ठाणे : ठाण्यातील मानपाडा येथील एम एमएमआरडीए च्या 22 मजली इमारतीत आग लागली होती यात अडकलेल्या 25 ते 30 जनची सुखरूप सुटका करण्यात आली.
30जुलै रोजी रात्री अकरा वाजता इमारतीत तळ मजल्यावर आणि पहिला मजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक केबल मध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली होती या आगीत 25 ते 30 रहिवासी अडकले होते आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
ही आग तब्बल 12 व्या मजल्यापर्यंत पोहचली होती या आगीची माहिती कळताच महावितरणचे कर्मचारी मानपाडा पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी कर्मचारी व अग्निशामक दल आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकाऱ्याने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन एक ते दीड तासच्या अथक प्रयत्नाने अग्नीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नाही परंतु अचानक इमारतीत आग लागल्यामुळे रहिवाशात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *