मुंबई : कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने कोटक ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड हा नवीन फंड गुंतवणूकीसाठी आणत असल्याची घोषणा केली. हा फंड परिवहन आणि मालवाहतूक ( लॉजिस्टिक) या क्षेत्राशी संबंधित असून तो मुदतमुक्त श्रेणीतील आहे. हा फंड येत्या २५ नोव्हेंबरला गुंतवणूकीसाठी खुला होणार असून आणि ९ डिसेंबरला बंद होणार आहे.
परिवहन आणि मालवाहतूक क्षेत्र आणि तत्सम कामकाजामध्ये कार्यरत कंपन्यांचे समभाग आणि समभागाशी संबंधित साधनांमध्ये प्रामुख्याने हा फंड गुंतवणूक करणार असून दीर्घकालीन भांडवली वाढ निर्माण करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. वस्तू आणि प्रवाशांची ने-आण करणाऱ्या वाहतूक आणि मालवाहतूक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर हा फंड आपले लक्ष केंद्रित करतो. गुंतवणूकदारांना भारतातील वाढत्या वाहतूक आणि मालवाहतूक संकल्पनेत गुंतवणूकीची संधी प्रदान करत आहे. भारताच्या वाढत्या आकांक्षा, वाहतूक आणि मालवाहतूक अर्थप्रणालीची अधिकाधिक भरारी आणि या क्षेत्रातील मोठ्या वाढीच्या संधी आदींमुळे या संकल्पनेला गती मिळालेली आहे. हा फंड गुंतवणूकीसाठी तळ ते शिखर या पध्दतीचा अवलंब करणार आहे. लार्ज, मिड आणि स्मॉल-कॅप कंपन्यांतील गुंतवणूकीसह विविध बाजार भांडवलांमध्ये गुंतवणूकीची लवचिकता या फंडात राहणार आहे.
केएमएएमसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा म्हणाले, “कोटक ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिक फंडचा शुभारंभ करत आम्ही गुंतवणूकदारांना भारताच्या वेगाने बदलणाऱ्या वाहतूक आणि मालवाहतूक संकल्पनेमध्ये सहभागी होण्याची संधी प्रदान करत आहे.
