Month: April 2024

ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन सुरूच

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहिता लागू असताना या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील अनेक ठिकाणी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या पक्ष कार्यालयांवरील पक्षाचे नाव, चिन्ह अद्यापही नियमानुसार झाकले नाही. भाजपने वर्तकनगर येथे कार्यालय स्थापन केले आहे. या कार्यालयावरील भाजपचे नाव ठळक अक्षरात दिसत आहे. टेंभीनाका भागातही असेच चित्र आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून त्यानुसार आता आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली आहे. या आचारंसहितेचे पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज संस्थामधील अधिकारी कार्यरत आहेत. या कालावधीत पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आचारसंहितेचे पालन करावे लागते. त्यासाठी मार्गदर्शकतत्त्वे लागू करण्यात आली आहेत. पक्ष कार्यालयावर नेते, पक्षाचे नाव, चिन्ह असल्यास ते झाकण्याच्या सूचना केल्या जातात. नियमानुसार काही नेते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाची नावे झाकली आहेत. तर काही पदाधिकारी अद्यापही आचारसंहितेच्या नियमांचे पालन करताना दिसत नसल्याचे चित्र आहे. वर्तकनगर येथील रेमंड परिसरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी गुढीपाडव्या निमित्ताने भाजपच्या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटन केले. या कार्यालयावर भारतीय जनता पक्ष असे ठळक अक्षरांममध्ये लिहीण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठ्या आकारातील छायाचित्र प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आले आहे. उद्घटनाचा दुसरा दिवस उजाडल्यानंतरही दुपारपर्यंत या कार्यालयावरील नाव झाकण्यात आले नव्हते. अशाचप्रकारे चरई भागात शिंदे यांच्या शिवसेनेच्या टेंभीनाका-चरईच्या शाखाप्रमुखाचे कार्यालय आहे. या कार्यालयावरील फलक झाकण्यात आलेले नाही. या फलकावर शिवसेनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र आहे. उथळसर येथे शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका माजी नगरसेविकेचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या दर्शनीभागाचे फलक झाकण्यात आले असले तरी एक दिशेकडून शिवसेना हे नाव स्पष्ट दिसत आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथे आनंद आश्रमावर देखील पक्षाचे नाव आहे. आनंद आश्रमात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका, पत्रकार परिषद होत आहेत. असे असतानाही निवडणूक अधिकाऱ्यांकडून या बाबत कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या कार्यालयाबाबत येथील निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले असता, संबंधित बाब निदर्शनास आल्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह झाकण्याचे कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांना संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

उथळसर आणि नौपाड्यात सोमवारी पाणी पुरवठा बंद

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात जल वाहिनी स्थलांतराच्या अत्यावश्यक कामामुळे सोमवार, १५ एप्रिल स. ८.०० ते मंगळवार, १६ एप्रिल स. ८.०० वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. के व्हिला नाला पुलाच्या कामामुळे जेलच्या जलकुंभावरून पाणी पुरवठा करणारी मुख्य वितरण वाहिनी बाधित होणार आहे. त्यामुळे या जलवाहिनीचे  स्थलांतर करून जोडकाम करण्यासाठी २४ तासांचा शट डाऊन पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. या शटडाऊनमुळे, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्र. १ व २, के व्हिला, आकाशगंगा, पंचगंगा, उथळसर, सेंट्र्ल जेल परिसर, पोलीस लाईन, तसेच, नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील एन. के. टी. महाविद्यालय परिसर, खारकर आळी, पोलीस हायस्कूल या भागात सोमवार, १५ एप्रिल स. ८.०० ते मंगळवार, १६ एप्रिल स. ८.०० वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शट डाऊननंतर, पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना अतिरिक्त आयुक्त  प्रशांत रोडे, उपायुक्त मुख्यालय जी.जी.गोदेपुरे, प्र.उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर व महापालिकेच्या विविध विभागाचे कर्मचारी.

महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचे अभिवादन !

ठाणे : स्री शिक्षण, समानता, सत्यासाठी देह झिजविणारे, सत्यशोधक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा वनिताताई गोतपगार, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रविंद्र पालव. परिवहन सदस्य नितिन पाटील, ठाणे सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष कल्पेश मिठबावकर, जिल्हा कार्यकारिणी सचिव लखबीर गील, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, उथळसर ब्लॉक अध्यक्ष समिर पेंढारे, प्रभाग अध्यक्ष साई प्रभू, महिला विधानसभा अध्यक्षा अरुणा पेंढारे, वंदना खानोलकर, उथळसर ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मी वैती आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा करा – संजीव नाईक

अनिल ठाणेकर ठाणे : कार्यकुशल  विकासाभिमुख युवा नेतृत्व असलेले माजी खासदार संजीव गणेश नाईक यांनी, आपला वाढदिवस केवळ सेवाभावी आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातूनच साजरा करावा, त्याला उत्सवी स्वरूप देऊ नये असे आवाहन केले आहे. १५ एप्रिलला संजीव नाईक यांचा वाढदिवस आहे. माजी खासदार संजीव गणेश नाईक हे विकासाची दूरदृष्टी असलेले आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदरसह राज्यात विविध ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते संजीव नाईक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात. यावर्षी वाढदिवसाला कोणतेही उत्सवी स्वरूप न देता केवळ  विधायक उपक्रमांचे आयोजन करूनच संजीव गणेश नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. रक्तदान, अन्नदान, आरोग्य तपासणी, समाजातील गुणवंतांचा सत्कार, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, फळवाटप  अशा समाजाला उपयुक्त ठरणाऱ्या  कार्यक्रमांचे आयोजन करावे. वाढदिवसाचा केक कापू नये. हार, तुरे, पुष्पगुच्छ शुभेच्छांसाठी आणू नयेत. सेवाभावी उपक्रमातून मिळणाऱ्या जनतेच्या  शुभेच्छा आणि आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे आहेत, अशी भावना,  माजी खासदार संजीव गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे.

ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत कदम तर सचिवपदी जगदीश शिंगाडे यांची निवड

ठाणे : ठाणे जिल्हा बार असोसिएशनची (वकील संघटना) सन 2024-2026 साठी निवडणूक 6 एप्रिलला पार पडली. आता या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यावेळी अ‍ॅड. प्रशांत गणपत कदम (आप्पा) यांना 859 मते मिळाली तर त्यांचे विरोधक अ‍ॅड. संजय अनंत म्हात्रे यांना 497 मते मिळाली. कदम यांना 362 मतांनी दणदणीत विजय संपादन केला. तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. सलिल श्रीकांत बुटाला यांचा बहुमताने विजय झाला. तसेच सचिवपदी अ‍ॅड. जगदीश शिंगाडे यांची निवड झाली. तर खजिनदारपदी अ‍ॅड. रेखा नरेंद्र हिवरे तसेच उपसचिवपदी (पुरुष )अ‍ॅड. भरत सोनावणे व महिला गटात अ‍ॅड. कविता सचिन चौधरी यांची निवड झाली. तर कार्यकारी सदस्यपदी अ‍ॅड. नारायण अवचर, अ‍ॅड. सोपान चव्हाण, अ‍ॅड. शैलेश कदम, अ‍ॅड. पुनम कामतकर, अ‍ॅड. पुजा कासळे, अ‍ॅड. प्रशांत लिहिनर, अ‍ॅड. संतोष पांडे व अ‍ॅड. सायली वालमे आदींची निवड झाली. सर्व विजयी उमेदवारांचे ठाणे जिल्ह्यांतून अभिनंदन करण्यात येत आहे. ठाणे जिल्हा बार असोसिएशनची सन 2024 ते 2026 या कालावधीसाठी पदाधिकार्‍यांची निवडणूक 6 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील 1467 मतदारांनी सहभाग घेतला. पैकी 1379 जणांचे मतदान झाले. अध्यक्षपदाची निवडणूकीत अ‍ॅड. प्रशांत कदम यांनी  362 मतांची आघाडी घेत 859 मते मिळाली तर विरोधी उमेदवार अ‍ॅड. संजय म्हात्रे यांना 497 मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठी 4 जण रिेंगणात होते. त्यामध्ये अ‍ॅड. सलिल बुटाला यांना 568, अ‍ॅड. हेमलता देशमुख यांना 531, अ‍ॅड. मनोजकुमार राय यांना 133 मते तर अ‍ॅड. कुंदा सावंत यांना अवघी 87 मते मिळवून चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर सचिवपदाची निवडणूक अटीतटीची झाली. अ‍ॅड. जगदीश शिंगाडे यांना 725 मते मिळाली तर अ‍ॅड. नरेंद्र गुप्ते यांना 610 मते मिळाली. अ‍ॅड. शिंगाडे यांचा 115 मतांनी विजय झाला. सर्व विजयी उमेदवारांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

अश्विनी शिंदे व रुपेश कोंडाळकर सर्वोत्कृष्ट खेळाडू इलेट्रिक बाईक देऊन गौरव केला गौरव

विद्यमाने कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा पुणे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२२-२३ घेण्यात आली होती, या स्पर्धेतील अष्टपैलू…

ईदनिमित्त सलमान खानच्या घरासमोर चाहत्यांची तोबा गर्दी

पोलिसांचा लाठीचार्ज मुंबई : अभिनेता सलमान खानच्या मुंबईतल्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमली आहे. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची बातमी समोर आली आहे. रमजानच्या दिवशी सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी…

 माथेरानकरांची प्रतीक्षा केव्हा संपणार?

पनवेल माथेरान पर्यायी मार्ग लाल फीतीमध्ये अडकला माथेरान :माथेरान पर्यटन नगरीला भेट देण्याकरिता सध्या नेरळ ते माथेरान हा एकमेव घाट रस्ता उपलब्ध आहे त्याचबरोबर नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या मर्यादित सेवा…

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक समतेचे अग्रणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात…