सलमान पठाण

 

 

ठाणे ; ठाण्यातील वागळे परिसरातील इंदिरा नगर रोड न. २२ येथे वाय पी ग्रुप यांच्याकडून ७ ऑगस्ट बुधवारी  सकाळी ११ ते २ या दरम्यान  रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
ठाण्यातील वागळे परिसरातील समाजसेवक योगेश पाठक यांच्या कडून लोकांमध्ये जनजागृती साठी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. समाजसेवक योगेश पाठक यांच्याकडून रुग्ण तपासणी , मेडिकल कॅम्प, रक्तदान शिबीर अशे विविध उपक्रम नेहमीच राबविले जातात. आजारी रुग्णांना लवकरात लवकर रक्ताची सोय व्हावी या साठी त्यांनी ब्लड लाईन या रक्तपेढीसोबत  मिळून हा उपक्रम राबवला  या प्रसंगी खूप मोठ्या  प्रमाणात नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर ७३ लोकांनी रक्तदान करून हा कॅम्प यशस्वी केला
या रक्तदान शिबिराला भारतीय जनता पक्षाचे ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक भारत चव्हाण यांनी देखील उपस्तीथी लावली होती.  ज्या ७३ नागरिकांनी रक्तदान  केले त्यांना अल्पोहार व त्याच बरोबर रक्तदान केल्याचं प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *