Month: May 2024

पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मंगळवेढ्यात होणार

कुमार गटाची लातूर तर किशोर गटाची स्पर्धा मानवतला : प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांची माहिती पुणे : पुरुष व महिला गटाची राज्य अजिंक्यपद  खो-खो स्पर्धा मंगळवेढामध्ये सोलापूर ॲम्युचर  खो खो असोसिएशन यांच्या  यजमान पदाखाली होणार असल्याची माहिती महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी दिली. पुणे येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या शासकीय परिषदेच्या बैठकीत राज्याच्या विविध स्पर्धांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असल्याचे डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.  याबाबत अधिक माहिती सांगताना ते म्हणाले, कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा लातूर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने तर किशोर- किशोरी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मानवत (जिल्हा परभणी) या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. राष्ट्रीय स्पर्धा साधारणपणे नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये होतील.  या स्पर्धेच्या अगोदर राज्य अजिंक्यपद  स्पर्धेच्या तारखा  निश्चित करण्यात येतील. या स्पर्धेतून महाराष्ट्राचे संघ निवडण्यासाठी निवड समिती सदस्य आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक व फिजिओ यांची नियुक्ती सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. पंच शिबीर वसमत, हिंगोली येथे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे २०२४-२५ या वर्षीचे पंच शिबीर वसमत (जिल्हा हिंगोली) या ठिकाणी ऑगस्टमध्ये आयोजित केले जाणार आहे. ज्यामध्ये खो-खो मध्ये समाविष्ट होत असलेल्या व बदल  झालेल्या विविध नियमांवर चर्चा होऊन उजळणी सुध्दा घेतेली जाते. निवड समित्या पुरुष – महिला (खुला गट) : जगदीश दवणे (पालघर), मंदार कोळी (ठाणे), विशाल भिंगारदेवे (सांगली), गौरी भगत (सातारा). कुमार – मुली (१८ वर्षाखालील) : प्रशांत कदम (सातारा), रमेश नांदेडकर (नांदेड),  संदीप चव्हाण (पुणे ), भावना पडवेकर ( ठाणे). किशोर – किशोरी (१४ वर्षाखालील)  :  अमोल मुटकुळे (हिंगोली), विशाल पाटील (जळगाव ), राजाराम शितोळे (सोलापूर),  वर्षा कच्छवा (बीड ). संघ प्रशिक्षक व सहाय्यक प्रशिक्षक: राष्ट्रीय स्पर्धा : पुरुष गट : डॉ. नरेंद्र कुंदर ( मुंबई उपनगर ), डॉ. पवन पाटील ( परभणी). महिला गट : नरेंद्र मेंगळ (ठाणे ),अनिल रौंदाळ (नंदुरबार). फेडेरेशन चषक …

मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम – संजय केळकर

अनिल ठाणेकर ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे मतदाना दिवशी उघड झाल्यानंतर प्रशासना विरोधात सर्वच स्तरातुन टिकेची झोड उठत आहे.या पार्श्वभूमीवर ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ‘नवमतदार नोंदणी’ तसेच मतदार ओळखपत्र दुरुस्ती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी 022 – 25333850 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आ. संजय केळकर यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानात निवडणुक यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर आला होता.  मतदार यादीतुन नावे वगळण्यात आल्याने अनेक जुन्या जाणत्या मतदारांना मतदानापासुन वंचित राहावे लागले होते. ही बाब गंभीरतेने घेत आ. संजय केळकर यांच्या पुढाकाराने सचिन शिनगारे यांनी मतदार नोंदणी व दुरुस्ती मोहिम सुरु केली आहे. मतदार यादीमध्ये नाव नोंदणी आणि मतदार ओळखपत्रामध्ये दुरुस्ती करण्याकरिता, तसेच, ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असतील अशांसाठी विशेष मोहिम सुरु केली आहे.त्यानुसार, ज्यांना मतदार नोंदणी करावयाची आहे, त्यांनी स्वतःचा फोटो,आधारकार्ड, वास्तव्याचा पुरावा आदी आवश्यक स्वयंसांक्षाकित कागदपत्रांसह जनसेवा कार्यालय, जय भवानी नगर, मराठी शाळे मागे, माजिवडा ठाणे प. 400601.अथवा श्रमसाफल्य, वीर सावरकर मार्ग, तीन पेट्रोल पंप जवळ, आराम बाग समोर, ठाणे प. 400602. या पत्यावर तसेच  022 – 25333850 या व सचिन शिनगारे यांना या  98927 66111 क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन आ. संजय केळकर यांनी केले आहे.

भारतीय माहिती क्रांतीचे जनक राजीव गांधी

दिन विशेष श्याम ठाणेदार आज २१ मे, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज ३३ वा स्मृतीदिन. राजीव गांधी यांना भारतीय माहिती क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. आधुनिक विचार आणि…

माणुसकी जपणारे अविनाश पाठक

    शुभेच्छा वर्षा विजय देशपांडे आज-काल समाजात सारखी ओरड ऐकू येत असते की माणुसकी दिसत नाही. मात्र हे विधान खोटे ठरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक…

अपघातात कायदा ‘ठार’

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाणाऱ्या पुण्यात रवीवारी रात्री दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात कायदा ठार झाला आहे. एका बढे बाप का बेटा जो अल्पवयीन आहे दारूच्या नशेत दोन माणसांना बेदरकार ड्रायव्हिंग…

अहमदाबाद विमानतळावर ईसीसच्या चार दहशतवाद्यांना अटक

अमहदाबाद : अमहदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे आहेत. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी श्रीलंकेतून…

थरार ! एअर इंडियाचे बर्निंग प्लेन

179 प्रवासांचा जीव वाचला बंगळुरू : एन हवेत उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनला आग लागली. पायलटनी जीवाची बाजी लावत हे बर्निंग प्लेनचे बंगळुरु एअरपोर्टवर ईमर्जन्सी लँडींग करण्यात आले. पुण्याहून कोच्चीला जाणारे…

पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं रडगाणं – फडणवीस

मुंबई : मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ…

मतदान संथ करण्याचा कट रचला गेला- ठाकरे

मुंबई: शिवसेनेच्या ठाकरे गटाला ज्या ठिकाणी मतदान जास्त होतंय नेमकं त्याच ठिकाणी केंद्रावर जाणूनबूजून विलंब केला गेला. मतदारांना मुद्दामून ताटकळत ठेवले गेले. ज्यामुळे बरेच लोक मतदान न करता निघून गेले. असा…