मुंबई : पगाराची अनियमितता. तटपुंजा पगार यावर कसे बसे आपले घर चाविणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आता गणवेशापोटी तब्बल सहावर्षानंतर नवेकोरे कापड मिळणार आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप सुरू केले आहे. मुंबईतील विविध आगारांतील चालक, वाहकांसह ९३२ जणांना गणवेश दिला जाणार आहे.

सन २०१९ पासून कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांना पदरमोड करून गणवेश खरेदी करावा लागत होता. गणवेश देण्याची मागणी कामगार संघटनांनी लावून धरली होती. आगारातील चालक आणि वाहकांनाही गणवेशाचे वाटप सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गेली सहा वर्षे कर्मचारी स्वखर्चाने गणवेश घेत होते. त्याचे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नाहीत. ते त्यांना देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांना यापूर्वी कापड आणि शिलाई भत्ता मिळत होता. मात्र २०१९ मध्ये राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी ‘ड्रेसकोड’ची संकल्पना आणली.  मात्र, हा निर्णय फसला. त्यानंतर सहा वर्षे कर्मचारी स्वत: च गणवेशाचा खर्च करीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *