अशोक गायकवाड
रायगड :आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन मतशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.रायगड पुनिता गुरव यांनी केले आहे.
सन-२०२४-२५ या वर्षाकरिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रीया स्थगित करण्यात आली होती. आता सन-२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी ऑनालाईन पध्दतीने केलेल्या अर्जाचा सन-२०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीये साठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.रायगड पुनिता गुरव यांनी केले आहे.
