मुंबई : नायर रुग्णालयातील श्वसनविकार विभागाला इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेडच्या सीएसआर फंडातून अत्याधुनिक फोर्स्ड ऑसिलोमेट्री (एफओटी) मशीन मिळाले आहे. या सुविधेमुळे रुग्णांच्या श्वसन कार्यक्षमतेची चाचणी करणे अधिक सोपे होणार आहे. श्वसनविकाराच्या चाचणीदरम्यान रुग्णांना फुंकर मारण्यासाठी ताकद लावावी लागते, पण वयोमानामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना चाचणीदरम्यान फुंकर मारण्यात तेवढी सक्षमता नसते, पण मशीनमुळे फुंकर मारल्यानंतर श्वसननलिकेत असलेल्या अडथळ्यांचे निदान करता येणार आहे. तसेच श्वसननलिकेत असलेला दाब, दाह, सूज याचेही निदान होत असल्याने रुग्णावर तात्काळ उपचार करता येणार आहेत.