मुंबई :  भारत विकास परिषद, कोथरूड शाखा, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित ‘राष्ट्रीय समूहगान स्पर्धा ‘ ही महर्षी स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे’ येथे ०३ ऑगस्टला संपन्न झाली. या स्पर्धेत आपल्या ‘शिक्षण प्रसारक मंडळींचे एस्.पी.एम्. इंग्लिश स्कूल, माध्यमिक विभाग, पुणे या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ही स्पर्धा संस्कृत आणि हिंदी या दोन्ही भाषेतील गीत गायनाची होती.हिंदी राष्ट्रीय समूहगान’ स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि ‘संस्कृत राष्ट्रीय समूहगान’स्पर्धेत द्वितीय क्रमांक  विद्यार्थ्यांनी पटकावला आहे.
हिंदी आणि संस्कृत ‘राष्ट्रीय समूहगान स्पर्धेच्या ‘ संयुक्तिक संपूर्ण श्रेणीत शाखा स्तरावर प्रथम क्रमांक पटकवला आहे.
या  स्पर्धेचे  परीक्षण ज्येष्ठ संगीत शिक्षिका, केंद्रीय विद्यालय, पुणे  येथील संगीत शिक्षिका साधना घुगरी आणि ज्येष्ठ  तालवाद्य साथीदार  संध्या साठे , तसेच माधवी राजे या तिघींनी उत्तम केले.
या स्पर्धेसाठी  शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या संगीत शिक्षिका प्रार्थना साठे आणि तबला शिक्षक श्री अवधूत धायगुडे यांनी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली. सुजाता खटावकर यांच्या मूळ वार्तांकनात छोटी भर घातली.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *