Month: April 2024

सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात

मुंबई : मतदार नोंदणीत पुणे जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार…

गिरीश महाजनांची खडसेंवर टीका सुरुच

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाकामांवर विश्वास ठेऊन आपण भाजपात पुन्हा प्रवेश करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहिर केल्यानंतरही भाजपाचे नेते गिरीश महाजनांनी त्यांच्यावरील टीका सुरुच ठेवली आहे. गिरीश…

सासरा विरुद्ध सून, वर्धात लढत रंगणार

वर्धा: वर्धा लोकसभा मतदारसंघात सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे. भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या रामदास तडसांना त्यांची सुन पुजा तडस यांनीच थेट निवडणूकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरत आव्हान दिले आहे. पुजा तडस यांनी रामदास तडस…

वर्षा गायकवाडंची पटोलेंविरोधात तक्रार

रमेश औताडे मुंबई : लोकसभेच्या जागावाटपात महाराष्ट्रात काँग्रेसवर अन्याय झाल्याची कार्यकर्त्यांत भावना आहे. पक्षश्रेष्ठी त्याचा जरुर विचार करतील. मी मुंबईची प्रदेशाध्यक्ष असतानाही मुंबईच्या जागावाटपाचा निर्णय घेताना माझे मत राज्य प्रदेशाध्यक्ष…

नकलींच्या विरोधात असलींना मत द्या

नांदेडमध्य अमित शहांचा हल्लाबोल नांदेड: महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना, शरद पवारांची नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस असे तीन पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत, त्यांची तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती आहे. या…

राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!

मुंबई : राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्व सुनावण्या येत्या सोमवारपासून ऑनलाईन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता दिल्लीत न जाता तक्रारदार तसेच प्रतिवाद्यांना सुनावणीला हजर राहता येणार आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने गेल्या दीड वर्षांपासून केलेल्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. राष्ट्रीय ग्राहक आयोगाची दिल्लीतील उपभोगक्ता भवनात सात खंडपीठे आहेत. या सर्व खंडपीठापुढे दररोज सुनावण्या होतात. या सुनावणीसाठी तक्रारदार वा प्रतिवाद्यांना प्रत्यक्ष वा ऑनलाईन हजर राहता येणार आहे. करोना काळात राष्ट्रीय ग्राहक आयोगाने ऑनलाईन सुनावणी सुरु केली होती. त्यावेळीही तक्रारदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तरीही नंतर ऑनलाईन सुनावणी बंद करण्यात आली. ऑनलाईन सुनावणी पुन्हा सुरु करण्यात यावी, यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने आयोगाला पत्र लिहिले होते. याशिवाय आयोगाच्या अध्यक्षांकडे पाठपुरावाही केला होता. दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाली तेव्हाही अशी मागणी पुन्हा नव्याने करण्यात आली. परंतु याबाबत निर्णय घेतला जात नव्हता. आयोगाच्या अध्यक्षपदी नव्याने आलेले अध्यक्ष अमरेश्वर प्रताप साही यांच्याकडेही ग्राहक पंचायतीने नव्याने पाठपुरावा सुरु केला. अखेर त्यांनी ही मागणी मान्य केली आहे. सुरुवातीला एका खंडपीठात अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यास यश मिळाल्यानंतर आता सर्व खंडपीठात ही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ई-न्यायालयांचा आग्रह धरला आहे. याबाबत न्यायालयाने नियमावलीही जारी केली होती. सर्वोच्च व उच्च न्यायालयात काही प्रमाणात तसा वापर सुरु झाला आहे. महारेरातीलही काही सुनावण्या ऑनलाईन घेतल्या जातात. आता राष्ट्रीय ग्राहक आयोगाने पुढाकार घेतला असून सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही व्यवस्था सुरु करण्यात आलेली आहे, असे पत्रक आयोगाने जारी केले आहे.

वर्षभरात पावणेसतरा कोटीचा मालमत्ता कर जमा – पंकज पाटील

अशोक गायकवाड खोपोली : खोपोली नगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात तब्बल पावणेसतरा कोटींची वसुली केली असून, हा आजवरील सर्वाधिक वसुलीचा विक्रम आहे. मालमत्ता कर विभागाने गेले वर्षभर नियोजनबद्धरित्या वसुलीची रूपरेषा आखली होती. याचप्रमाणे खोपोलीकरांनी आपला मालमत्ता कराचा भरणा वेळेवर करून शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत हातभार लावावा, असे आवाहन खोपोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी केले आहे. अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी न भरलेल्या २४ थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी नळ कनेक्शन तोडण्यात आले. थकबाकीदारांच्या नावांची बॅनरद्वारे जाहीर प्रसिद्धी यासारखी कारवाई करण्यात आल्याने वसुलीत विक्रमी वाढ झाली. पालिकेच्या तिजोरीत ३१ मार्चअखेर १६ कोटी ७५ लाख रुपये जमा झाले आहेत. मालमत्ता कर विभागाचे गौतम भगळे, गजानन जाधव यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली एकूण २० कर्मचारी वसुली मोहिमेकरिता नेमण्यात आले होते. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यावसायिक मालमत्ता करधारकांडून पालिकेने वसुलीची थेट कारवाई सुरू केली. अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या २४ थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. मार्चनंतर देखील वसुलीची मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे.

