अशोक गायकवाड
मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ला अपेक्षित यश न आल्याने संघटनात्मक बांधणी नव्याने करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्यामहाराष्ट्र राज्य व विदर्भ कमिटी बरखास्त करण्यात आल्याची माहिती बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. (डॉ.) सुरेश माने यांनी दिली आहे.
दिनांक १३ डिसेंबर २०२४ व १५ डिसेंबर २०२४, नागपूर व पूणे या पक्षाच्या आढावा बैठकीत कार्यकत्र्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ला अपेक्षित यश न आल्याने संघटनात्मक बांधणी नव्याने करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या महाराष्ट्र राज्य व विदर्भ प्रदेश स्तरीय प्रदेश व जिल्हा कमेट्या बरखास्त करून पक्ष-सदस्यता व संगठनबांधनीचा निर्णय घेतलेला असून त्यासाठी काही विशेष पदाधिकारी यांची हंगामी पदाधिकारी म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. यापुढे पक्षाची पक्षबांधनी, सदस्यता मोहिम, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे व जन आंदोलन या चार कलमी कार्यक्रमाअंतर्गत सर्वांना पक्षबांधनीचे आदेश दिले आहेत.राज्यातील सामाजिक असंतोष-परभणी, बीड सारख्या घटनांनी महाराष्ट्र ढवळून निघाला असून राज्यात नवीन स्थापन झालेल्या सरकारसमोर सुध्दा नवीन आव्हाणे उभे केली आहेत त्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घ्यावी व योग्य कारवाई करावी असेही ठराव या बैठकीत पास करण्यात आले. त्याशिवाय निवडणूकीत ईव्हीएम चा गैरवापर, काळ्या पैशाचा गैरवापर, शासन-प्रशासनाचा गैरवापर, आर्थिक घोटाळे व आश्वासने आणि वन नेशन वन इलेक्शन यामुद्द्यावर भविष्यातही बीआरएसपी सातत्याने सुधारणासाठी व बदलासाठी प्रयत्नशील राहील असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. असेहीबहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे, संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. (डॉ.) सुरेश माने यांनी सांगितले.
