3000 पेक्षा अधिक धावपटू ठाण्याच्या रस्त्यांवर उत्साहाने धावले
रुनवाल रिअल्टी ठाणे हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वात 300 ज्येष्ठ नागरिक आणि 270 मुलांनी शर्यत पूर्ण केली; मॅरेथॉनमधून जमा झालेला निधी पॅरा-धावपटूंना कृत्रिम पाय देण्यासाठी वापरण्यात येणार मुंबई- भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या रुनवाल रिअल्टी यांनी प्लेफ्री स्पोर्ट्स इंडिया यांच्या सहकार्याने ठाणे हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन रनवाल 25 आवर्स लाइफ, मानपाडा, ठाणे पश्चिम येथे मोठ्या उत्साहात केले. “ब्रेकिंग बॅरियर्स, बिल्डिंग चॅम्पियन्स” या थीमवर वर आधारित या स्पर्धेमध्ये 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी मजेत धावण्याचा तसेच 1 किमी कौटुंबिक धाव अशा शर्यतींचा समावेश होता. 3000 हून अधिक धावपटू आणि 30 पॅरा-अॅथलीट्स यांनी आरोग्य, समावेशकता आणि सकारात्मक बदल या सामूहिक ध्येयासाठी एकत्र येत या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. चिकाटीचा उत्सव साजरा करण्याबरोबरच, ही मॅरेथॉन सामाजिक उद्दिष्टाचे प्रतीक ठरली. या कार्यक्रमातून मिळणारा संपूर्ण निधी भारतातील पॅरा-अॅथलेटिक चॅम्पियन्सना कृत्रिम पाय उपलब्ध करून देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे रुनवाल रिअल्टीने जिद्द, सामर्थ्य आणि सकारात्मक बदल घडवण्याची आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. ह्युमेबल फाउंडेशनच्या पाठिंब्यामुळे या कार्यक्रमाचे योगदान अधिक व्यापक झाले असून, समाज अधिक समावेशक करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.…