वरंध घाट ३० मे पर्यंत सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : रायगड जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील मौजे वरंध ते रायगड जिल्हा हद्दीत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षण भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे दि.8 एप्रिल पासून ते ३० मे २०२४ पर्यंत वरंध घाटातील रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसा महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडी किमी ८८/१०० (राजेवाडी) ते किमी ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम संरक्षण भिंती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्यासाठीची कामे प्रगतीत आहे. वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून बहूतांश काम पूर्ण झालेले आहे,. परंतू साखळी क्रमांक ८८/१०० (मौजे वरंघ) ते ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या लांबीमध्ये काम सुरु करावयाचे आहे. सदरच्या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करावयास अपुरी आहे. सदरच्या लांबीमध्ये चालू वाहतूकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. वाहतूक चालू ठेवल्यास ते शक्य होणार नाही सदर कालावधीकरीता वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करणेबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे. वरंध घाटातील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करणेबाबत तसेच सदरवेळी पर्यायी मार्ग वापराबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगांव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे व पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर” असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.

तरुण वर्ग संघटनेच्या वतीने उन्हाळी शिबिराचे आयोजन

रमेश औताडे मुंबई :  भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निम्मिताने सिद्धार्थ कॉलनी या ठिकाणी सिद्धार्थ कॉलनी तरुण वर्ग संघटनेच्या वतीने दिनांक 14/4/2024 ते 30/4/2024 दरम्यान 16 दिवसांचे उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महापुरुषांच्या विचाराचे सामर्थ तरुणामध्ये येण्यासाठी तसेंच बुध्द आणी त्यांचा धम्म,शाहू, फुले ,यांचे विचार छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास या उन्हाळी शिबीरातून आत्ताच्या तरुणापर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या शिबिरात सर्व वयोगटातील विद्यार्थी तरुण तरुणी यांच्यासाठी शैक्षणिक,क्रिडा,मनोरंजन,करिअर मार्गदर्शन,योगा,ध्यान,याबरोबर कोणत्याही प्रकाराचे शुल्क न आकारता क्रिकेट,फुटबॉल,कब्बड्डी,बुध्दिबळ् अश्या प्रकारे खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे. या बरोबर महिला मुलीसाठी स्व सुरक्षेच्या दृष्टीने कराटे ,किक बॉक्सिंग,सहीत अनेक मैदांनी खेळाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती युवा पँथर प्रणित विनायक पगारे यांनी दिली.अधिक माहितीसाठी 98332 29995 या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले.

महिला सक्षमीकरण कार्यक्रमातून समाजात चांगला संदेश : जगदीश तेजवानी

राजेंद्र साळसकर उल्हासनगर : समाजाच्या कल्याणासाठी अनेक सामाजिक संस्था सक्रिय भूमिका निभावतात, ज्यामध्ये मां काली चॅरिटेबल ट्रस्टचे प्रयत्न नेहमीच स्मरणात राहतील कारण ही संस्था गावोगावी काम करते आणि शाळा चालवण्याबरोबरच विधवा महिलांना पेन्शन, ज्योतिबा फुले योजना, पॅन कार्ड,आधार कार्ड देखील देते. पण हीच लिंक पुढे नेत ती समाजसेवा करत आहे, महिलांना रोजगार, शिक्षण आणि मुख्य म्हणजे महिला सन्मान आणि विधवा पेन्शन आणि साडी वाटप, ट्रॉफी देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व विद्यार्थ्यांना मेडल देऊन उद्घाटन केले. प्रत्येक शुभ सणाला ट्रस्टचे अध्यक्ष व शाळेने कार्यक्रमाच्या माध्यमातून गरजूंच्या पाठीशी उभे राहावे, असा संस्थेतर्फे सातत्याने प्रयत्न केला जात आहे. शिवप्रताप सिंह सांगतात की त्यांनी २०१८ पासून संघटना स्थापन केली आहे, तेव्हापासून जगदीश तेजवानी आणि राजन चंद्रवंशी त्यांना वेळोवेळी साथ देत आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगर भाजपा व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष जगदीश तेजवानी, महेश पुरस्वानी होते. माँ काली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शिवप्रताप सिंह प्राचार्य  लतिका बिचकुंडवार, अशोक भंडारी, नितीन कडू, विवेक भदानी, दर्शन अहिरे, प्रमिला शर्मा, रितू यादव यांच्यासह शिक्षक, महिला, शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.