मनसेचा सरकारला इशारा

डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांना पत्र पाठविले होते. या पत्राला देसाई यांनी समाधानकारक उत्तर दिलेली नाही. कॉलेजला स्वायत्तता मिळाली असली तरी व्यवस्थापन अनुदानित कॉलेज बंद करु शकत नाही. व्यवस्थापनाची ही कृती शिक्षक, विद्यार्थी यांच्यावर अन्याय करणारी आहे. तसेच विद्यापीठ कायदा आणि सरकारी नियमांचे उल्लंघन करणारी आहे. या प्रकरणी शिक्षण मंत्र्याकडे दाद मागणार अन्यता मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा गांगुर्डे यांनी देसाई यांना दिला आहे.
डोंबिवलीतील के.व्ही.पेंढरकर कॉलेज अनुदानित असताना ते ते विनाअनुदानित करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. त्याविरोधात 14 जून पासून कॉलेज समोर शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचे साखळी उपाेषण सुरु आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश संघटक संतोष गांगुर्डे यांनी सोमवारी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांची भेट घेतली.
यावेळी जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव, डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांसह शिष्टमंडळ उपस्थित होते. एक तासांच्या प्रदीर्घ चर्चेअंती देसाई यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याची सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर काय ते बाेलू असे सांगितले. गांगुर्डे यांनी मराठी विभाग का बंद केला आहे.
कॉलेजमध्ये बाऊन्सर ची गरज काय ? प्राध्यापकासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एका खोलीत काम ने देता बसवून का ठेवले जात आहे. या प्रकरणी जाब विचारला. चर्चेअंती संस्थाचालकांकडून मनविसे शिष्टमंडळाला कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे शासन दरबारी जाब विचारुन मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा ईशारा मनविसेने दिला. याबाबत शिष्ठमंडळाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्याही समस्या जाणून मनविसे पूर्णपणे त्यांच्यासोबत आहोत असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *