नायडूंकडून आंध्रात वक्फ बोर्ड बरखास्त
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त केलं आहे. गतमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीयांच्या सरकारने राज्यात वक्फ बोर्डची स्थापना केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील जनतेनं चंद्राबाबू नायडू यांच्याबाजुने कौल…
शरद पवारपक्षाच्या गटनेतेपदी आव्हाड
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर, दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील यांना मुख्य प्रतोदपदी संधी देण्यात आली आहे. तसेच, आमदार…
शिंदे इन अॅक्शन; वाटाघाटी पुन्हा सुरु
स्वाती घोसाळकर मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील महत्वाच्या बैठकी रद्द करून दोन दिवस दरे गावी गेल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. दोन दिवस शिंदे यांनी आपला सर्व…
हिंदुनो, तीन मुले जन्माला घाला !
सरसंघचालक भागवातांचे आवाहन नागपूर : हिंदू धर्म ठिकवायचा असाल असेल तर तमाम हिंदू जोडप्यांनी किमान तीन मुले जन्माला घालायलाच पाहिजे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथील एका…
मुंबई, ठाणेकरांनो आता कपाटातून स्वेटर काढा !
मुंबई : विधानसभेच्या निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय तापमान दिवसागणिक वाढत चालले असले तरी मुंबई ठाण्यासह राज्यातील तापामानात कमालीची घट होत आहे. राज्यातील किमान तापमानाचा पारा आता चांगलाच घसरला आहे. राज्यामध्ये शनिवारी नाशिक येथे ८.९ या सर्वात…
फडणवीसांची मुलुंडमध्ये ‘दिवाळी’
भाजापा नेते किरीट सोमय्या यांनी मुलुंडमध्ये आयोजित केलेल्या दिवाळी स्नेह संमेलनात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सहभागी झाले आणि त्यांना कॅमेरात टिपण्यासाठी उपस्थितांमध्ये अशी चढाओढ सुरु झाली.
संघ दक्ष ! फडणवीसच मुख्यमंत्री !
मुंबई : मागील सत्तासंघर्षात सर्वाधिक १०५ जागा जिंकूनही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याएवेजी एनवेळी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा धक्कादायक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून घेण्यात आला…
नायडूंकडून आंध्रात वक्फ बोर्ड बरखास्त
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त केलं आहे. गतमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीयांच्या सरकारने राज्यात वक्फ बोर्डची स्थापना केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील…
आगामी काळातील निवडणुकांमध्येही हिंदू अस्मितेचे धमाके फुटत राहतील
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे भाकित ठाणे: लोकसभा निवडणुकीच्या काळात हिंदूंमध्ये मतदानाबाबत उदासिनता होती. मात्र, बांगलादेश, सिलीगुडी आणि सिमला येथील हिंदूवरील अन्यायाच्या घटनांनंतर हिंदू अस्मिता जागी झाली. हिंदू धर्मियांना आपल्या उदासिनतेबाबत पश्चाताप झाल्यानंतर सुरुवातीला हरियाणा व आता महाराष्ट्रातील निकाल लागले. यापुढील निवडणुकांतही हिंदू अस्मितेचे धमाके फुटत राहतील, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी येथे व्यक्त केले. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या वतीने राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचे `कारणं महायुतीच्या विजयाची, भाजपाच्या यशाची’ या विषयावर शुक्रवारी व्याख्यान पार पडले. त्यावेळी श्री. तोरसेकर बोलत होते. नौपाड्यातील उमा निळकंठ व्यायामशाळेलगतच्या हितवर्धिनी सभेच्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडो ठाणेकरांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमात भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते व हिंदुत्वाचे अभ्यासक अजय जगताप यांनी `लव्ह जिहाद’वर लिहिलेल्या `व्हायरस’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेला २४० हा आकडा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुपला नाही. पण तो हिंदूंना खुपला. त्यानंतर हळूहळू हिंदू धर्मीय संघटीत होत गेले, असे प्रतिपादन भाऊ तोरकसेकर यांनी केले. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपाने मेहनत केली नाही. तर महाविकास आघाडीने संपूर्णपणे ताकद लावली. त्यामुळे त्यावेळी भाजपाची हाराकिरी झाली होती. महायुती व महाविकास आघाडीच्या मतांमध्ये केवळ ०.०३ टक्क्यांचा म्हणजे दोन लाख मतांचा फरक होता. महाविकास आघाडीतील काही पक्षांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वारस्य नव्हते. त्यामुळे त्यांची मते महाविकास आघाडीकडे वळविण्यात आली. मात्र, ते विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढल्यास महाविकास आघाडीचा पराभव निश्चित होता. लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने भाजपाचा पराभव झाला नसल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, ते ध्यानात घेतले गेले नाही, याकडे भाऊ तोरसेकर यांनी लक्ष वेधले. तसेच २०१९ पासून देवेंद्र फडणवीस यांची पाच वर्ष यथेच्छ टिंगल केली गेली. मात्र, त्यांनी संयम बाळगून आज इतर सर्वांना चेष्टेचा विषय केले आहे, असा टोला श्री. तोरसेकर यांनी मारला. सध्या सक्षम विरोधी पक्ष नसल्यामुळे राजकारणाचा `चुथडा’ झाला आहे. एकेकाळी महाराष्ट्रात अभ्यासू विरोधी आमदारांची फळी होती. परंतु, आता ती फळी संपल्यामुळे लोकशाहीपुढे आव्हान निर्माण झाले आहे, अशी खंत श्री. भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केली. विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने भाऊ तोरसेकर यांचे संजय वाघुले व संस्थेच्या सदस्या वृषाली वाघुले यांच्याकडून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद मुळे यांनी केले.