माथेरान : माथेरान मध्ये काल अंजुमन इस्लाम या संस्थेचे चेअरमन तसेच पद्मश्री डॉक्टर जहीर काझी भेट दिली होती यावेळी माथेरान मध्ये असलेल्या संस्थेच्या इमारतीमध्ये लवकरच येतील स्थानिकांसाठी अद्यावत शाळा व ज्या विद्यार्थी शिक्षणामध्ये कुमकुवत आहे त्यांच्यासाठी कौशल्य विकास कार्यशाळा सुरू करण्याचे जाहीर केले.
माथेरानच्या मध्यवर्ती ठिकाणी जगप्रसिद्ध अंजुमन इस्लाम या संस्थेचे मोठी जागा आहे व गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी अंजुमण इस्लाम या शैक्षणिक संस्थेमार्फत शाळा सुरू केली जाणार अशा बातम्या प्रसिद्ध होत होत्या परंतु काल या संस्थेचे चेअरमन तसेच पद्मश्री जहीर काझी यांनी आपल्या शिष्ट मंडळ समवेत भेट देऊन सदर जागेची पाहणी केली व यावेळी मात्र मधील काही ठराविक लोकांबरोबर चर्चा करताना येथील शैक्षणिक समस्या जाणून घेतल्या व त्याबरोबरच येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भेडसावणाऱ्या अनंत अडचणी व स्थानिक शिक्षणामध्ये असलेल्या गैरसोयींची आस्तेने चौकशी केली व यावर निर्णय घेताना माथेरानमध्ये लवकरच आपल्या संस्थेमार्फत येथील स्थानिकांसाठी शाळा सुरू करण्याचे जाहीर तर केलेच परंतु येथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी त्यांच्या मेरिट वर आपल्या संस्थेमध्ये दाखला देऊ असेही सांगितले यावेळी त्यांच्याबरोबर संस्थेचे जनरल सेक्रेटरी अखी हाफिझ, अख्तर रंगूनवाला प्रॉपर्टी सेक्रेटरी, ऍडव्होकेट शौकत बेडगती, अल नासीर झकेरिया, किर्तिका उनवाला व अनेक पदाधिकारी उपस्थित होते तर माथेरान येथून माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगरसेवक नासिर शारवान, शिवाजी शिंदे शकील पटेल, शकील शेख रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे व अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.
00000