ठाणे : भारतीय संविधान दिनानिमित्त, मंगळवार २६ नोव्हेंबर रोजी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, विधि सल्लागार मकरंद काळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.त्याचप्रमाणे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांच्यासह महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर, ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्यासह ठाणेकर नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *