कणकवली : अशोक गायकवाड

महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्रिपद भूषविलेल्या व शेतकरी कामगार पक्षाची मुलुख मैदानी तोफ असणाऱ्या मिनाक्षीताई पाटील यांचे २९ मार्चला दु:खद निधन झाले आहे. हि बातमी ऐकताच माझे मन हेलावुन गेले मला अतीर्व दु:ख झाले. मिनाक्षी ताई पाटील यांचे आणि माझे जिव्हाळयाचे संबंध १९ फेब्रुवारी १९८६ पासुन होते त्यावेळी त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. आजही मला तो दिवस आठवतो. रायगड जिल्हयातील पोलादपुर तालुक्यामधील अतिदुर्गम भाग म्हणुन ओळखला जाणारा कुडपण या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष स्वर्गीय प्रभाकर पाटील यांनी लावली होती. सदर स्थायी समितीच्या बैठकीत सदस्या या नात्याने मिनाक्षी ताई यांनी कुडपण आणि पोलादपुर तालुक्यासाठी विकासाचे मुद्दे अगदी आक्रमकपणे सभेत मांडत होत्या सदरचे मुद्दे मांडत असताना मी त्यांचा आक्रोश अणि आक्रमकपणा जवळुन पहिला. उपस्थित लोकांच्या अंगावर त्यांची आक्रमक भाषणे ऐकताना शहारे येत होते, अशी माहिती कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली, अजयकुमार सिताराम सर्वगोड यांनी दिली.

मिनाक्षीताई यांची जिल्हा परिषद मधील कामगिरी अत्यंत उत्तम होती. म्हणुनच काय त्याची पोहचपावती म्हणून त्यानंतर अलिबाग विधान सभेच्या आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून आल्या. मिनाक्षीताई या अंत्यंत हुशार आमदार म्हणून त्यांच नाव लैकिक होते. विशेष म्हणजे विधानसभेच्या सभागृहामध्ये त्या त्यांची भुमिका अंत्यंत आग्रहीपणाने व आक्रमणपणे मांडत असत. एक धाडसी नेतृत्व एक धाडसी महिला एक धाडसी आमदार म्हणून त्यांचा विधानसभेमध्ये सातत्याने नाव लौकिक होत असे रायगड जिल्हयामध्ये जिल्हयाचा विकास होण्याच्या दृष्टिने त्याचे मोलाचे योगदान आहे. मिनाक्षीताई यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली याचे मी परमभाग्य समजतो. मिनाक्षीाताई यांची सुनबाई चित्राताई कुबल- पाटील चित्राताई या मुळच्या वेंगुर्ले जि.सिंधुदुर्गच्या आहेत. मिनाक्षीताई पाटील यांनी आपल्या सुनेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणले . तसेच चित्राताई पाटील यांना अर्थ व बांधकाम सभापती पद सुध्दा मिळवून दिले त्या एवढयावरच थांबल्या नाहीत तर बांधकाम व अर्थ विभागाचा कारभार गतीमान व पारदर्शक पणे कसा करायचा ,भाषणे कशी करायची अर्थ संकल्पीय भाषण कसे असले पाहिजे जिल्हयांच्या विकासासाठी कोणकोणत्या बाबी अर्थ संकल्पात प्राधान्याने घेतल्या पाहिजेत हे अंत्यंत बारकाईने समजावून सांगत असे चित्राताई पाटील आणि मिनाक्षीताई आम्ही एकत्र जिल्हा दौरे करीत असत चित्राताईला ते नेहमी म्हणत अजयकुमार सर्वगोड हा जुन्या पिढीतील इंजिनिअर आहे. त्याला माझ्या दादानी (स्वर्गीय प्रभाकर पाटील) यांनी नोकरीला लावले आहे. हा फार हुशार आणि प्रामाणिक इंजिनिअर आहे. याला बरोबर घेतल्याशिवाय तू जिल्हा परिषदेचा कारभार करत जाऊ नको असे चित्राताई पाटील यांना नेहमी सांगत असत तसेच मला सुद्धा नेहमी सांगत माझी सुनबाई ही माझी भाग्यलक्ष्मी आहे. अजकुमार तिला बांधकाम व अर्थ याचा कारभार गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी सर्वतोपरी मदत करीत जा, असे मला नेहमी सांगत. मी मिनाक्षीताई यांनी दिलेल्या सुचनाचे तंतोतंत पालन केले. चित्राताई पाटील यांना मी आणि जी.एच.पाटील यांनी त्याच्या कामात मदत केली. विशेष म्हणजे बांधकाम व अर्थ विभागात चित्राताई यांची सभापती म्हणून कामगिरी न भुतो न भविष्य अशी झाली याचे सर्व श्रेय मिनाक्षी ताई पाटील यांना जाते.मला मिनाक्षी ताई यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे माझे मी परम भाग्य समजतो मिनाक्षीताई यांनी मला मुलासारखे प्रेम दिले मला त्यांनी खूप आधार दिला. मिनाक्षीताईच्या जाण्याने मला अतिशय दु:ख झाले आहे. मिनाक्षीताई यांच्या जाण्याने संबंध रायगड जिल्हयाचे अतोनात नुकसान झाले आहे. ताईची विधानसभेतील आमदार व राज्यमंत्री म्हणून कारकीर्द वाखण्यासारखी आहे. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य आमदार राज्यमंत्री अत्यंत महत्वाची चोख कामगिरी बजावली. त्यांच्या कार्याचा अलौकिक कामाचा ठसा सुध्दा उमटवला आहे. त्यांच्या जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे. मिनाक्षी ताई यांच्या कार्याला, विचाराला अणि प्रेरणादायी स्मृतीला माझी भावपुर्ण श्रंध्दाजली व आदरांजली, अशा भावना शेवटी अजयकुमार सिताराम सर्वगोड यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *