धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून अरुणाताईंची तब्येत बरी नसल्याचे समजल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांनी त्यांच्या तब्येत आणि सुरू असलेले औषधोपचार यांच्याबाबत माहिती घेतली. तसेच अरुणाताईंवर शक्य ते सारे उपचार करावेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती डॉक्टराना केली.
कोकण रेल्वेत दर दिवशी विनातिकीट प्रवाशांकडून नऊ लाख रुपये दंड वसूल
मुंबई : कोकण रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे प्रशासन सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. या मोहिमेदरम्यान एप्रिल २०२४ मध्ये प्रतिदिन सरासरी ५०४ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून सरासरी सुमारे ९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात. तसेच कोकणातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मात्र अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात तिकीट तपासणी मोहीम राबवून एकूण १५ हजार १२९ प्रवासी तिकीटाविनाच प्रवास करीत असल्याचे आढळले होते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून एकूण दोन कोटी ६९ लाख ८५ हजार २५६ रुपये दंड वसूल करण्यात आला. कोकण रेल्वेवरील अनियमित/अनधिकृत प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे, असे कोकण रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. भविष्यात कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर प्रभावीपणे तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.
बाष्पीभवनामुळे ठाणे जिल्ह्यातील धरणांच्या पातळीत घट
पाऊस उंबरठ्यावर असल्याने पाणी कपातीची शक्यता नाही कल्याण : मागील काही दिवसांपासून उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. मुंबई, ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचे अधिक प्रमाणात बाष्पीभवन होऊन, धरणाच्या पातळींमध्ये घट होत आहे. ठाणे, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्यात आता कपात केली जाते की काय या विचाराने नागरिक चिंतातूर असताना जलसंपदा विभागाने अशाप्रकारची कोणतीही कपात करण्याचा निर्णय नाही, असे स्पष्ट केले आहे. एप्रिल ते मे महिन्यात उष्णता वाढली की त्याचा परिणाम धरणांतील पाणी साठ्यावर सर्वाधिक होतो. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत जात होते. त्याचा परिणाम मुंबई, ठाणे शहर परिसराला करण्यात येणाऱ्या दैनंदिन पाणी पुरवठ्यावर होतो. मागील पाच ते सहा वर्षापूर्वी जून, जुलै सरला तरी पावसाने ओढ दिल्याने धरण साठा तळाला गेला होता. नागरिकांना दैनंदिन पाणी पुरवठा कसा करायचा असा प्रश्न शासनासमोर निर्माण झाला होता. त्यानंतर शासनाने दरवर्षी दिवाळीनंतर पाऊस पडेपर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. यामुळे जून अखेरपर्यंत पुरेसा पाणी साठा पिण्यासाठी उपलब्ध होत होता. गेल्या दोन ते तीन वर्षापासून ठाणे जिल्ह्यातील भातसा, वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, बारवी या धरणांमध्ये ऑगस्ट, सप्टेंंबरमध्ये १४ लाख ५० हजार दशलक्ष लिटर पाणी साठा पावसाच्या माध्यमातून जमा होतो. गेल्या दोन महिन्यापासून तापमान ४० अंशाच्या पुढे जात आहे. उष्णतामानामुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात होते. मुंबई, ठाणे शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्यात कपात केली जाते की काय अशी चिंता नागरिकांमध्ये आहे. जलसंपदा विभागाने अशाप्रकारची कपात होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाणी साठा ४० टक्क्यांवर मुंबईला दैनंदिन सुमारे साडेतीन हजार तर बारवी धरणातून दैनंदिन सुमारे अकराशेहून अधिक दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर निवासी क्षेत्र, औद्योगिक विभागाला केला जातो. आता हा धरणांचा पाणी साठा सुमारे ३५ ते ४० टक्क्यांवर आला आहे. मागील दोन ते तीन वर्ष समाधानकारक पाऊस पडून ठाणे जिल्ह्यातील धरणे ऑगस्ट, सप्टेंंबरपर्यंत शहरांना आठ महिने दैनंदिन पुरेसा पाणी पुरवठा करतील अशा प्रमाणात भरतात. यापूर्वीसारखी पाणी कपातीची वेळ शासनावर येत नाही. भातसा धरणाची पाणी साठवण क्षमंता ३२४ दशलक्ष घनमीटर, तानसा ४८ दशलक्ष घनमीटर, मोडकसागर २६ दशलक्ष घनमीटर, बारवी १२१ दशलक्ष घनमीटर, मध्य वैतरणा २२ दशलक्ष घनमीटर आहे. या धरणांमध्ये सद्य परिस्थितीत सुमारे ३५ ते ४० टक्के पाणी साठा आहे. हा साठा पाऊस पडेपर्यंत पुरेसा असल्याचा दावा जलसंपदा, लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांंकडून करण्यात आला आहे.
दिवा येथील ठाणे पालिकेच्या कचराभूमीवर बेकायदा चाळी
डोंबिवली –दिवा शहराजवळील ठाणे महानगरपालिकेच्या कचराभूमीवर कचऱ्याचे सपाटीकरण करून भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारण्याचा जोरदार धंदा उघडला आहे. या कचराभूमीवर जागा हडप करण्यासाठी भूमाफिया हिरव्या जाळ्या लावून, पत्रे लावून कचराभूमीवरील भौगोलिक…
ठाण्यात प्रथमच गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन,
ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने १० हजार प्रतिनिधी येणार, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती अनिल ठाणेकर ठाणे : गृहनिर्माण संस्थांच्या पुर्नविकासात विविध समस्या व अडचणीबाबत चर्चा तसेच, मार्गदर्शन करण्यासाठी ७ जून ते ९ जुन या कालावधीत ठाण्यातील कोकणी पाडा, उपवन तलाव येथील मैदानात भव्य वातानुकुलीत मंडपात “गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन” व प्रदर्शन आयोजित करण्यात रोजी आले आहे.सुमारे आठ ते १० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत तसेच अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित राहतील, अशी माहिती ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे ठाणे जिल्हयातील पहिलेच महाअधिवेशन असुन सुमारे आठ ते १० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी ७ जून रोजी उदघाटन सोहळा, शनिवारी ८ जून रोजी महाअधिवेशन आणि ९ जून रोजी प्रदर्शन व सायंकाळी समारोप होईल..कार्यक्रमासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध असुन उपस्थितांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली असुन यावेळी गृहनिर्माण सोसायट्यांकरीता लागणारे किट दिले जाणार आहे. ठाण्यातील उपवन येथे प्रथमच होत असलेल्या या भव्य अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, गटनेते प्रविण दरेकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, सहकार आयुक्त आदीसह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. या अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचा पुर्नविकास, त्याचबरोबर त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी रखडलेले पुर्नविकास प्रकल्प, स्वयंपुर्ण विकासाच्या समस्या व स्वयंपूर्ण विकासासाठी अर्थसाह्य, वारंवार खोट्या तक्रारी करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी, गृहनिर्माण संस्थांच्या सहकार कायद्याबाबत सुधारणा तसेच, आवश्यक ते बदल या बरोबरच गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच अडचणी आदी विषयांवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा देखील केला जाणार आहे.तसेच,या अधिवेशनात यासंदर्भातील वेगवेगळे ठराव देखील पारित केले जाणार आहेत. दरम्यान, महाअधिवेशनात आयोजित प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक,अर्थसाह्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर रेन हॉर्वेस्टींग व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स असणार आहेत. तेव्हा, ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविण्यासाठी नोंदणी करावी,अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन सीताराम राणे यांनी केले आहे. चौकट सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पहिल्याच महाअधिवेशनात गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार कायदा, पुनर्विकासबद्दल व स्वयंपुनर्विकास संबंधित समस्या या विषयावर ठराव मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी https://bit.ly/thanehousingmaha adhiveshan2024 या लिंकवर ३० मे, २०२४ पूर्वी आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. असे आवाहन सीताराम राणे यांनी केले आहे.
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !
वाचक मनोगत लोकसभेच्या रिंगणातील पाचव्या टप्याची निवडणूक नुकतीच पार पडली. ही निवडणूक खऱ्या अर्थाने गाजली ती मतदारांच्या गायब झालेल्या नावामुळे. मतदार याद्यांमधून मतदारांची नावे गायब होणे हे दर निवडणुकीस स्वाभाविक…
जागतिक कासव दिन
दिन विशेष श्याम ठाणेदार २३ मे हा दिवस संपूर्ण जगात जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो. १९९० पासून हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. आपल्या संस्कृतीत कासवाला खूप…
मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम?
पर्यावरण मिलिंद बेंडाळे सर्व प्रकारच्या प्रदुषणाबरोबरच वाढते वायू प्रदूषण ही गंभीर समस्या असून मातेच्या गर्भात असताना वा पहिल्या दोन वर्षांमध्ये मुले प्रदुषित हवेच्या संपर्कात आल्यास त्यांच्या मेंदूची रचना बदलत असल्याचे…
जे. पी. नड्डांचे विधान…
भारतीय जनता पक्ष आता पूर्णतः सक्षम झाला असून स्वबळावर तो संपूर्ण कारभार चालवू शकतो. अशावेळी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आधार घेण्याची काहीही गरज नाही, अशा आशयाचे विधान भाजपचे…
