीचे तिकीट मीच मिळवून दिले. आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ठाण्यासाठी काय काय केले त्याची उत्तरे आधी द्या असा सवालही त्यांनी केला. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना तोडली, कॉंग्रेस, राष्ट्रवादी फोडली. केवळ सेटींगचेच राजकारण तुम्ही आतापर्यंत करीत आला आहेत. तसेच आता महाराष्ट्राची आणि ठाण्याची जनता तुमचा तमाशा बंद केल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास विचारे यांनी यावेळी व्यक्त केला. गोल्डन गॅंगचा “लीडर” म्हणून म्हस्के प्रसिद्ध नरेश म्हस्के कोरोना काळात कुठे होता, घरात बसून होता, महापौर पदाच्या कारर्कीद काय काम केले हे सांगावे, केवळ गोल्डन गँगचा लिडर म्हणूनच त्याची आतापर्यंत प्रसिद्धी राहिली आहे. ठाणे महापालिका लुटण्याचे काम मिंधे आणि म्हस्के याने केले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाची पाटी काढून तेथे स्वत:च्या नावाची पाटी लावली त्यामुळे तुमच्या मनात दिघे यांच्यावरील प्रेम काय आहे हे जनतेला माहित आहे. शिवसेनेत मला ४० वर्ष झाली, यांचा उदय साहेब गेल्यानंतर झाला आम्ही टेभी नाक्यावरील साहेबांचे कट्टर कार्यकर्ते होतो आणि अजूनही आहोत. मला शिवसेनेत ४० वर्ष झाली या बाकीच्यांचा उदय साहेब गेल्यानंतर झाला आहे. बाळासाहेबांचे विचार शिवसेना फोडण्यासाठी कधीच नव्हते, दिघे साहेबानी मोठं वादळ येऊन सुद्धा पक्ष एकसंघ ठेवला. दिघे साहेबांवर बाळासाहेबांचा विश्वास होता. याना मात्र शिवसेना संपवायची होती असा आरोप विचारे यांनी मुख्यमंत्र्यावर केला.

 महिला गटाचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

७१वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ठाणे, श्री मावळी मंडळ आयोजित ९९ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला गटात  कर्नाळा क्रीडा (रायगड), प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन (पुणे) या…

३७वी डॉ. श्रीधर देशपांडे स्मृती समर्लिग क्रिकेट स्पर्धा  

ओंकार, सिद्धेश चमकले ठाणे : ओंकार करंदीकर,अश्विन माळीची गोलंदाजी आणि राहुल कश्यपच्या नाबाद खेळी मुळे विजय इंदप क्रिकेट क्लबने रॉयल क्रिकेट क्लबचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव करत स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित ३७ व्या डॉ श्रीधर देशपांडे स्मृती समर्लिग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. रॊयल क्रिकेट क्लबला ६१ धावांमध्ये गुंडाळल्यावर ८.२ षटकात विजयासाठी आवश्यक असलेल्या ६४ धावांसह विजय इंदप क्रिकेट क्लबने आगेकूच कायम राखली. ओंकार करंदीकर, अश्विन माळी आणि स्वप्नील दळवीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत रॉयल क्रिकेट क्लबला ६१ धावांवर रोखले. भावेश पवारच्या २६ धावांचा अपवाद वगळता रॉयलचे इतर फलंदाज छाप पाडू शकले नाहीत. ओंकार आणि अश्विनने प्रत्येकी तीन, स्वप्नील दळवीने दोन आणि प्रतीक जयस्वालने एक गडी बाद केला. त्यानंतर राहुल कश्यपच्या नाबाद ३२ धावांमुळे विजय इंदप क्रिकेट क्लबने ८  गडी राखून पराभव केला. सिद्धेश भगतने १३ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक : रॉयल क्रिकेट क्लब : १५.४ षटकात सर्वबाद ६१(भावेश पवार २६, ओंकार करंदीकर ४-११-३, अश्विन माळी ४-१५-३ स्वप्नील दळवी ०.४- १-२) पराभूत विरुद्ध विजय इंदप क्रिकेट क्लब : ८.२ षटकात २ बाद ६४ ( राहुल कश्यप नाबाद ३२, सिद्धेश भगत १३, राहुल म्हात्रे २-२१-१, गणेश मोरे ३-१८-१).

रिपाइं (आठवले) जिल्हा महिलाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

अनिल ठाणेकर ठाणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला ठाण्यात मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत रिपाइंच्या ठाणे जिल्हा महिलाध्यक्षा मनिषा करलाद  यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी विटावा येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, मा. विरोधीपक्ष नेते मिलींद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मनिषा करलाद यांनी विटावा, रेतीबंदर, माजीवडा आदी भागातील कार्यकर्त्यांसह हा पक्ष प्रवेश केला. रामदास आठवले हे भाजप सोबत गेले आहेत. सध्या भाजपकडून संविधानविरोधी भूमिका घेतली जात आहे. त्याविरोधात लढण्याची भूमिका घेण्याऐवजी आठवले भाजपला साथ देत असल्याने आपण संविधान रक्षणासाठी शरदचंद्र पवार आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम करणार आहोत, असे करलाद यांनी सांगितले. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी करलाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हाती पक्षाचा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले. दरम्यान,  मनिषा करलाद आणि त्यांचे दिवंगत पती गणपत करलाद हे दलित पँथर पासून आंबेडकरी चळवळीत सक्रीय आहेत. नामांतर लढा, रिडल्स आदी आंदोलनात हे दाम्पत्य सक्रीय होते. गणपत करलाद यांच्या निधनानंतर मनिषा करलाद यांनी ही परंपरा सुरू ठेवली होती. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विटावा परिसरातील ताकद अधिकच वाढली आहे.

