तिकीट चेकिंग परिवार मुंबईतर्फे
माथेरान : नेहमीच कामाच्या तणावातून सुद्धा आपली धार्मिक परंपरा कायमस्वरूप अबाधित ठेवून सण हा एखादा उत्सवाप्रमाणे साजरा करण्यासाठी मध्य रेल्वेत मुंबई येतील तिकीट चेकिंग परिवारतर्फे गुडीपाडव्याच्या पूर्व संध्येला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ऑडिटोरिअम येथे हिंदू नववर्ष स्वागत व तिकीट चेकिंग स्टाफचा सन्मान पुरस्कार २०२४ आयोजित केला होता.
सकाळी निघालेल्या नववर्ष शोभायात्रेची सुरुवात अरुण कुमार(SRDCM-Works), जैन(PRO ), वाय पी शर्मा( DCTI) मुंबई, जीवन गौरव पुरस्कार विजेते श्री व सौ श्रीकांत साने यांच्या हस्ते GM ऑफिसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली .
नववर्ष शोभयात्रेत श्रीराम(अभिजित शिंदे), सीता(सारिका ओझा),लक्ष्मण(रोहन पाटील),हनुमान( प्रमोद मोरे), लव -कुश (अशप्रीत कौर- नवनिध कौर) ,वाल्मिकी ऋषी(डी व्ही चिंदरकर),नृत्य कलाकार..विशाल शिंदे, प्रशांत घुंगरे, प्रिती सिंग,कविता मोहिते, मेघा पवार, दिपाली सावळे,महालक्ष्मी, तुतारी वादक व समस्त तिकिट स्टाफ भगवे फेटे बांधून सहभागी झाले होते. ऑडिटोरियम मध्ये शोभायात्रा येताच सुरझंकारने हिंदू नववर्ष स्वागत गीतांचा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रभू श्रीराम यांचे स्वागत करतांना सुरझंकारचे गायक व नृत्य कलाकारांनी भगवामय झालेली वातावरण छत्रपती शिवाजी महाराज सभागृह दनाणला… आदरणीय पी सी सी एम डि वाय नाईक व आदरणीय डि. आर एम. रजनीश कुमार गोयल व इतर मान्यवर अधिकारी यांच्या हस्ते वर्षभरात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल १६५ तिकीट चेकिंग स्टाफना ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला.
पी सी सी एम. डि वाय नाईक यांची उपस्तिथी परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचणारी आहे. उद्योजक प्रशांत फुलवणे हेसुध्दा यानिमित्ताने उपस्थित होते.
सदर कार्यकारी रेल्वेचे मान्यवर रेल्वे अधिकारी शशि भूषण(ADRM), प्रविद्र वंजारी(SRDCM), बी अरुण कुमार(SRDCM-w), प्रकाश कनोजिया(DYCCM), दिपकशर्मा (DCM), आर एस गोळे(ACM TC), वाय पी शर्मा (DCTI) व इतर अधिकारी यांच्या उपस्तिथ उकृष्ट कामगिरी उपस्तिथ उकृष्ट कामगिरी करणाऱ्या स्टाफचा सत्कार करण्यात आला उत्कृष्ट टी सी ऑफिस म्हणून कल्याण, पनवेल, भांडुप स्टाफचे सत्कार करण्यात आला.
श्रीकांत बी साने साहेब यांना जीवन गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. .रांगोळीकार संतोष बागुल, हरिश्चंद्र भांगे व विकास पाटिल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
परिवारचे अध्यक्ष संजय(भाई) आंग्रे,कार्याध्यक्ष राजन सुर्वे, सचिव डी व्ही चिंदरकर, हरिश मोंडकर, खजिनदार शेखर तांबे, सुहास जोशी,सुनील कुमार बी(x DCTI),गिरीष कदम, संदीप मोडक, सी आर बंद्रे,दिपक पापन,अभय कांबळे, सचिन सावंत,रविंद्र बिरवटकर,विकास पाटील, राजेश करलकर, बिपीन, रोहिणी राणे,,लीना गोरडे,लोचन, नीता मैत्री, बिना नायर, स्वाती पाटील, श्रद्धा साळुंखे,चित्रा मयेकर यांच्या उत्तम कार्यक्रमाची आखणी नियोजन मुळेच सुंदर कार्यक्रम झाला.
सुरझंकारचे विकास मिश्रा, सुचिता भानुशाली,महालक्ष्मी, चिंदरकर, रामकृष्ण गवळी,आनंद मिश्रा, शशांक सत्तुर, यांनी सुंदर कार्यक्रम केला.
