माथेरान : माथेरान मधील गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेतील शिक्षक विनोद जाधव यांची मुलगी मीनल हिने होमिओपॅथी मेडिकल मध्ये डॉक्टर पदवी प्राप्त केल्याबद्दल तिचा कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मीनलचे पालक शिक्षक विनोद जाधव आणि आई सीमा जाधव उपस्थित होत्या.मीनल जाधव हिचे चौथी पर्यंतचे शिक्षण आसल( कर्जत) इथे झाले त्यानंतर अकरावी,बारावी अभिनव ज्ञान मंदिर कर्जत आणि त्यानंतर केडीएमसी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज शिरपूर (धुळे) याठिकाणी झाले. तिने डॉक्टर पदवी२९ मार्च रोजी प्राप्त केली आहे केल्या या तिच्या यशाबद्दल आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नेरळ येथील छत्रपती शिवाजी मैदान जवळील हॉलवर भव्य सत्कार करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. मीनलच्या या यशाबद्दल सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