ठाण्यात पाणी बचतीसाठी पालिकेने लागू केले निर्बंध;

उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई ठाणे : तीव्र उन्हामुळे धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत असून त्याचबरोबर विहिरी आणि कूप नलिका यांच्यातील पाण्याची पातळीही वेगाने कमी होत आहे. यामुळे तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने पाणी बचतीसाठी १० जूनपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे आणि इतर साफसफाईची कामे करण्यास मनाई करण्यात आली असून त्याचबरोबर तरण तलावासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई केली आहे. या आदशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, गावे यांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचबरोबर, ठाणे महापालिका क्षेत्रातील विहिरी आणि कूप नलिका यांच्यातील पाण्याची पातळीही वेगाने कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणी बचतीसाठी १० जूनपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यानुसार दूचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने, मोठी वाहने धुणे, तसेच पाण्याने साफसफाई करणे या कामांवर निर्बंध असणार आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करून पाणी बचत करावी, असे आवाहन महापालिकेने केले. शक्यतो दररोज गाड्या धुतल्या जावू नयेत. त्याऐवजी कूपनलिकेच्या पाण्याने ओल्या केलेल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात, अशी सूचना महापालिकेने नागरिकांना केली आहे. अंगणात पाणी मारू नये. नळ सुरू ठेऊन कपडे धुणे, भांडी घासणे, दात घासणे, दाढी करणे टाळावे. घरातील नळांची गळती तातडीने दुरुस्त करावी.  सोसायटीतील गळकी टाकी, जलवाहिनी, व्हॉल्व्ह दुरुस्त करावेत. इमारतींच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होवू नये याची दक्षता घ्यावी. त्यासंदर्भात, तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा अशी गळती आढळल्यास संबंधीत इमारतीचे-सोसायटीची नळ जोडणी खंडीत करण्यात येईल. आंघोळीसाठी शॉवर व बाथटबचा वापर करू नये.  स्वच्छतागृहामध्ये डुअल फ्लशचा वापर करावा, अशी सूचना प्रशासनाने केली आहे इमारतीतील जिने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये. पाण्याचा अनावश्यक साठा करू नये तसेच, साठा केलेले पाणी रोज सकाळी ओतून देण्याची सवय बंद करावी. इमारती, सोसायटी, संकुलांमधील तरण तलावासाठी पिण्याचे पाणी वापरू नये आणि वारंवार पाणी बदलण्यात येऊ नये. शक्यतो आठवड्यातील पाच दिवस धुण्यायोग्य सगळे कपडे एकत्र करुन एकाच दिवशी धुवावेत. इतर दिवशी गरज पडल्यास दररोज लागणारे छोटे कपडे हाताने कमी पाण्यात धुवावेत.  कपडे धुण्याचे मशीन आठवड्यातून एकदा किंवा अगदी आवश्यक असेल तेव्हा दोनदाच आणि ते पूर्ण क्षमतेने वापरावे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल आणि मशीनचा वापर पूर्ण क्षमतेने होईल. कपडे धुण्याचे मशीन किंवा हाताने कपडे धुवून निर्माण होणार निरुपयोगी पाणी साठवण करुन पुढचे दोन दिवस फ्लशसाठी, बाथरुम धुण्यासाठी, गाड्या धुण्यासाठी तसेच बगीच्यासाठी वापरावे, अशी सूचनाही प्रशासनाने केली आहे.

जप्त मालमत्तांकडे खरेदीदारांची पाठ

मागील दहा वर्षात थकबाकीदारांच्या कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत लाखो रुपयांच्या मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचे विहित प्रक्रिया पूर्ण करून लिलाव जाहीर केले होते. कोट्यवधी रूपये पालिकेला या लिलावातून मिळणार होते. परंतु, गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत अशाप्रकारे जाहीर करण्यात आलेल्या लिलाव बोलीतील एकाही थकबाकीदाराची मालमत्ता विकली गेली नसल्याची पालिकेच्या अभिलेखातील धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून उघडकीला आली आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करायच्या असतील तर त्यासाठी पालिकेचा मालमत्ता कर विभाग संबंधिताला पहिले नोटिसा पाठवून थकीत रक्कम भरणा करण्याचे सूचित करतो. अशाप्रकारे तीन नोटिसा पाठविल्यानंतर संबंधित थकबाकीदाराने मालमत्ता कर थकबाकी भरणा केली नाही तर पालिका त्या मालमत्ता जप्त करते. अशा अनेक थकबाकीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्यानंतर पालिका प्रसिध्द वर्तमानपत्रात या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्याची आणि त्यांचा लिलाव जाहीर करते. या जाहिरातींसाठी पालिका लाखो रुपये खर्च करते. या मालमत्ता नागरिकांनी खरेदी कराव्यात म्हणून जनजागृती करते. मालमत्ता विक्रीला न गेल्याने पालिकेने खर्च केलेला सगळा पैसा फुकट जातो, असे माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी सांगितले. मागील १५ ते २० वर्षाच्या काळात थकबाकीदार कर मालमत्ताधारकांकडे पालिकेची सुमारे पंधराशे कोटीहून अधिकची रक्कम होती. या रकमा वेळोवेळी पालिकेने अभय योजना, विविध प्रकारच्या क्लृप्त्या करून थकबाकीदारांकडून वसूल केली आहे. ही रक्कम आता सुमारे चारशे ते पाचशे कोटीच्या आसपास आहे. थकबाकीदार कर भरणा करत नाहीत मात्र पालिका पुरवत असलेल्या पाणी, रस्ते आणि इतर सुविधांचा लाभ घेतात. गेल्या महिन्यापूर्वी पालिकेने अनेक वर्ष कर भरणा न करणाऱ्या २७ कर थकबाकीदारांच्या ११४ कोटीच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव जाहीर गेला होता. या मालमत्ता विक्रीतून पालिकेला सुमारे सहाशे कोटीहून अधिकची रक्कम बाजारभावाप्रमाणे मिळणार होती. परंतु, पालिकेने हा लिलाव अचानक रद्द केला. त्यामुळे थकबाकीदारांनी समाधान व्यक्त करून पालिकेला या लिलाव प्रक्रियेसाठी केलेला खर्च वाया गेला, असे तक्रारदार कुलकर्णी यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात पालिकेने किती मालमत्तांचे लिलाव केले. किती मालमत्ता विक्रीला गेल्या, अशाप्रकारची माहिती मनोज कुलकर्णी यांनी कर विभागाकडून मागवली होती. त्यावेळी कर विभागाचे साहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी लिलाव प्रक्रियेव्दारे मिळकती विकल्या गेल्या नाहीत, असे उत्तर दिले आहे. या मालमत्तांंचे पुढे पालिकेने काय केले, थकित रकमा पालिकेने वसूल केल्या आहेत का, असे प्रश्न कुलकर्णी यांनी केले आहेत. राजकीय दबाव आणून बडे थकबाकीदार पालिका अधिकाऱ्यांना असे लिलाव रद्द करण्यास किंवा त्यांच्या जप्त मालमत्ता कोणी खरेदी करू नये म्हणून ‘व्यवस्था’ करतात, असे समजते.

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ‘ब’ संघ उपांत्य फेरीत

ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धा ठाणे : गतविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने बेनेटन क्रिकेट क्लबचा एक गडी राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे…

शिळफाट्याचा प्रवास आता आणखी सुसाट!

शिळफाटा उड्डाणपूलाच्या आणखी तीन मार्गिका सेवेत ठाणे : ह. भ. प. संत सावळाराम महाराज कल्याण शीळ मार्गावरून कल्याण, डोंबिवली ते ठाणे, नवी मुंबई प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. या मार्गावरील शिळफाटा येथील उड्डाणपुलाच्या आणखी तीन मार्गिका नुकत्याच खुल्या करण्यात आल्या आहेत. या मार्गिकांमुळे शिळफाटा चौकातला प्रवास अधिक वेगवान झाला आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापुरातून ठाणे, नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर तसेच आसपासच्या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ठाणे, नवी मुंबईला जाण्यासाठी ह. भ. प. संत सावळाराम महाराज कल्याण शीळ मार्ग हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मागील वर्षी या रस्त्याचे सहा पदरीकरण करून येथील वाहनचालकांना दिलासा देण्यात आला होता. तर या मार्गावरील प्रवास अधिक वेगवान होण्यासाठी या मार्गावरील पुढील टप्पा असलेल्या मुंब्रा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील शिळफाटा जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या सहा पदरी उड्डाणपुलाच्या उर्वरित सहा मार्गिका आता खुल्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका खुल्या करण्यात आल्या होत्या, ज्यावरून दोन्ही बाजूंची वाहतूक होत होती. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या उड्डाणपुलामुळे बदलापूर ते डोंबिवली येथून कल्याण शीळ मार्गे ठाणे आणि नवी मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळणार असून अधिक वेगवान प्रवास करता येणार आहे. यामुळे वाहन चालकांच्या वेळेची आणि इंधनाचीही बचत होणार आहे. शीळफाटा सहापदरी उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये : – एमएमआरडीएच्या माध्यमातून ११९ कोटी रुपयांच्या निधीतून पुलाची या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. – ७४० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद असा हा उड्डाणपूल आहे. – या पुलामुळे शिळफाट्याची वाहतूक कोंडीची समस्या कायमची मार्गी लागली आहे.