मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गायन, वादन आणि  नृत्य, यांच्या प्रगत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात; आणि या  विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या अवलोकनासाठी दरवर्षी त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा कार्यक्रम शनिवार दिनांक ११ मे आणि रविवार दिनांक १२ मे रोजी सकाळी १० वाजता आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

यात सहभागी होणाऱ्या गायकांना केंद्राचे शिष्यवृत्तीधारक निनाद कुणकवळेकर तबल्याची साथ करणार असून हार्मोनियमची साथ ओमकार अग्निहोत्री यांची असेल. शनिवार दिनांक ११ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात समृद्धी शिंदे – भरतनाट्यम नृत्य ( गुरु – स्नेहल फाटक- कळमकर), कनिष्का पोवळे – गायन (गुरु – प्रतिमा टिळक), सिद्धी शितूत – गायन (गुरु- वरदा गोडबोले), आसावरी गोंधळी – गायन (गुरु – पं. अरुण कशाळकर) हे आपली कला सादर करतील तर रविवार दिनांक १२ मे रोजी सकाळी १० वाजता सावनी पारेकर ( गुरु – पल्लवी जोशी), अदिश्री पोटे (गुरु – पल्लवी पोटे), प्राजक्ता शेंद्रे (गुरु – पल्लवी जोशी), सावनी गोगटे (गुरु पं. शुभदा पराडकर) यांच्या गायनाचे सादरीकरण होईल.

सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येने हजर राहून सर्व युवा कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *