पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात ९ ठार
नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी…
Thane news
नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी…
अनिल ठाणेकर ठाणे :राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत दिली. तर विविध सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टल वर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे ३४३ सेवा ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात. त्यानुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.५ च्या कलम ३ (१) अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त महसूल कार्यालयांमार्फत नागरिकांना विविध सेवा पुरविण्यात येतात. नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत काल मर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिल प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये (परिशिष्ट सोबत जोडले आहे) नमूद केल्याप्रमाणे या सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. ०००००
अनिल ठाणेकर ठाणे : लाखो सर्वसामान्य नागरिकांशी नाळ कायम ठेवणाऱ्या ठाणे शहरातील काही पोस्ट कार्यालयांची दुरावस्था असून काही कार्यालये हद्दीबाहेर असल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. तर काही कार्यालयांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत. याबाबत त्रस्त नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत आमदार संजय केळकर यांनी नुकतीच पोस्ट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत अनेक सूचना केल्या. तसेच शासन प्रशासनाच्या मदतीबरोबरच आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ठाणे शहरातील सर्व पोस्ट कार्यालये सक्षमपणे कार्यरत होण्यासाठी, नवीन पोस्ट कार्यालये निर्माण करण्यासाठी आणि स्थलांतरीत झालेली कार्यालये पुन्हा मूळ जागी आणण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी संबंधित नागरिक आणि पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची नुकतीच बैठक घेतली. सॅण्डोज बाग पोस्ट कार्यालयाचे नामकरण कोलशेत पोस्ट कार्यालय करण्याबाबत श्री.केळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. पूर्वीचे सॅण्डोज हे नावच आता अस्तित्वात नसल्याने पोस्टाची जागा कोलशेत भागात असल्याने त्याचे नामकरण करण्याबाबत त्यांनी आग्रह धरला. पूर्वीच्या जे.के. ग्राम पोस्ट कार्यालयासाठी जी जागा उपलब्ध केली आहे ती तळघरात असल्याने ती बदलून पालिकेकडे नवीन जागेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले. नौपाडा भागातील पोस्ट कार्यालय हे दम्माणी इस्टेट येथे गेली ५० वर्षे होते. इमारतीच्या पुनर्विकासानंतर विकासकाने त्याच जागेत कार्यालयासाठी जागा देण्याबाबत यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली. वागळे इस्टेट येथे सध्या पोस्ट ऑफिसच नसून पूर्वीचे १९८४ पासून असलेल्या पोस्ट ऑफिस ठाणे स्टेशनजवळील कार्यालयातून कार्यरत असल्याने नागरिकांना गैरसोईचे होते. त्यामुळे हे कार्यालय वागळे इस्टेट येथे पुन्हा स्थलांतरीत करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची माहिती.केळकर यांनी दिली. पोस्ट कार्यालयाची उपयुक्तता गरीब, मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणात असते.संपूर्ण शहरात आज याबाबत दुरावस्था असून नागरिकांनी त्रस्त होऊन निवेदने दिली होती. पुढील काळात सर्व पोस्ट कार्यालये सक्षम होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.
16 लखांपासून 2 कोटीपर्यंतची घरे उपलब्ध कल्याणात 23 जानेवारीपासून प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन कल्याण : गेल्या काही वर्षांमध्ये कल्याण आणि डोंबिवलीच्या आसपास सुरू असणारी मोठ्या प्रमाणावरील पायाभूत विकासकामे आणि विशेषतः कल्याणच्या आसपास वेगाने सुरू असणारे महत्त्वाकांक्षी एक्स्प्रेस वेचा विचार करता कल्याणला मेजर कनेक्टिव्हिटी हबचा दर्जा प्राप्त होणार आहे. त्यामुळे नवीन घरं घेण्यासाठी कल्याणला पसंती मिळत असून येत्या काळात हे मुंबई ठाण्यानंतरच सर्वात मोठं शहर बनेल असा विश्वास एमसीएचआयच्या पत्रकार परिषदेत बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला. येत्या 23 जानेवारीपासून कल्याणात क्रेडाई एमसीएचआयचे 14 वे प्रॉपर्टी एक्स्पो भरणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कल्याणातील प्रमुख बांधकाम व्यावसायिकांनी या एक्सपोची या शहराचे भविष्य, भविष्यातील गरजा आणि अस्तित्वातील अडचणी यांच्यावरही प्रकाशझोत टाकला. क्रेडाई एमसीएचआय कल्याण डोंबिवलीमार्फत गेल्या १४ वर्षांपासून जनतेला परवडतील अशी त्यांच्या स्वप्नातील घरं देण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये यंदा 50 हुन अधिक नामांकित विकासकांचे 150 हून अधिक प्रोजेक्ट एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मैदान लालचौकी येथे सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत हे १४ वे प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापुर, टिटवाळा, शिळफाटा, ठाणे परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या १६ लाखांपासून ते थेट 2 करोडापर्यंत किमतीची घरे या प्रदर्शनात उपलब्ध असणार असल्याची माहिती रवी पाटील यांनी दिली. तसेच गेल्या वर्षाचा अंदाज बघता या प्रदर्शनाला २५ हजाराहून अधिक नागरीक भेट देतील असा अंदाज आहे. त्याशिवाय प्रत्येक तासाला लकी ड्रॉ आणि स्पॉट बुकिंग डिस्काउंट अशी विविध बक्षिसे जिंकण्याची संधीही नागरिकांना मिळणार आहे. या प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार सुरेश (बाळयामामा) गोपीनाथ म्हात्रे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राजेश मोरे, आमदार किसन कथोरे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रविंद्र चव्हाण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह अनेक मान्यवर या प्रदर्शनाला भेट देणार असल्याची माहिती एमसीएचआयचे अध्यक्ष राजेश गुप्ता आणि सचिव सुनील चव्हाण यांनी दिली. ०००००
मुंबई : टी.एम.जी. क्रीयेशन्स आणि इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न झालेल्या अनूभुती महागौरव संमेलनात सौ. योगिनी शामकांत दुराफे यांना राज्यस्तरीय अनुभूती…
अनिल ठाणेकर ठाणे :सीजीएचएस बेनिफिशरीज असोसिएशन, ठाणे या केंद्र शासनाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेने ठाण्यात सीजीएचएसचे वेलनेस सेंटर (केंद्रीय स्वास्थ्य योजना) सुरू व्हावे यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे मागणी केली होती.…
कल्याण : ‘ले चली तकदीर’ ही संगीत उद्योगातील तरुण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘क्रेसेंडो कल्लाकारने’ आयोजित केलेली एक संगीत मैफल आहे. ‘क्रेसेंडो कल्लाकार ही पहिलीच निर्मिती असून नुकताच…
ठाणे : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व्रत’ घेऊन कार्य करणार्या व्यक्तींच्या कामास प्रोत्साहन देण्यासाठी व विविध ठिकाणी सुरू असलेल्या सामाजिक व शैक्षणिक कामाच्या मागे उभे राहण्यासाठी गेली ७…
अनिल ठाणेकर ठाणे : भाजपा सदस्यता अभियान अंतर्गत जिल्हाध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत ९०० हून अधिक तरुण, तरुणी आणि महिलांबरोबरच…
पुणे : भारताचे पहिले वयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांची 100 वी जयंती बुधवारी (दि.१५) पुण्यात राष्ट्रीय क्राडापटूंचा गौरव करून साजरी करण्यात आली. वारजे येथिल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इन्फीनिटी…