माथेरान : कर्जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेणेबाबत आमदार श्री. महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २९ जून २०२४ रोजी बाळासाहेब भवन, जनसंपर्क कार्यालय, कर्जत येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान कर्जत तालुक्यातील मंजूर व प्रगतीपथावर तसेच पूर्ण झालेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यातील जवळपास कर्जत तालुक्यात १२३ योजना मंजूर असून २४ योजना पूर्ण व ९२ योजना प्रगतीपथावर आहेत. या बैठकीत काम करत असताना व योजना परिपूर्ण करत असताना तेथील निर्माण होणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर, तालुकाप्रमुख संभाजीशेठ जगताप, उप अभियंता मिटकरी साहेब, शाखा अभियंता सुजित धनगर, करडे व पाणीपुरवठा विभागाचे इतर अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *